Low Investment Business – ५० हजारच्या भांडवला सोबत वर्षाला होईल १२ लाखांची कमाई, सोबत ४ महिने मिळेल सुट्टी

जर तुम्हाला कमी भांडवलामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजचा हा खास व्यवसाय तुमच्यासाठी एकदम उत्तम राहील. या व्यवसायात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मशीन खरेदी करण्याची किंवा जागेची आवश्यकता नसते. त्यामुळे ज्याला व्यवसाय करण्याची फार इच्छा आहे तो प्रत्येक व्यक्ती हा व्यवसाय सुरु करु शकतो.

कुठे ही चालेल बिझनेस

या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा व्यवसाय तुम्ही गावात किंवा शहरात देखील सुरु करु शकता. या व्यवसायाची मागणी सगळीकडे आहे. तसेच वर्षातील ४ महिने तुम्ही सुट्टी देखील घेऊ शकता. कारण वर्षातील ४ महिने याची मागणी फार कमी असते. पण ८ महिन्यांमध्ये तुमची इनकम भरपूर झालेली असते. त्यामुळे केवळ ८ महिने काम करुन तुम्ही ४ महिने पाहिजे तर आराम करु शकता किंवा बाहेर फिरायला जाऊ शकता.

हा आहे बिझनेस प्लॅन

आम्ही तुम्हाला ज्या व्यवसाया बद्दल सांगणार आहे त्याला Trousseau Packing चा व्यवसाय असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास या व्यवसायात आपण लग्नामध्ये देण्यासाठी भेटवस्तू तयार करतो. लग्नामध्ये नवरा आणि नवरीला भेटवस्तू देण्याची प्रथा आपल्या भारत देशात आहे. तसेच आता बाहेरील देशामध्ये देखील आपल्याला ही प्रथा पहायला मिळत आहे.

Trousseau Packing

हा व्यवसाय शहरात आणि गावाला चांगल्या प्रकारे चालत आहे. तसेच या व्यवसायात सध्या कोणत्या ही प्रकारचे कॉम्पिटिशन नसल्यामुळे तुम्ही हा व्यवसाय नक्कीच सुरु करु शकता.

बिझनेस यशस्वी होण्याची गॅरंटी

जर तुम्हाला वाटत असेल की या व्यवसायाद्वारे चांगली कमाई नाही होणार तर तुम्हाला एकदा ५८ वर्षाच्या हरिंदर पाल सिंग आणि त्यांची 54 वर्षीय पत्नी ऋषी सचदेवा यांची स्टोरी ऐकली पाहिजे. हे दोघे meera’s celebrations च्या नावाने लुधियाना पंजाबमध्ये ट्राऊस पॅकिंगचे काम करतात आणि वर्षाला आरामात ३० लाखांची कमाई करतात.

आता हे व्यक्ती लुधियाना मधून बाहेर निघून आजूबाजूच्या शहरामध्ये देखील हा व्यवसाय सुरु करणार आहे. जर यांनी हा व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे तर तुम्ही सुद्धा करु शकता.

हे पहा – २० हजारचा पेन आणि महिन्याला ३० हजारांची कमाई, एकदम नवीन बिझनेस आयडिया फक्त तुमच्यासाठी

तुम्हाला काय करावे लागेल

सगळ्यात अगोदर तुम्ही जेथे हा व्यवसाय सुरु करणार आहे तेथे अजून कोणी हा व्यवसाय करत आहे का हे पहावे लागेल. जेणे करुन तुम्हाला कॉम्पिटिशन विषयी माहित होईल. त्या नंतर Trousseau Packing विषयी इंटरनेट वर थोडी रिसर्च करा. मग Trousseau Packing साठी लागणारे आवश्यक मटेरियल खरेदी करुन स्वतःचा ब्रँड लाँच करा.

सुरुवातीला ट्राऊस पॅकिंगच्या चांगल्या ऑर्डर मिळण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हाट्सअँप वर स्वतःच्या व्यवसायाची मार्केटिंग करु शकता. लोक तुम्हाला लग्नामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये भेटवस्तू देण्यासाठी ट्राऊस पॅकिंगची ऑर्डर देतील. अशा प्रकारे तुम्ही वर्षाला कमीत कमी १२ लाख तर नक्कीच कमवू शकता.

अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडियाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment