Machine Business Idea – ५ लाखाच्या मशीनने वर्षभर होईल लाखोंची कमाई, मशीनला राहील संपूर्ण वर्ष मागणी

जर तुम्ही मशीनच्या आधारे एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर मग आजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य राहील. कारण हा संपूर्ण व्यवसाय एका मशीनच्या आधारे केला जातो. तसेच या मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या कामाला देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

तुम्ही गावाला राहत असो किंवा शहरामध्ये सगळीकडे तुम्ही या मशीनच्या साहाय्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता आणि महिन्याला लाखोंची कमाई करु शकता. तुम्हाला फक्त ही मशीन काय करते आणि हिच्या मदतीने व्यवसाय कसा सुरु करायचा हे जाणून घायचे आहे.

काय करते ही मशीन

आम्ही तुम्हाला ज्या मशीन विषयी सांगणार आहे तिला 3D wood carving machine असे म्हणतात. या मशीनचा उपयोग घरासाठी Customized दरवाजे आणि खिडक्या तयार करण्यासाठी केला जातो. मार्केटमध्ये या मशीनच्या मदतीने बनवलेल्या दरवाजे आणि खिडक्यांना प्रचंड मागणी आहे.

ही मशीन मार्केटमध्ये काही नवीन नाही. मागील ३ वर्षांपासून या मशीनचा वापर करुन तयार केलेले दरवाजे खूप वापरले जात आहे. आता प्रत्येकाला स्वतःचे घर बनवायचे आहे आणि ते घर आकर्षक दिसण्यासाठी लोक Customized दरवाजे आणि खिडक्यांचा वापर करत आहे.

अशा प्रकारे मिळवा काम

सध्या प्रत्येकाला आपले स्वतःचे आणि हक्काचे असे घर हवे आहे. त्यामुळे लोक दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये घराचे काम करतात तसेच रिअल इस्टेटमध्ये देखील तुम्ही पाहिले असेल की खूप बिल्डिंग तयार होऊ लागल्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला हवे तसे 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK असे फ्लॅट राहण्यासाठी उपलब्ध करुन दिले जातात.

जे लोक घर बांधण्याचे काम करतात किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतात अशा लोकांसोबत तुम्ही ओळख वाढवू शकता. ज्यामुळे ते लोक तुम्हाला त्यांना मिळालेल्या घराच्या बांधकामासाठी लागणारे दरवाजे आणि खिडक्या तुमच्याकडून घेतील. तसेच जे लोक मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहेत त्यांच्याकडून देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात काम मिळू शकते.

व्यवसाय कसा वाढवाल?

या मशीनच्या मदतीने व्यवसायाची वाढ करण्यासाठी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये ओळख वाढवून काम तर मिळवूच शकता पण या व्यतिरिक्त तुम्ही तयार केलेल्या Customized दरवाजे आणि खिडक्यांच्या रील्स तयार करु शकता आणि त्या इंस्टाग्राम व फेसबुक वर पोस्ट करु शकता. यामुळे लोकांना तुमच्या व्यवसाय व कामाविषयी माहिती होईल आणि तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील कामाची ऑर्डर मिळण्यास मदत होईल.

जर तुम्हाला तुमचा हा व्यवसाय तुम्ही राहत असलेल्या शहर किंवा गावापुरता मर्यादित नसेल ठेवायचा तर मग व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा देखील वापर करु शकता. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही संपूर्ण देशात तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करु शकता.

हे पहा – कोणते ही दुकान न टाकता ३ लाखांच्या गुंतवणुकीत महिन्याला ३० हजार कमवाल, जाणून घ्या कसे

महिन्याला होईल लाखोंची कमाई

3D wood carving मशीन तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये २ लाखांपासून ते ७ लाखांपर्यंत मिळते. व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही ५ लाखांपर्यंतची एखादी मशीन खरेदी करु शकता. जर तुमच्याकडे इतके भांडवल नसेल तर तुम्ही पीएम मुद्रा लोन घेऊ शकता.

3D wood carving machine

मार्केटमध्ये Customized दरवाजे ३ हजारांपासून ते १५ हजार पर्यंत मिळतात. तसेच खिडक्यांसाठी ८०० ते ३,००० रुपये खर्च करावे लागतात. जर तुम्ही रिअल इस्टेटच्या माध्यमातून जास्त काम मिळवले तर महिन्याला लाखो रुपये कमवणे काही मोठी गोष्ट नाही.

अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment