आजचे तंत्रज्ञान इतके अपडेट् झाले आहे की जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तो तुम्ही मात्र १० ते २० हजाराच्या भांडवलामध्ये देखील सुरु करु शकता. मार्केटमध्ये जर तुम्ही रिसर्च करायला गेले तर कमी भांडवलामध्ये अशा किती तरी बिझनेस आयडिया तुम्हाला सहज मिळतील.
आज आम्ही देखील तुमच्यासाठी अशीच एक कमी गुंतवणुकीत सुरु होणारी बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे. ज्यामध्ये तुम्ही केवळ २० हजार रुपये गुंतवून महिन्याच्या शेवटी ३० हजार रुपये सहज कमवू शकता. हा संपूर्ण व्यवसाय एका पेनद्वारे केला जाणार आहे. तसेच हाच पेन तुम्हाला घरबसल्या किंवा बाजारामध्ये स्वतःचे दुकान टाकून भरपूर पैसे कमवून देईल.
काय करतो हा पेन
मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून एक पेन फार प्रसिद्ध होत आहे ज्याला Handheld printer pen असे म्हणतात. हा पेन एका अँपच्या मदतीने ऑपरेट केला जातो. या पेनच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंवर तुम्हाला हवे ते नाव किंवा चित्र प्रिंट करु शकता. तुम्ही लाकूड, कप, शर्ट, मेटल, फायबर, प्लास्टिक आणि काच अशा प्रकारच्या वस्तूंवर प्रिंट करु शकता.
पूर्वी कपावर प्रिंट करण्यासाठी वेगळी मशीन, शर्ट प्रिंट करण्यासाठी वेगळी मशीन आणि काचेवर प्रिंटिंग करण्यासाठी वेगळी मशीन वापरायला लागायची. त्यामुळे विविध वस्तूंवर प्रिंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मशीन घेणे यासाठी खूप भांडवल लागायचे.
पण आता हे सर्व काम एक पेन आरामात करतो. तसेच हा पेन तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये २० हजाराच्या आसपास सहज मिळेल. त्यामुळे मात्र २० हजारच्या गुंतवणुकीत तुम्ही स्वतःचा वस्तूंवर प्रिंट करुन देण्याचा व्यवसाय सुरु करु शकता.

अशा प्रकारे प्रोव्हाईड करु शकता सर्विस
जर तुम्हाला या पेनद्वारे लोकांना त्यांच्या वस्तूवर प्रिंट करुन देण्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल, तर हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्केटमध्ये ६*६ ची जागा पुरेशी आहे. तुम्ही एखादी जागा भाड्याने घेऊ शकता आणि काम सुरु करु शकता.
स्वतःच्या वस्तूंवर विविध फॉन्टमध्ये नाव प्रिंट करुन घेण्यासाठी तरुण मुले फार उत्सुक असतात. त्यामुळे तुमचे पहिले टार्गेट कस्टमर हे कॉलेजचे मुले व मुली असतील. कॉलेज मधील मुले त्यांच्या कॅप, सॅग आणि बाईक वर काही तरी नेहमी प्रिंट करुन घेत असतात. तुम्ही कॉलेजच्या बाहेर गाडीवर बसुन मुलांना त्यांच्या वस्तूंवर हवे ते प्रिंट करुन देऊ शकता.
तसेच बर्याचशा सरकारी आणि प्राइवेट कंपनीमध्ये वस्तूंवर प्रिंटिंगचे काम असते. तुम्ही त्यांना एक फिक्स रेटमध्ये काम करुन देऊ शकता. अशा कंपनीमध्ये काम तुम्ही संपर्क करून किंवा एखाद्याच्या ओळखीने मिळवू शकता.
किती पैसे मिळतील
या व्यवसायात तुम्ही ग्राहका कडून त्याने करुन घेतलेल्या कामानुसार चार्ज करु शकता. लहान किंवा मोठ्या फॉन्टसाठी आणि इमेज प्रिंट करण्यासाठी विविध रेट तुम्ही ठरवू शकता.
हे पहा – नवरात्री पासून दिवाळी पर्यंत जबरदस्त चालतील हे ५ व्यवसाय
जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वस्तूवरील प्रिंटिंग काम करुन देण्यासाठी कमीत कमी १०० रुपये चार्ज केले आणि दिवसाला केवळ १० लोकांचे काम केले तर तुम्ही दिवसाला सहज १ हजार रुपये कमवाल. म्हणजे महिन्याला तुमची कमाई ३० हजार रुपये होईल.
अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇