दिवसाला ५० हजार रुपयांचा माल बनवते ही मशीन, गावात किंवा शहरात देखील चालेल व्यवसाय

प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे मग तो छोटा असू द्या किंवा मोठा. जर तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर तुम्हाला बरेच बिझनेस आयडिया मिळतील जे तुम्ही घरी बसून सुरु करु शकता किंवा जागा घेऊन तो व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता.

आज आपण अशाच एका व्यवसाय विषयी माहिती घेणार आहे ज्यामध्ये केवळ एका मशीनच्या साहाय्याने आपण घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतो. जर तुम्ही ही मशीन खरेदी केली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर पुढील काही महिन्यांमध्ये तुम्ही चांगला प्रॉफिट तयार करु शकता.

गावात आणि शहरात आहे मागणी

आम्ही तुम्हाला ज्या मशीन विषयी सांगणार आहे आणि तिच्या मदतीने तुम्ही जो माल तयार कराल त्याला मार्केटमध्ये फार डिमांड आहे. घरात किंवा दुकानांमध्ये या प्रॉडक्टचा खूप वापर केला जातो. तसेच जेथे पाणी supply करण्याशी संबंधित खूप कामे केली जातात तेथे देखील हा माल जास्त विकला जातो.

सांगायचा उद्देश असा की तुम्ही या मशीनच्या साहाय्याने गावात किंवा शहरात कुठे ही व्यवसाय सुरु करु शकता. कारण प्रॉडक्टची मागणी ही सगळीकडे आहे. चला तर पाहूया कोणती आहे ती मशीन आणि ती काय प्रॉडक्ट तयार करते.

काय करते ही मशीन

आम्ही तुम्हाला ज्या मशीन विषयी सांगणार आहे तिला Pvc bend machine असे म्हणतात. मशीनच्या नावा वरुनच तुम्हाला कळले असेल की ही मशीन Pvc पाईपला बेंड करण्याचे काम करते. अशा पाईपचा वापर घरामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी, गटारांची व्यवस्था आणि सिंचनासाठी वापरले जाते.

pvc bend pipe

या मशीनमध्ये एका बाजूने Pvc पाईप टाकले जातात आणि मग ही मशीन त्या पाईपला ठराविक प्रमाणात गरम करते व गरम केलेल्या पाईपला ९० डिग्रीमध्ये बेंड करते. ही मशीन ६ इंच पासून ते १३ इंचचे पाईप तयार करते. ही मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही काम करावे लागत नाही.

ही Pvc बेंड मशीन तुम्ही २४ तास चालू ठेवून काम करु शकता. ही मशीन २४ तासात जवळपास १० हजार बेंड केलेले पाईप तयार करते.

कसा सुरु कराल व्यवसाय

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सर्वात अगोदर ही मशीन खरेदी करावी लागेल. तुम्ही ही मशीन ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केट मधून खरेदी करु शकता. ही मशीन तुम्हाला Manual, Semi Automatic आणि ऑटोमॅटिक स्वरुपात मिळते. मार्केटमध्ये Pvc बेंड मशीन २५ हजारा पासून ते २.५ लाखांपर्यंत मिळते.

pvc bend pipe machine

त्यानंतर ही मशीन ठेवण्यासाठी आणि काम सुरु करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता लागेल. जर तुमच्या घराजवळ पुरेशी जागा उपलब्ध असेल तर हा व्यवसाय तुम्ही घरुनच सुरु करु शकता. जर जागेची कमी असेल तर तुम्हाला ही मशीन ठेऊन काम करण्यासाठी जागा पहावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता.

हे वाचा – बाजरीच्या मदतीने सुरु करु शकता अनेक प्रकारचे व्यवसाय, या उत्पादनांच्या मदतीने करा सुरुवात

तयार माल कितीला विकला जातो?

Pvc बेंड पाईप विविध इंचामध्ये बनवले जातात त्यामुळे पाईपची किंमत देखील वेगवेगळी असते. मार्केटमध्ये हे पाईप ८० ते २५० रुपयां पर्यंत विकले जातात. या पाईपमध्ये तुम्हाला कमीत कमी ५ रुपये तरी प्रॉफिट राहते.

ही मशीन २४ तासात १० हजार Pvc बेंड पाईप तयार करते. म्हणजे ५ रुपये प्रत्येकी पाईप प्रॉफिट नुसार तुम्हाला दिवसाला ५० हजार प्रॉफिटचा माल ही मशीन तयार करुन देईल. आता राहिला प्रश्न तयार माल विकण्याचा तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या दुकानांना हा माल विकू शकता. तसेच ज्या कंपन्या Pvc पाईप तयार करतात त्यांना देखील तुम्ही हा माल विकू शकता.

अशाच नवीन बिझनेस आयडियाची माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment