खाकरा बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला महिन्याला कमवून देईल ३० ते ४० हजार रुपये, अशा प्रकारे करा सुरुवात

आजच्या तरुण पिढीने नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचा असा एखादा छोटासा व्यवसाय सुरु करणे किती तरी पटीने चांगले आहे. सध्या मार्केटमध्ये असे किती तरी लहान व्यवसाय आहेत जे महिन्याला लाखो रुपये कमवून देतात. अशा प्रकारचे लहान व्यवसाय सुरु करणे फार सोपे आणि अगदी कमी भांडवलामध्ये हे आपल्याला चांगला नफा मिळवून देऊ शकतात.

असाच एक कमी गुंतवणुकीमध्ये सुरु होणारा व्यवसाय म्हणजे खाकरा बनवण्याचा व्यवसाय. हा व्यवसाय तुम्ही अगदी घरबसल्या सुरु करु शकता आणि हे काम सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त गोष्टींची देखील आवश्यकता नसते.

खाकरा बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

खाकरा बनवण्यासाठी तुम्हाला काही कच्चामालाची आवश्यकता असते. यामध्ये तुम्हाला गव्हाचे पीठ, बेसन पीठ, अजवाइन, कस्तुरी मेथी, हळद, मीठ, मिरची आणि तेल या कच्चामालाची आवश्यकता असते. तसेच या व्यतिरिक्त तुम्हाला रोटी मेकर मशीनची देखील आवश्यकता असते.

हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या काही महिलांना कामावर ठेऊन सुरु करु शकता. खाकरा तयार केल्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे पॅकिंग करण्यासाठी तुम्हाला एका पॅकिंग मशीनची देखील गरज पडेल.

अशा प्रकारे तयार केला जातो खाकरा

खाकरा बनवण्याचा व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात सर्व पदार्थ घेणार. पण तुम्हाला खाकरा बनवण्याची प्रोसेस समजून सांगण्यासाठी आम्ही इथे १ किलो खाकरा बनवण्याचे प्रमाण तुम्हाला सांगणार आहे.

एक किलो खाकरा तयार करण्यासाठी पहिले एका भांड्यात ७०० ग्राम गव्हाचे पीठ टाका व त्यामध्ये ३०० ग्राम बेसन घाला. त्यामध्ये दहा ग्रॅम बारीक अजवाइन, दहा ग्रॅम मिरची, दहा ग्रॅम मेथी टाकणे गरजेचे आहे. त्या नंतर २० ग्रॅम हळद आणि २० ग्रॅम मीठ टाकावे. तसेच २०० मिली तेल यामध्ये टाकणे गरजेचे आहे.

या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करुन घ्या. यामध्ये थोडे पाणी टाकून त्याचे पीठ तयार करा. घरामध्ये चपाती बनवण्यासाठी ज्या प्रकारे पीठ तयार केले जाते तसेच पीठ तुम्हाला खाकरा बनवण्यासाठी तयार करायचे आहे. या नंतर रोटी मेकर मशीनच्या साहाय्याने खाकरा लाटून घ्या आणि मग गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या. अशा प्रकारे खाकरा तयार केला जातो. आता हा खाकरा मशीनच्या साहाय्याने चांगला पॅक करा आणि बाजारात विक्रीला पाठवा.

khakhra

खाकरा बनवण्यासाठी लागणारा खर्च

खाकरा बनवण्यासाठी तुम्हाला कच्चा मालाची आवश्यकता असते. गव्हाचे पीठ २५ रुपये किलो, बेसन पीठ ९० ते १०० रुपये किलो, अजवाइन ४५० रुपये किलो, कस्तुरी मेथी चौदाशे रुपये किलो, मिरची पावडर आणि मीठ दहा रुपयांच्या पॅकेटमध्ये तुम्हाला मिळते. १२० ते १३० रुपये लिटर तेल आणि दोन हजार रुपयाची रोटी मेकर मशीन आणि पॅकिंग करता लागणारे बाराशे रुपयाचे पॅकिंग मशीन इतका साधारण खर्च तुम्हाला यामध्ये येतो.

आता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात खाकरा बनवणार आहे त्यावर सुरुवातीचा खर्च अवलंबून राहील. पण तसे ५ हजारात तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता.

हे पहा –  गरीब असो किंवा मध्यम वर्गीय, कोणी पण सुरु करु शकते केळ्याची पावडर बनवण्याचा व्यवसाय

किती पैसे मिळतील?

एक किलो खाकरा बनवण्यासाठी तुम्हाला जवळपास १०० रुपये खर्च येतो. तसेच हा तयार केलेला खाकरा तुम्ही होलसेल मध्ये १७० रुपयांना तर किरकोळ बाजारात २४० रुपये किलो भावाने विकू शकता. जर तुम्ही होलसेलमध्ये खाकरा विकला तर तुम्हाला एक किलो खाकरा मागे ५० रुपयांचा नफा होतो. जर तुम्ही दिवसाला २० किलो खाकरा बनवून विकला तर तुम्ही सहज दिवसाला १००० रुपये आणि महिन्याला ३० हजार रुपये कमवाल.

अशा प्रकारच्या बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment