OYO म्हणजे काय हे कोणत्या सुविधा पुरवतात।OYO meaning in marathi

OYO हे नाव सर्वानी फार ऐकले असेल पण ह्याचा अर्थ oyo meaning in marathi कोणाला देखील माहित नाही. प्रत्येक व्यवसायाचे नाव ठरवताना फार विचार केला जातो. कारण व्यवसायाचे नाव हे त्याचा ब्रँड असते व व्यवसाय विषयी संपूर्ण माहिती देत असते.

OYO चा व्यवसायाचा अर्थ देखील त्याच्या या नावामध्ये लपलेला आहे. आज आपण येथे OYO विषयी माहिती घेणार आहोत. त्या सोबतच ही कंपनी आपल्याला कोणत्या सुविधा पुरवते हे देखील पाहणार आहोत.

OYO म्हणजे काय | OYO meaning in marathi

OYO एक ऑनलाईन हॉटेल रुम बुकींग कंपनी आहे. शहरातील खूप सारे हॉटेल यांच्या सोबत जोडले गेलेले आहेत. OYO च्या अँप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून Customer स्वतःसाठी रुम बुक करत असतात. OYO चा Full-Form हा On Your Own असा आहे. तसेच यांच्या संपूर्ण व्यवसायाचे नाव OYO Room आहे. ज्याचा फुल फॉर्म On Your Own Rooms असा होतो.

ही भारतातील सर्वात मोठी हॉटेल्स सोबत नेटवर्क असलेली कंपनी आहे जी आता जगामध्ये १९९ शहरात आपली सर्विस ऑफर करते. ह्या कंपनीचे Headquarter Gurgaon मध्ये आहे आणि याचे फाऊंडर रितेश अग्रवाल आहेत.

OYO कंपनी भारतात सर्वात टॉपला आहे याचे मुख्य कारण म्हणजे यांच्याकडून ग्राहकांना मिळणाऱ्या ऑफर आहे. तसेच ग्राहकांना यांच्या ऑफर फार फायदेशीर ठरतात.

OYO ची सुरुवात कधी झाली?

२०१२ मध्ये रितेश अग्रवाल यांनी Oravel Stays या नावाने कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर २०१३ मध्ये कंपनीचे नाव बदलून त्यांनी OYO हे नवीन नाव ठेवले. रितेश अग्रवाल यांना Paypal चे सह-संस्थापक पीटर थिएल कडून दोन वर्षाच्या थिएल फेलोशिप कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे $1,00,000 डॉलरचे अनुदान मिळाले.

२०१९ मध्ये OYO चे जागतिक स्तरावर १७,००० पेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यामधील ८,००० भारत आणि दक्षिण आशियामध्ये आहेत. OYO हॉटेल्स आणि होम ही एक साखळी आहे जी घर व खोली भाडे तत्वावर देते.

OYO कोणती सुविधा पुरवते?

आपल्या सर्वाना माहित आहे कि OYO हॉटेल बुक करण्याची सुविधा पुरवते. पण OYO या व्यतिरिक्त आणखी देखील काही सुविधा आपल्याला पुरवते. त्या तुम्ही खाली पाहू शकता.

1. OYO Townhouse

ज्या लोकांना हॉटेल्स रुम ऐवजी एक फ्लॅट बुक करायचा आहे अशा व्यक्तींसाठी ही सेवा आहे.

2. OYO Home

या सुविधेमध्ये कस्टमरला Private घर बुक करण्याची सुविधा दिली जाते. अशा घरांना पूर्णपणे OYO मॅनेज करत असते.

3. SilverKey

ही सर्विस केवळ व्यावसायिकांना असते. जे लोक व्यवसायासाठी किंवा व्यावसायिक मीटिंगसाठी बाहेर फिरत असतात त्यांच्यासाठी हि सुविधा आहे.

4. OYO Life

ज्या व्यक्तींना फ्लॅट किंवा रुम भाड्याने घ्यायचा आहे अशा व्यक्तींसाठी ही सर्विस आहे. यामध्ये आपण दीर्घ काळासाठी रुम किंवा फ्लॅट भाड्याने घेऊ शकतो.

OYO Rooms काय आहे। OYO Rooms meaning in Marathi

OYO Rooms हे कंपनीचे नाव आहे ज्याचा फुल फॉर्म On Your Own Rooms असा होतो. OYO आपल्याला Rent वर रुम व फ्लॅट देते त्यामुळे कंपनीचे नाव OYO Rooms असे ठेवण्यात आले आहे.

OYO Rooms meaning in Marathi

OYO Rooms चे फायदे

OYO ही देशातील सर्वात मोठी हॉटेल बुकिंग कंपनी आहे. तसेच हि बाहेरील देशांमध्ये देखील फार प्रचलित कंपनी आहे. हे सर्व OYO ने ग्राहकांना दिलेल्या चांगल्या सर्विसमुळे शक्य झाले.

OYO वापरण्याचे तसे बरेच फायदे आहेत परंतु त्यामधील काही उपयुक्त फायदे आपण खाली पाहू शकतो.

 • OYO मध्ये आपल्याला स्वस्तामध्ये रुम आणि हॉटेल्स Rent वर मिळतात. 
 • OYO चे अँप व वेबसाईट वापरण्यास फार सोपे आहे यामध्ये फक्त तुम्हाला कोणत्या ठिकाणी रुम पाहिजे हे टाकायचे असते. 
 • OYO अँपमध्ये तुम्हाला विविध रुम सोबत त्याची Rating व Review देखील पाहायला मिळतात. 
 • ह्या अँपमध्ये Couple साठी स्पेशल रुम मिळते. ही अँपची सर्वात खास गोष्ट आहे.

OYO Room कशी बुक करायची?

OYO अँप किंवा वेबसाईट वर रुम किंवा फ्लॅट बुक करणे फार सोपे आहे. यासाठी तुम्हाला काही साधारण स्टेप फॉलो करायच्या आहेत.

 1. सगळ्यात अगोदर फोनमध्ये OYO चे अँप किंवा वेबसाईट ओपन करा.
 2. तुम्हाला ज्या शहरामध्ये रुम हवी आहे त्या शहराचे नाव सर्च बॉक्समध्ये टाका आणि सर्च करा.
 3. तुमच्या समोर रुमची लिस्ट ओपन होईल. त्यामधील चांगले रुम तुम्ही निवडू शकता. चांगले रुम निवडण्यासाठी तुम्ही Reviews चा देखील आधार घेऊ शकता.
 4. रुम Select केल्यानंतर Payment करा. ज्या दिवशी तुम्ही रुम बुक केला आहे त्या दिवशी हॉटेल किंवा रुम वर जाऊन Check in करा.

वरील सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही सहज स्वतःसाठी रुम बुक करु शकता.

OYO Room च्या किंमती काय आहेत। What are the OYO Room rates in marathi?

ओयो रुमच्या किंमती या लोकेशन आणि सुविधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तुम्ही हवे तर १ ते २ तासांसाठी सुद्धा रुम बुक करु शकता. इथे २४ काही जण २४ तासासाठी किंवा महिन्याभरासाठी देखील रुम बुक करतात.

इथे काही तासांसाठी २०० ते ४०० रुपये आणि १ दिवसासाठी १००० ते ३००० रुपये घेतले जातात. जर तुम्हाला एका महिन्यासाठी रुम पाहिजे असेल तर रूमच्या किमती जवळपास १०,००० पासून स्टार्ट होतात.

ओयो रुमचे रेट शहरानुसार तसेच त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सुविधेनुसार बदलत असतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी रूम बुक करायची असेल तर एकदा ओयो अँप वरुन त्या भागातील रुमच्या किमती पाहून घ्या.

OYO रुमचे नियम काय आहेत। What are OYO Rooms rules in Marathi?

जर आपल्याला ओयो रुम बुक करायची असेल तर त्या अगोदर आपल्याला तेथील नियम व अटी (Rules and Regulations) माहित असणे गरजेचे असते.

ओयो रुमच्या नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.

 • रुम बुक करण्यासाठी आपले वय किमान १८ वर्षे पाहिजे.
 • हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आपल्याकडे एक valid ID Proof असायला हवे. जसे कि Identity Card, Aadhar card, Driving License, Voter ID किंवा Passport या पैकी एक काहीतरी पाहिजे.
 • Pan Card नाही चालणार.
 • तुमच्या ID Card ची कॉपी नाही चालणार. check in करताना तुम्हाला तुमचे ओरिजिनल id card दाखवावे लागेल.
 • Unmarried Couple हॉटेलमध्ये राहू शकतात.
 • हॉटेलमध्ये पाळीव प्राणी नाही नेऊ शकत.
 • ५ वर्षा पर्यंतच्या एका १ बाळासाठी हॉटेल फ्री आहे.
 • जर हॉटेलमध्ये काही नुकसान झाले तर त्याचा जबाबदार guest असेल.
 • जर काही प्रॉब्लेम झाला किंवा पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे तर त्याचा जबाबदार हॉटेल मॅनेजर असेल. त्यासाठी हॉटेल मॅनेजर किंवा तेथे असलेल्या telephone द्वारे कॉल करुन तुमची समस्या त्यांना सांगू शकता.
 • Guest ला देण्यात आलेल्या रुमला तो चांगल्या स्थितीत ठेवील. तसेच रुम स्वच्छ ठेवील.
 • ओयोमध्ये रुम वेगवेगळ्या Facility नुसार दिली जाते. इथे थोड्या किमतीपासून ते मोठ्या किमती पर्यंत रुम दिल्या जातात.
 • जर तुम्हाला smoking करायची असेल तर त्यासाठी तुम्ही हॉटेलच्या reception वर जाऊन बोलू शकता. हॉटेल मॅनेजरच्या परवानगी शिवाय smoking करु नका.
 • जर तुम्ही हॉटेलमध्ये काही illegal काम केले किंवा एखाद्याचा encounter केला तर त्यासाठी तुम्ही जबाबदार रहाल. यामध्ये हॉटेल मॅनेजर किंवा ओयो जिम्मेदार राहणार नाही.
 • ओयो जास्त करुन Couple आणि Unmarried Couple साठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही येथे सुरक्षित आहात.
 • तुम्हाला OYO अँप, वेबसाइट किंवा कॉल सेंटरद्वारे केलेली बुकिंग रद्द किंवा बदलायची असल्यास, OYO ग्राहक सेवा क्रमांक 93139 31393 वर संपर्क साधू शकता.
 • तुम्हाला बुकिंग करण्यासाठी काही मदत हवी असल्यास OYO हॉटेल बुकिंग एक्सपर्ट तुम्हाला चोवीस तास मदत करण्यासाठी उपलब्ध आहे. यासाठी तुम्ही OYO हॉटेल बुकिंग सपोर्ट क्रमांक 0124-4208080 वर संपर्क साधू शकता.

FAQ

1. OYO चा अर्थ काय आहे | OYO meaning in marathi

OYO चा Full-Form हा On Your Own असा आहे. तसेच यांच्या संपूर्ण व्यवसायाचे नाव OYO Room आहे. ज्याचा फुल फॉर्म On Your Own Rooms असा होतो.

2. OYO Room सुरक्षित आहेत का?

OYO Rooms पूर्ण सुरक्षित आहेत. हे आपल्या Guest ची सुरक्षा व Privacy ची जबाबदारी स्वतः घेतात.

3. Unmarried Couple साठी OYO Room सुरक्षित आहे का?

होय. OYO अविवाहित जोडप्यांना सुरक्षित हॉटेल provide करते. बहुतेक OYO हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना परवानगी देतात आणि local id स्वीकारतात. त्यांच्याकडे प्रशिक्षित स्टाफ आहेत जे सुरक्षा आणि privacy मिळण्याची काळजी करतात.

4. Unmarried Couple साठी OYO Room कशी बुक करायची?

अविवाहित जोडप्यांना (Ummarried Couple) परवानगी देणारे OYO रुम बुक करण्यासाठी, कोणत्याही शहरात हॉटेल शोधताना फिल्टरमध्ये “OYO Welcomes Couples” पर्याय निवडा व रुम बुक करा.

आज तुम्ही काय शिकलात ?

आजच्या या लेखामध्ये आपण OYO म्हणजे काय(oyo meaning in marathi) पाहिले. तसेच त्याद्वारे आपल्याला कोणत्या सुविधा मिळतात या विषयी देखील संपूर्ण माहिती पाहिली. ऐवढी माहिती घेतल्यानंतर तुम्हाला OYO विषयी काही शंका राहणार नाही. वरील माहिती विषयी जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारु शकता.

Leave a Comment