Low Investment Business – गरीब असो किंवा मध्यम वर्गीय, कोणी पण सुरु करु शकते केळ्याची पावडर बनवण्याचा व्यवसाय

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

वेगवेगळ्या बिझनेस आयडियाची माहिती घेत आहात पण कळत नाही कोणता व्यवसाय सुरु करावा तर मग आजचा हा बिझनेस तुमच्यासाठी योग्य राहील. कमी गुंतवणुकीत आणि भरपूर मागणी असणारा हा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य राहील.

हा व्यवसाय आहे केळ्याची पावडर बनवण्याचा. कदाचित फार कमी लोकांनी या व्यवसायाबद्दल ऐकले असेल. पण हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला या व्यवसाय विषयी आवश्यक ती माहिती देऊ.

यामुळे आहे केळीच्या पावडरला मागणी

केळीच्या पावडरचा वापर आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जातो. बीपी कंट्रोल करण्यासाठी आणि पाचन शक्ती मजबूत करण्यासाठी ही फार फायदेशीर असते. तसेच चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आणि त्वचा मऊ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात केळ्याची पावडर वापरली जाते.

केळीची पावडर बनवण्याचा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरु होऊन लगेच नफा मिळून देतो. त्यामुळे देखील या व्यवसायाची मागणी वाढत चालली आहे.

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक घटक

या व्यवसायात केळीची पावडर बनवण्यासाठी तुम्हाला मशीनची आवश्यकता असते. एक ड्रायर मशीन आणि दुसरी म्हणजे मिक्सिंग मशीन. केळ्याची पावडर बनवण्याची मशीन तुम्हाला बाजारामध्ये १५ ते ५० हजार रुपयांत मिळून जाईल. ही मशीन तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करु शकता.

या व्यतिरिक्त तुम्हाला या व्यवसायामध्ये Raw Material म्हणजे केळ्यांची गरज पडेल. यासाठी तुम्ही बाजारातून मोठ्या प्रमाणात केळी खरेदी करु शकता. जर तुम्हाला केळी कमी भावामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांशी संपर्क करु शकता. भारतात मोठ्या प्रमाणात केळ्यांचे उत्पादन केले जाते. त्यामुळे तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून केळी घेतल्यास कमी भावात चांगली केळी मिळतील.

केळीची पावडर बनवण्याची प्रोसेस

केळ्याची पावडर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणामध्ये केळी स्वच्छ धुवून घ्या. नंतर केळी सोलून सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात 5 मिनिटे ठेवा. त्यानंतर सायट्रिक ऍसिडच्या बाहेर केळी काढून ती २४ तास वाळवा. नंतर त्याचे छोटे तुकडे करुन मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. केळ्याची पावडर होई पर्यंत केळी मिक्सरमध्ये बारीक करत रहा.

हे पहा – फक्त ५००० रुपयात मिळेल अशा स्टोअरचे लायसन्स ज्याला पीएम मोदी करतात प्रमोट

कमाई किती होईल?

बाजारामध्ये केळ्याची पावडर ८०० ते १००० प्रति किलो विकली जाते. जर तुम्ही दिवसाला ५ किलो केळ्याची पावडर बनवून विकली तर तुम्ही सहज दिवसाला ४ ते ५ हजार रुपये कमवाल. जर तुम्ही दिवसाला जास्त प्रमाणात केळ्याची पावडर बनवू लागले तर अधिक नफा देखील कमवू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment