Small Business Idea – फक्त ५००० रुपयात मिळेल अशा स्टोअरचे लायसन्स ज्याला पीएम मोदी करतात प्रमोट

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

तुम्हाला देखील स्वतःचा लहान व्यवसाय सुरु करायचा आहे का? मग कदाचित हा व्यवसाय तुमच्यासाठी एकदम योग्य राहील कारण या व्यवसायाला चक्क पीएम मोदी प्रमोट करत आहे. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हाला चांगले पैसे कमवून देऊ शकतो.

पीएम मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्यावर घोषणा केली की भारतातील प्रत्येक भागात जन औषधी केंद्र खोलले जातील. तसेच या औषधांची विक्री करण्यासाठी सरकार सर्व मदत करेल.

जन औषधी केंद्र काय आहे आणि कोण खोलू शकते?

जन औषधी केंद्र एक प्रकारचे मेडिकल स्टोअर आहे. ज्यामध्ये आपल्याला सर्व आवश्यक असलेली औषधे मिळतात. जर तुमच्याकडे डी फार्मा किंवा बी फार्माची डिग्री असेल तर तुम्ही या लायसन्ससाठी Apply करु शकता किंवा मग हे लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला डी फार्मा/बी फार्माची डिग्री असणाऱ्या पदवी धारकाला नियुक्त करावे लागेल.

फक्त ५००० रुपयांमध्ये तुम्हाला हे लायसन्स मिळून जाईल. तसेच हे स्टोअर टाकण्यासाठी तुम्हाला १२० स्केवर फिट जागा असणे आवश्यक आहे. ही जागा तुमची स्वतःची किंवा भाड्याने घेतली तरी चालते. खालील लिंक वर क्लिक करुन तुम्ही जन औषधी केंद्रासाठी Apply करु शकता.

Apply Bhartiya Jan Aushadhi Kendra

लोक जन औषधी केंद्रातून औषधे का घेतील?

कमी किंमतीमध्ये उच्च गुणवत्ता असलेली औषधे पुरवण्यासाठी या केंद्राची स्थापना देशात सगळीकडे करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा ५० ते ९० टक्के स्वस्त औषधे मिळतात. ज्यामुळे लोकांना कमी पैशात उच्च गुणवत्ता असलेली औषधे मिळतील. यामुळे फक्त गरीब व्यक्तीला नाही तर मध्यम वर्गीय माणसांना देखील खूप फायदा मिळेल.

हे पहा – गरीब असो किंवा मध्यम वर्गीय, कोणी पण सुरु करु शकते केळ्याची पावडर बनवण्याचा व्यवसाय

जन औषधी केंद्रातून किती कमाई होईल?

इतर मेडिकल स्टोअरपेक्षा जन औषधी केंद्रामध्ये औषधे कमी दरात मिळत असल्याने यामध्ये आपली कमाई देखील थोडी कमी होते. पण औषधा व्यतिरिक्त इतर गोष्टी जसे कि प्रोटीन पावडर, सप्लिमेंट विकून चांगले पैसे मिळतात.

मोठ्या मेडिकल किंवा हॉस्पिटल जवळ तसेच घरपोच औषधे पुरवून लोक जन औषधी केंद्रातून जास्त पैसे कमवत आहे. सध्या भारतात 10,000 हून अधिक PMJAK(पीएम जन औषधी केंद्र) यशस्वीरित्या कार्यरत आहेत.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

2 thoughts on “Small Business Idea – फक्त ५००० रुपयात मिळेल अशा स्टोअरचे लायसन्स ज्याला पीएम मोदी करतात प्रमोट”

  1. अशा सरकारी योजनेची सर्वांना गरज असते ते तुमच्या लेख मधून लोकांपर्यंत पोहचत आहे खूपच छान.
    माझेही सरकारी योजनेबद्दल,आरोग्याबद्दल लेख आहेत ते तुमच्या website ला माझी website ची लिंक द्याल का?

    Reply

Leave a Comment