देशामध्ये आपल्याला विविध ब्रँडचे मोबाईल पहायला मिळतात. पण या सर्व मोबाईलमध्ये ब्रँड जर कोणता मोबाईल असेल तर तो केवळ आयफोनचं आहे. संपूर्ण जगात आयफोनचे मार्केट खूप मोठे आहे. आयफोन खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते.
आयफोनमध्ये आपल्याला बरेच असे फीचर्स दिलेले असतात जे त्या फोनमध्ये काय काम करत असतात हे आपल्याला माहित नसते. आणि आपण कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही. असेच एक आयफोन मधील इंटरेस्टिंग फिचर म्हणजे त्याच्या कॅमेरा जवळील छोटे छिद्र. जेवढे लोक आयफोन वापरतात त्यातील बऱ्याच जणांना हे छिद्र कशासाठी आहे माहीत नसते.
कशासाठी वापरले जाते हे छिद्र
आयफोनमध्ये मागच्या बाजूस कॅमेरा जवळ असलेल्या या छिद्राला माइक्रोफोन असे म्हणतात. पण हा तो माइक्रोफोन नाही जो तुमचा आवाज ऐकेल. खरे तर याचे काम वेगळेच असते. जेव्हा तुम्ही फोन वर एखाद्या व्यक्तीशी बोलत असता किंवा कॅमेराने विडिओ रेकॉर्ड करत असता तेव्हा हा माइक्रोफोन बॅकग्राऊंड नॉईसला काढून टाकतो.
ज्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी फोन वर बोलत असता तेव्हा त्या व्यक्तीला फक्त तुमचा आवाजच ऐकू जातो. तुमच्या आजूबाजूला असणारा आवाज त्याला ऐकू येत नाही. यामुळे तुम्हाला फोन वर बोलताना एक चांगला अनुभव मिळतो.
आयफोनमध्ये एकूण ३ माइक्रोफोन असतात. त्यातील एक बॅक कॅमेरा, दुसरा फ्रंट कॅमेरा जवळ असतो आणि एक खाली स्पीकर जवळ असतो.
आयफोनच्या सगळ्या मॉडेलमध्ये असते हे छिद्र
मार्केटमध्ये आयफोनचे जवळपास जेवढे देखील मॉडेल आहे त्या सर्वांमध्ये तुम्हाला हे छिद्र पहायला मिळते. तसेच मागील २ ते ३ वर्षात जे मॉडेल्स आयफोनने लाँच केले आहेत त्या सर्वांमध्ये हे छिद्र तुम्हाला हमखास मिळते.
हे पहा – तुमचा मोबाईल देखील ट्रॅक होत आहे का? जाणून घ्या मोबाईल ट्रॅक होण्याची लक्षणे
बऱ्याच लोकांना वाटायचे हे छिद्र आपला आवाज ऐकण्यासाठी आहे पण मुळात याचे काम बॅकग्राऊंड नॉईस काढून टाकणे आहे. जर तुमच्या एखाद्या मित्रा जवळ आयफोन असेल तर त्याला ही माहिती नक्की शेअर करा.
अशाच तंत्रज्ञानातील अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇