गाडीच्या नंबर वरुन काढा मालकाचे नाव आणि पत्ता, केवळ २ मिनिटात निघतील सर्व डिटेल्स

कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन त्याच्या मालकाचे नाव माहित करुन घेणे आज फार सोपे झाले आहे. गाडीच्या नंबर वरुन आपल्याला सर्व माहिती फक्त एका क्लिक वर मिळते. 

तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल कि गाडीचा अपघात झाल्यानंतर लोक पळून जातात. अशा वेळेस जर तुम्हाला ज्याच्यामुळे अपघात झाला आहे त्याच्या गाडीचा नंबर माहित असेल तर तुम्ही त्याला पकडू शकता. तसेच तुम्ही अशा प्रकारे पोलिसांची मदत देखील करु शकता.

गाडीचा नंबर माहित असण्याचा फायदा तुम्हाला तेव्हा देखील होतो जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करायला जाता. तुम्हाला जी सेकंड हॅन्ड गाडी आवडली आहे ती कुणाची होती, केव्हा घेतली होती तसेच गाडीला किती वर्षे झाले आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला माहित करुन घेणे सोपे जाते. विविध परिस्थितीत तुम्ही हि ट्रिक वापरुन स्वतःची तसेच इतर गरजू व्यक्तीची देखील मदत करु शकता. 

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा हे सांगणार आहे. यासाठी तुमच्या जवळ फक्त एक फोन आणि इंटरनेट असणे गरजेचे आहे. गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता जाणून घेण्यासाठी काही सोप्या ट्रिक आहेत ज्या आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे.

गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव माहित करुन घेण्यासाठी आपण येथे काही पद्धतींचा वापर करणार आहोत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तिचा तुम्ही वापर करु शकता. चला तर आपण आता गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा हे पाहूया. 

1. अँपचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोअर वर जाऊन mParivahan हे अँप डाउनलोड करावे लागेल. अँप डाउनलोड केल्यानंतर ते Install करा व नंतर मग ते ओपन करा. अँप ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिसेल. तेथे RC या Option वर क्लिक करुन गाडीचा नंबर टाका.

तुम्हाला ज्या गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता माहित करुन घ्यायचा आहे त्या गाडीचा नंबर येथे टाकायचा आहे. गाडी नंबर टाकल्यानंतर सर्च बार वर क्लिक करा. तुम्हाला त्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता हि सर्व माहिती समोर दिसेल. 

2. मेसेजचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

तुम्हाला जर फोनमध्ये अँप install न करता एखाद्या गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव माहित करुन घ्यायचे असेल तर तुम्ही मेसेजचा वापर करुन हे काम करु शकता. जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा नसेल तर हा पर्याय तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे. हि सुविधा तुम्ही २४ तास वापरु शकता. 

मेसेजच्या माध्यमातून मालकाचे नाव आणि पत्ता जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या फोन मधील मेसेज अँप ओपन करावे लागेल. त्यानंतर मेसेज बॉक्समध्ये कॅपिटल लेटरमध्ये VAHAN असे टाईप करा. मग स्पेस देऊन गाडीचा नंबर टाका. हा मेसेज 7738299899 या नंबर वर पाठवा. (उदा: VAHAN <space> गाडीचा नंबर) 

मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ID Vahan कडून एक मेसेज येईल. ज्यामध्ये गाडी नंबर असलेल्या मालकाचे नाव आणि पत्ता तुम्हाला पहायला मिळेल. 

3. वेबसाईटचा वापर करुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा पहायचा?

वेबसाईटचा वापर करुन तुम्ही केवळ २ मिनिटात गाडीच्या मालका विषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून मालकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर vahaninfos.com वर जावं लागेल. तेथे खाली गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा नंबर टाकून कॅपचा भरावा लागेल. 

कॅपचा भरुन झाल्यावर Submit बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला गाडीच्या नंबर वरुन सगळी माहिती मिळेल. जसे कि ती गाडी कुणाच्या नावावर रजिस्टर आहे. गाडी केव्हा घेतली गेली होती या प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. 

हे पहा – आता प्रत्येक व्यक्तीला मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, केवळ ५ मिनिटात काढा तुमचे आयुष्मान कार्ड

अपघात झाल्यानंतर किंवा जुनी गाडी विकत घेताना गाडी विषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही वरील तीन मार्गांपैकी कोणता हि एक मार्ग वापरु शकता. गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव आणि पत्ता पाहण्यासाठी तुम्हाला जो मार्ग सोपा वाटेल तुम्ही तो निवडू शकता.

अशाच प्रकारची तंत्रज्ञानातील अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment