एका लॅपटॉपच्या मदतीने सुरु करा हा ऑनलाईन व्यवसाय, गुगल सोबत काम करुन होईल लाखोंची कमाई

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आपल्याला भांडवलाची फार आवश्यकता असते. पण इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कमी भांडवलामध्ये सुद्धा व्यवसाय करणे आता शक्य झाले आहे. आजचा हा व्यवसाय देखील असाच पूर्णपणे इंटरनेट वर अवलंबून आहे. हा व्यवसाय तुम्ही फक्त एका लॅपटॉपच्या माध्यमाने सुरु करु शकता. तसेच येणाऱ्या काळात या व्यवसायाची डिमांड आणखी वाढत जाणार आहे.

गुगल सोबत सुरु करा व्यवसाय

एका लॅपटॉपच्या मदतीने तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता आणि यामध्ये गुगल तुम्हाला फार मदत करेल. हा व्यवसाय आहे Digital Advertising करण्याचा.

सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या दुकानदारांना आपल्या सर्विस किंवा प्रॉडक्टची जाहिरात ही ऑफलाईन सोबत ऑनलाईन करणे देखील गरजेचे झाले आहे. पण ऑनलाईन स्वतःच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसची जाहिरात कशी करायची हे त्यांना कळत नाही. मग या कामामध्ये तुम्ही त्यांची मदत करु शकता.

तुम्ही स्वतः एक Digital Advertising Agency सुरू करु शकता. या एजंसीमध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकल मार्केट मधील दुकानदारांना त्यांची ऑनलाईन ब्रॅंडिंग करुन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रॉडक्ट विषयी लोकांना माहिती देण्यासाठी इंटरनेट वर एड्स चालवू शकता. जर तुम्हाला लोकांसाठी एड्स चालवायच्या असतील तर तुम्हाला Google Ads कशा चालवायच्या हे माहित असणे गरजेचे आहे.

गुगल एड्स शिकून घेण्यासाठी तुम्ही युट्युबचा वापर करु शकता. चांगल्या प्रकारे एड्स कशा रन करायच्या हे शिकल्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या मार्केटमध्ये जाऊन तेथील दुकानदारांना तुम्ही त्यांची ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी कशा प्रकारे मदत करु शकता हे समजावून सांगा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करु शकता.

Client कोठून आणाल?

Digital Advertising Agency व्यवसाय सुरु करुन चांगले पैसे कमवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही client ची आवश्यकता आहे. तुमच्या सर्विस खरेदी करणारे क्लायंट शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेल्या मार्केटचा सर्वे करणे. तुम्ही जेथे राहता तेथे अशी काही दुकाने नक्की असतील जे त्यांच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत असतील. असे लोक तुम्हाला शोधायचे आहेत.

या व्यतिरीक्त तुम्ही ऑनलाईन देखील क्लायंट शोधू शकता. ऑनलाईन क्लायंट शोधण्यासाठी तुम्ही फ्रिलांसींग वेबसाईट जसे की fiverr, upwork सारख्या वेबसाईटचा वापर करु शकता.

हे पहा – मशीनद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या पेस्टला आहे मोठ्या प्रमाणात मागणी, वर्षाच्या शेवटी होईल करोडोंची कमाई

भांडवल आणि कमाई

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त एका लॅपटॉपची आवश्यकता असते. ३० हजारामध्ये तुम्हाला एक चांगला लॅपटॉप ऑनलाईन किंवा ऑफलाईन मिळून जाईल. Digital Advertising Agency सुरु करुन तुम्ही महिन्याला ५० हजारापासून ते १ लाखांपर्यंत महिन्याला कमवू शकता.

जेवढे जास्त लोक तुमच्याकडे त्यांच्या सर्विसची जाहिरात करण्यासाठी येतील तेवढी जास्त कमाई तुम्ही या व्यवसायातून करु शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment