Low Investment Business – केवळ १० हजारामध्ये सुरु होणारा हा व्यवसाय तुम्हाला दिवसाला २ ते ३ हजार कमवून देईल.

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जेव्हा पासून मोदींचे सरकार आले आहे तेव्हा पासून देशामध्ये स्वयंरोजगार प्राप्त होण्यासाठी ते व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विविध प्रकारे मदत करत आहे. त्यामुळे ज्यांना नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्याची फार इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एकदम योग्य वेळ आहे.

आज आम्ही तुम्हाला ज्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे हा व्यवसाय तुम्ही देशामध्ये कुठे ही सुरु करु शकता आणि महिन्याला किमान ६० हजार रुपये सहज कमवू शकाल. या व्यवसायामध्ये गुंतवणूक देखील फार कमी लागते. त्यामुळे मध्यम वर्गीय माणूस देखील हा व्यवसाय सुरु करु शकतो.

Pollution Testing Center खोलून होईल चांगली कमाई

केंद्र सरकारने सगळीकडे Motor Vehicles Act लागू केला आहे. त्यामुळे Pollution Testing Center व्यवसाय देशामध्ये चांगल्या प्रकारे वाढत चालला आहे. देशामध्ये बाईक असो किंवा कार प्रत्येक गाडीचे प्रदूषण सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. प्रदूषण सर्टिफिकेट(PUC certificate) नसलेल्या गाडीला जवळपास १ हजार ते १० हजाराच्या आसपास दंड भरावा लागतो.

दंड भरण्यापासून वाचण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गाडीचे पीयूसी करुन घेतात. त्यामुळे Pollution Testing Center टाकून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

PUC केंद्र खोलण्यासाठी नियम

polution control centre

जर तुम्हाला पीयूसी केंद्र खोलायचे असेल तर त्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींचे पालन करणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

  • प्रदूषण तपासणी केंद्र फक्त पिवळ्या रंगाच्या केबिनमध्येच उघडता येईल.
  • केबिन हे २.५ मीटर लांब २ मीटर रुंद आणि २ मीटर उंच असायला हवे.
  • प्रदूषण नियंत्रण केंद्रावर परवाना क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
  • देशाचा कोणता ही नागरिक हे केंद्र खोलू शकतो.
  • ज्या व्यक्तीच्या नावावर पीयूसीचा परवाना आहे, त्यालाच ते चालवण्याचा अधिकार असेल. इतर कोणी चालवल्यास कारवाई होऊ शकते.
  • प्रदूषण चाचणी केंद्राने सर्व वाहनांचा तपशील एक वर्षासाठी ठेवणे आवश्यक आहे.
  • प्रदूषण चाचणी केंद्राने वाहनाच्या प्रदूषण तपासणीचे छापील प्रमाणपत्र द्यावे आणि प्रमाणपत्रावर सरकारी स्टिकर असणे आवश्यक आहे.
  • पीयूसी केंद्र उघडण्यासाठी एखादा व्यक्ती किमान आयटीआय असला पाहिजे. त्याच्याकडे ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग, मोटर मेकॅनिक्स, ऑटो मेकॅनिक्स किंवा स्कूटर मेकॅनिक्स यापैकी एक डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वरील अटी पूर्ण केल्यास तुम्ही पीयूसी केंद्र खोलण्याचा व्यवसाय सुरु करु शकता.

पीयूसी केंद्र खोलण्यासाठी Apply करा

किती पैसे गुंतवावे लागतील?

प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट सेंटर खोलण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी फी आकारली जाते. दिल्लीमध्ये परिवहन विभाग केवळ 5 हजार रुपये वार्षिक फी घेते. अशा पीयूसी केंद्राचा परवाना केवळ एका वर्षासाठी असतो त्यामुळे तुम्हाला हे दरवर्षी रिन्यू करावे लागते. जर पीयूसी लायसन्स रिन्यू केले नाही तर ५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो.

लायसन्स फी व्यतिरिक्त तुम्हाला पीयूसी केंद्र खोलण्यासाठी पिवळ्या रंगाचे एक केबिन तयार करण्यासाठी खर्च येतो. या व्यतिरिक्त गाड्यांचे प्रदूषण चेक करण्यासाठी मशीन खरेदी करावी लागते त्याचा देखील खर्च असतो.

हे पहा – एका लॅपटॉपच्या मदतीने सुरु करा हा ऑनलाईन व्यवसाय, गुगल सोबत काम करुन होईल लाखोंची कमाई

दिवसाला होईल २ हजार रुपये कमाई

एकदा तुम्हाला पीयूसीचे Approval मिळाले तर तुम्ही स्कुटी, बाईक, रिक्षा आणि कारचे प्रदूषण चेक करुन दिवसाला २ ते ३ हजाराच्या आसपास पैसे कमवू शकता. बाईकचे प्रदुषण चेक करण्यासाठी ३० ते १०० रुपये चार्ज घेतले जातात आणि कारचे प्रदुषण चेक करण्यासाठी २५० रुपये घेतले जातात.

जर तुम्ही हे पीयूसी केंद्र पेट्रोल पंपाच्या किंवा हायवेच्या जवळ टाकले तर जास्तीत-जास्त गाड्यांचे प्रदूषण चेक करुन तुम्ही दिवसाला २ हजार म्हणजे महिन्याला ६० हजार कमवू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment