सध्या महाराष्ट्रात सणांचे दिवस एका मागून एक येत आहे. आता सगळीकडे नवरात्रीचा उत्सव चालू आहे. मग त्यानंतर काही दिवसांमध्ये दिवाळी सुरु होईल. सणांच्या या दिवसांमध्ये मार्केटमध्ये विविध प्रकारच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असते.
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर या १ ते २ महिन्यांमध्ये तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्री पासून ते दिवाळी पर्यंत अशा काही बिझनेस आयडिया सांगणार आहोत ज्या या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चालतात.
पूजा साहित्याचे दुकान
आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांना मानणारे आणि विविध भाषा बोलणारे लोक आहेत. त्यामुळे विविध धर्मा नुसार देवाची पूजा करण्याची प्रत्येकाची प्रथा देखील वेगवेगळी असते. दिवे, धूप, अगरबत्ती आणि शंख या सारख्या पूजेच्या साहित्याची मागणी नेहमीच असते. पण सणांच्या दिवसांमध्ये ही मागणी फार वाढते.
पूजेचे साहित्याचे दुकान टाकण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची आवश्यकता नसते. जर तुम्ही कायमस्वरुपी हा व्यवसाय करणार असाल तर एक छोटे दुकान भाड्याने घेऊ शकता आणि जर तुम्हाला हा व्यवसाय फक्त सणांच्या दिवसामध्ये करायचा असेल तर एका छोट्याश्या गाडीवर देखील तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता.
मूर्ती बनवण्याचे काम

जर तुमच्याकडे मूर्ती बनवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही गणेश चतुर्थीसाठी गणपतीच्या आणि लक्ष्मी पूजनसाठी लक्ष्मी देवीची मूर्ती तयार करु शकता. सणांच्या दिवसांमध्ये लोक पूजन करण्यासाठी अशा प्रकारच्या मूर्ती जास्त प्रमाणात खरेदी करत असतात.
मूर्ती ही साधारणपणे माती पासून तयार केली जाते. मूर्ती बनवण्यासाठी मातीची व्यवस्था मोफत कोठून ही होईल. तुम्हाला फक्त मूर्तीवर रंगकाम करण्यासाठी कलर खरेदी करावे लागतील. एका मूर्ती मागे तुम्हाला साधारणपणे ५० टक्के प्रॉफिट मार्जिन तर नक्कीच राहील.
मेणबत्ती बनवणे
मेणबत्तीची मागणी ही संपूर्ण वर्ष असते पण सणांच्या कालावधीमध्ये मागणी खूप वाढते. सणांच्या दिवसांमध्ये घर सजवण्यासाठी तसेच दिवाळीमध्ये सगळीकडे प्रकाशाचा लखलखाट करण्यासाठी मेणबत्ती भरपूर प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे तुम्ही मशीनच्या साहाय्याने मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय देखील सुरु करु शकता.
मातीचे दिवे
दसऱ्या पासून ते दिवाळी संपेपर्यंत बाजारामध्ये मातीच्या दिव्याची मागणी भरपूर प्रमाणात असते. दसऱ्याच्या दिवशी देवीची पूजा करण्यासाठी लोक मातीचे दिवे वापरतात. या सोबतच दिवाळीमध्ये संध्याकाळी प्रत्येक घराच्या उंबऱ्यामध्ये मातीचे दिवे लावलेले तुम्हाला पहायला मिळतात. दिवाळीमध्ये मातीचे दिवे न वापरता कोणत्याही प्रकारची सजावट केली जात नाही.
हे पहा – ५० हजारच्या भांडवला सोबत वर्षाला होईल १२ लाखांची कमाई, सोबत ४ महिने मिळेल सुट्टी
सजावटीचे सामान

सणांच्या दिवसामध्ये प्रत्येक जण घराला किंवा दुकान सजवण्यासाठी मार्केट मधून वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे सामान खरेदी करत असतो. यामध्ये प्लास्टिक पासून बनलेली फुले, लाईट या सारखे भरपूर सजावटीचे सामान लोक खरेदी करतात. तुम्ही अशा प्रकारचा माल रिटेलमध्ये विकू शकता. तसेच सोसायटीच्या बाहेर स्वतःचा स्टॉल देखील लावू शकता.
अशा प्रकारच्या बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇