Domain Name म्हणजे काय आणि हे कसे काम करते।Domain meaning in marathi

तुम्ही इंटरनेट वापरत असताना जेव्हा कोणत्या वेबसाईट वर जाता तेव्हा तेथे त्या वेबसाईटचे Domain Name असते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना Domain Name म्हणजे काय(Domain meaning in marathi) हे माहित नसते त्यामुळे वेबसाईट वर गेल्यावर डोमेन नाव कुठे असते हे देखील सांगता येत नाही.

डोमेन म्हणजे एखाद्या वेबसाईटला दिलेले नाव असते. हे नावच आपल्याला इंटरनेट वर हवी असलेली वेबसाईट शोधण्यासाठी मदत करते. 

तुमच्या पैकी काही जणांना डोमेन नाव काय असते माहित असेल पण ते का वापरले जाते व कसे काम करते हे माहित नसेल. यासाठी आज आपण खालील माहितीमध्ये Domain Name म्हणजे काय(Domain meaning in marathi) आणि हे कसे काम करते या विषयी सखोल माहिती पाहणार आहे.

Domain म्हणजे काय।Domain meaning in marathi

Domain नाव म्हणजे DNS (Domain Name System) हे त्या वेबसाईटचे नाव असते. वेबसाईटला दिलेल्या नावामुळे आपण ती वेबसाईट कायम लक्षात ठेऊ शकतो तसेच गरज पडल्यास ती browser मध्ये ओपन करु शकतो. 

इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या  प्रत्येक वेबसाईटला आपण जरी त्याच्या डोमेन नावाने ओळखत असलो. तरी त्या वेबसाईटच्या मागे एक IP Address असतो जो इंटरनेट वरील त्या वेबसाईटचा मूळ पत्ता असतो. 

इंटरनेट वरील सर्व वेबसाईट एकमेकांशी आईपी ऍड्रेसच्या मदतीने Communication(संवाद) करत असतात. ह्या वेबसाईट एकमेकांशी कशा प्रकारे संवाद करतात हे जाणून घेण्याअगोदर तुम्हाला IP Address विषयी माहित असणे गरजेचे आहे. 

खरे सांगायचे तर आपण एखाद्या वेबसाईटचा आईपी ऍड्रेस browser मध्ये टाकून ती ओपन करु शकतो परंतु हा आईपी ऍड्रेस अंकांच्या स्वरुपात असल्याने तो आपल्या लक्षात राहणे कठीण असते. मनुष्याला अंकांपेक्षा नाव जास्त काळ लक्षात राहते म्हणून वेबसाईटला डोमेन नाव दिले जाते.

Domain Name कसे काम करते ?

जेव्हा तुम्ही वेबसाईट एखाद्या सर्वर वर host(वेबसाईटची Storage) करता तेव्हा त्या वेबसाईटचा डोमेन त्या सर्वरच्या आईपीला Point केलेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही वेबसाईटचे नाव(डोमेन नाव) Google वर किंवा browser मध्ये टाकता तेव्हा ते डोमेन नावाच्या मदतीने त्या सर्वर पर्यंत पोहोचते व तुम्हाला ती वेबसाईट ओपन करुन देते. 

खरे तर तुम्ही Search box मध्ये काय टाकले आहे हे तुमच्या डिव्हाईसला देखील माहित नसते. आपले डिव्हाईस आपण दिलेल्या डोमेन नावाच्या आधारे सर्वर पर्यंत जाते व तेथे असलेल्या आईपी ऍड्रेसच्या मदतीने आपल्याला योग्य वेबसाईट ओपन करुन देते. 

Domain नाव म्हणजे DNS (Domain Name System) अशा प्रकारे काम करते.

Domain चे प्रकार

डोमेन विविध प्रकारचे असतात. परंतु आपण येथे डोमेनचे मुख्य प्रकार पाहणार आहे. जेणे करुन तुम्ही जेव्हा डोमेन खरेदी करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला डोमेन निवडताना अडचण येणार नाही.

1. TLD – Top Level Domain

TLD(Top Level Domain) ला Internet Domain Extension असे देखील म्हणतात. हा डोमेनचा शेवटचा भाग असतो. थोडक्यात कोणत्याही वेबसाईट किंवा डोमेनच्या डॉटच्या नंतरचा भाग ज्याला Extension देखील म्हणतात.

अशा प्रकारचे डोमेन जगभरात चालतात. हे डोमेन SEO Friendly असतात व गुगल वर Rank करण्यासाठी देखील फायदेशीर असतात.

TLD डोमेनचे उदाहरण / Extension 

  • .com (Commercial)
  • .org (Organization)
  • .net (network)
  • .gov (Goverment)
  • .edu (education)
  • .name (name)
  • .biz (business)
  • info (information)

उदाहरणासाठी – Google.com, shoutmemarathi.net

2. ccTLD – Country Code Top Level Domain

अशा प्रकारचे डोमेन हे ठराविक देशापुरते मर्यादित असतात. म्हणजेच त्या डोमेन Extensionचा वापर त्या देशापुरताच मर्यादित आहे. 

ccTLD डोमेनचे उदाहरण / Extension

  • .us (United States)
  • .in (India)
  • .ch (Switzerland)
  • .cn (China)
  • .ru (Russia)
  • br (Brazil)

Subdomain Name काय असते ?

Subdomain हा कोणत्याही डोमेनचा एक अंश असतो. या सबडोमेनसाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नसते. या सबडोमेनला आपण फ्री मध्ये विविध भागांत Divide करु शकतो. 

जसे की आता ज्या ब्लॉग वर तुम्ही माहिती वाचत आहात त्याचे डोमेन नाव shoutmemarathi.net आहे. जर मी या डोमेन नावाच्या अगोदर marathi.shoutmemarathi.net लावले तर येथे marathi. हा Subdomain आहे.

Top Domain Provider in India

डोमेन खरेदी करण्यासाठी तुम्ही डोमेन Provide करणाऱ्या वेबसाईट वर जाऊन तेथून खरेदी करु शकता. मी येथे खाली काही Top Domain Provider ची नावे सांगत आहे त्यापैकी कोणत्याही वेबसाईट वरुन तुम्ही डोमेन खरेदी करु शकता.

  • BigRock
  • GoDaddy
  • Namecheap
  • ZNetLive
  • HostGator

वरीलपैकी कोणत्याही डोमेन Provide करणाऱ्या वेबसाईट वरुन तुम्ही डोमेन खरेदी करु शकता.

Domain Name खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ?

डोमेन नाव खरेदी करताना काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. या महत्वाच्या गोष्टी खाली वाचू शकता.

  • डोमेनचे नाव लहान असावे जेणे करुन लक्षात राहील. 
  • डोमेनचे नाव अशा प्रकारे असावे जे बोलायला व टाईप करायला सोपे असेल. 
  • डोमेन नावामध्ये नंबर टाकू नका.
  • नेहमी Top Level Domain घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे डोमेन संपूर्ण जगात दिसेल व इतर लोकांना माहित होईल. 
  • व्यवसायासाठी डोमेन खरेदी करत असाल तर व्यवसायाला अनुसरुन डोमेन नाव खरेदी करा. जेणे करुन तुम्हाला Brand तयार करता येईल.

वरील गोष्टींची काळजी तुम्ही डोमेन खरेदी करण्यापूर्वी घेतली पाहिजे.

आज तुम्ही काय शिकलात ?

कोणताही व्यवसाय ऑनलाईन घेऊन जायचा असेल तर त्या व्यवसायाची वेबसाईट असणे आवश्यक आहे. ही वेबसाईट बनवण्यासाठी डोमेन नाव असणे फार महत्वाचे आहे. आज आपण वरील लेखात Domain Name म्हणजे काय(Domain meaning in marathi) आणि हे कसे काम करते या विषयी माहिती पाहिली.

तुम्ही स्वतःचे डोमेन नाव जेव्हा खरेदी करणार असाल तेव्हा तुम्हाला वरील माहिती वाचल्याचा फायदा होईल.

आपल्या ब्लॉगवर अशीच तंत्रज्ञानाशी निगडित उपयुक्त माहिती पोस्ट होत असते. वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल व या ब्लॉगवर पोस्ट होणाऱ्या अशाच उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवायची असेल तर उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

2 thoughts on “Domain Name म्हणजे काय आणि हे कसे काम करते।Domain meaning in marathi”

  1. Domain & hoistenger connect केल्यानंतर आपण कोठे ब्लॉग लिहू शकतो.
    ब्लॉग कसा लिहावा, व publish कोठे करावा.
    मला blogging करायचे आहे.

    Reply
    • Domain आणि hosting connect केल्यानंतर तुम्हाला पहिले server मध्ये wordpress install करावे लागेल. wordpress कसे install करायचे या साठी तुम्ही youtube video पाहू शकता.

      Reply

Leave a Comment