Server म्हणजे काय आणि कसा काम करतो।Server meaning in marathi

Server हा एक प्रकारचा कॉम्प्युटरच असतो जो वेबसाईटला चालवण्याचे काम करतो. सर्व्हरचा मुख्य उद्देश हा माहिती गोळा करुन ठेवणे व जेव्हा एखादा User वेबसाईट ओपन करेल तेव्हा त्याला ती माहिती दाखवणे हा असतो. 

ही झाली सर्व्हर विषयी थोडक्यात माहिती 

सर्व्हर हा शब्द तुम्ही कदाचित फार वेळा ऐकला असेल. खास करुन विद्यार्थी मित्रांनी हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. 

जेव्हा तुम्ही परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरायला जाता तेव्हा कधी-कधी तुम्ही ऐकले असेल कि सर्व्हर डाऊन झाला आहे त्यामुळे फॉर्म भरता येणार नाही. 

तसेच सरकारी नोकरीसाठी जेव्हा भरती निघते तेव्हा खूप जण एकाच वेळेस फॉर्म भरायला वेबसाईट ओपन करतात. यामुळे त्या वेबसाईटच्या सर्व्हर वर लोड येण्यास सुरुवात होते. आणि मग अशा वेळेस सुद्धा सर्व्हर डाऊन होतो. 

सर्व्हर विषयी थोडक्यात माहिती आपण वर पाहिली. पण जर तुम्हाला सर्व्हर विषयी विस्तारमध्ये माहिती हवी असेल कि Server म्हणजे काय (Server meaning in marathi) आणि कसा काम करतो. तसेच याचे प्रकार या विषयी जर सखोल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला इथे मिळेल.

Server म्हणजे काय।Server meaning in marathi

सर्व्हर हा एक प्रकारचा कॉम्प्युटरच असतो जो दुसऱ्या कॉम्प्युटरला सेवा किंवा माहिती देण्याचे काम करतो. सर्व्हर हा इंटरनेटच्या माध्यमातून Users ला जी माहिती पाहिजे ती देण्याचे काम करतो. 

सर्व्हरमध्ये खूप वेगवेगळ्या वेबसाईटची माहिती ही Store करुन ठेवलेली असते. आणि जेव्हा एखादा user ही माहिती वाचण्यासाठी किंवा पाहण्यासाठी Access मागतो. तेव्हा सर्व्हर त्याने मागितलेली माहिती त्याला दाखवतो.

उदाहरण द्यायचे झाले तर, तुम्ही आता जी सर्व्हर विषयी माहिती वाचत आहे हि देखील कुठल्या तरी सर्व्हरमध्ये Store करुन ठेवलेली आहे. 

जेव्हा तुम्ही ” Server म्हणजे काय आणि कसा काम करतो ” हि माहिती वाचण्यासाठी क्लिक केले तेव्हा सर्व्हरने हि माहिती तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिली. 

जसे आपण Youtube वर एखादी व्हिडिओ सर्च करतो किंवा वेब ब्राऊझरमध्ये काही तरी माहिती सर्च केल्यानंतर जे Result आपल्या समोर येतात त्या Result मधील सर्व माहिती ही सर्व्हरमध्ये कुठे तरी Save करुन ठेवलेली असते. 

युट्युब मधील किंवा वेब ब्राऊझर मधील अशा Result वर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला ती माहिती पहायची आहे अशी Request सर्व्हर पर्यंत जाते आणि सर्व्हर ती माहिती आपल्याला देतो. 

जगामध्ये वेगवेगळी क्षमता असलेले सर्व्हर आपल्याला पहायला मिळतात. जर आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये सर्व्हरचा प्रोग्रॅम Install केला तर आपला कॉम्प्युटर देखील एका सर्व्हर प्रमाणे काम करण्यास सुरुवात करेल.

परंतु, अशा सर्व्हरला Non-dedicated Server असे देखील म्हणतात. कारण हे २४ तास चालू राहून काम करण्यासाठी बनलेले नसतात.

पण काही कॉम्प्युटर असे देखील असतात जे २४ तास चालू राहतात आणि दुसऱ्या कॉम्प्युटरला माहिती देतात अशा कॉम्प्युटरला Dedicated Server असे म्हणतात.


सर्व्हरचे प्रकार 

गरजेनुसार सर्व्हरचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पहायला मिळतात. आता पर्यंत आपण सर्व्हर म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेतले. या नंतर सर्व्हरचे प्रकार कोणते आहेत हे पाहूया.

1. Web Server

वेब सर्व्हरचे काम हे वेबसाईटला आणि त्यामध्ये असलेल्या माहितीला Manage करणे असते. जेव्हा User एखादी माहिती पाहण्यासाठी Request पाठवतो तेव्हा सर्व्हर ती माहिती User ला उपलब्ध करुन देतो.

2. File Server

फाईल सर्व्हरमध्ये विविध फाईल असतात. जसे कि Text Document, Photo, Video इत्यादी. या सर्व एकत्र ठेवलेल्या असतात. फाईल सर्व्हरचे काम हे डेटा फाईलला स्टोअर करणे आणि त्यांना Manage करणे असते. 

3. Print Server

प्रिंटर सर्व्हर वेगवेगळ्या Client ला एकाच वेळेस अनेक प्रिंटर सोबत सामूहिक पद्धतीने जोडण्याचे काम करते. 

4. Database Server

डेटाबेस सर्व्हर विविध डेटा मॅनेज करण्याचे काम करते. याच्या मदतीने तुम्ही अनेक कॉम्प्युटर वर स्वतःचा डेटा स्टोअर आणि मॅनेज करु शकता.

5. FTP Server

FTP चा फुल फॉर्म हा File Transfer Protocol असा आहे. या सर्व्हरचा उपयोग फाईल पाठवण्यासाठी तसेच ती प्राप्त करण्यासाठी केला जातो. हे नेटवर्कच्या मदतीने कॉम्प्युटर मधील फाईल ट्रान्सफर करते. 

सर्व्हरचे असे काही प्रकार आपल्याला पहायला मिळतात.


सर्व्हर कसा काम करतो ?

सर्व्हर कसा काम करतो हे आपण एका उदाहरणाद्वारे समजूया. 

समजा, तुम्हाला युट्युब वर एखादी व्हिडिओ बघायची आहे त्यासाठी तुम्ही त्या व्हिडिओचे नाव युट्युबच्या Search box मध्ये टाकले आणि सर्च केले. 

तुम्ही केलेले सर्च हे Request मध्ये रुपांतरीत होऊन ही request इंटरनेटच्या माध्यमातून युट्युबच्या सर्व्हर पर्यंत जाते. जिथे सर्व डेटा हा स्टोअर करुन ठेवलेला आहे.

त्यानंतर सर्व्हर तुमच्याद्वारे request करण्यात आलेली व्हिडिओ शोधून त्याचा डेटा तुमच्या डिव्हाईस वर दाखवते ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसते. 

इंटरनेट वर तुम्ही जे पण काम करता जसे file download, माहिती सर्च करणे किंवा सोशल मीडिया साईटचा वापर या सर्व कामांसाठी सर्व्हरचा वापर केला जातो.


सर्व्हर डाऊन होतो म्हणजे काय।Server down meaning in marathi

तुम्ही कधी तरी पाहिले असेल की एखादी वेबसाईट ओपन करायला गेल्यावर ती खोलत नाही किंवा ” Server Not Found ” असा मेसेज स्क्रीन वर दिसायला लागतो.

हे सगळे कशामुळे होते कधी विचार केला आहे का ?

ज्या वेळी सर्व्हरची रॅम कमी असते आणि त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते अशा वेळेस सर्व्हर डाऊन होतो.

Server Down अनेक कारणांमुळे होतो.

  • Operating System Crashes
  • Malicious Cyber Attack
  • Application Crash
  • Hardware & Software issue
  • Server Overload

सर्व्हर डाऊन होण्याची ही काही कारणे असतात. 

हे वाचा – Domain Name म्हणजे काय आणि हे कसे काम करते ?


आज तुम्ही काय शिकलात ?

आज आपण येथे Server म्हणजे काय(Server meaning in marathi) आणि कसा काम करतो या विषयी माहिती पाहिली. तसेच सर्व्हरचे प्रकार आणि सर्व्हर डाऊन का होतो हे देखील जाणून घेतले. 

तुम्हाला वर सांगितलेली माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. वरील माहितीमध्ये तुम्हाला काही समजले नसल्यास कमेंटमध्ये विचारु शकता. 

ह्या ब्लॉग वर अशीच उपयुक्त माहिती पोस्ट होत असते. या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment