वेब सिरीज म्हणजे काय? हे एवढे प्रसिद्ध का आहे।web series meaning in marathi

आज आपण येथे वेब सिरीज म्हणजे काय (web series meaning in marathi) तसेच हे एवढे प्रसिद्ध का आहे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मागील दोन ते तीन वर्षांपासून वेब सिरीज हे नाव आपल्या सर्वाना खूप ऐकायला मिळत आहे. बऱ्याचदा तुम्ही टीव्ही किंवा युट्युब वरील जाहिरातींमध्ये मराठी वेब सिरीज बद्दल ऐकले असेल.

आज लोक movies बघण्यापेक्षा वेब सिरीज पाहण्यासाठी जास्त उत्सुक असतात.

तुम्हाला देखील वेब सिरीज पहायला आवडते का ?

वेब सिरीज या मराठी, हिंदी, इंग्लिश तसेच इतर अनेक भाषांमध्ये आपल्याला पहायला मिळतात. तसेच हे पाहण्यासाठी ऑनलाईन विविध प्लॅटफॉर्म देखील आहेत जेथे आपण वेब सिरीज पाहू शकतो.

तुमची वेब सिरीज विषयी माहिती घेण्याची उत्सुकता आता मी कमी करतो आणि वेब सिरीज म्हणजे काय (web series meaning in marathi) आणि हे एवढे प्रसिद्ध का आहे या विषयी संपूर्ण माहिती सांगण्यास सुरुवात करतो.

वेब सिरीज म्हणजे काय।web series meaning in marathi

वेब सिरीज म्हणजे छोट्या-छोट्या ऑनलाईन व्हिडिओची मालिका असते. जी साधारणपणे एपिसोडच्या स्वरुपात ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर रिलीज केली जाते.

वेब सिरीजमध्ये ३० ते ४० मिनिटांचे भाग असतात व असे ९ किंवा १० भाग आपल्याला एका वेब सिरीजमध्ये पहायला मिळतात. हे भाग या पेक्षा जास्त किंवा कमी देखील असू शकतात.

तसेच वेब सिरीजमध्ये विविध Season देखील असतात. जसे सिजन १, सिजन २. हे सिजन दरवर्षी त्या वेब सिरीजचा नवीन वर्षातील नवीन भाग म्हणून प्रदर्शित केले जातात.

प्रत्येक सिजनच्या शेवटच्या भागामध्ये असे काही तरी सिन दाखवले जातात. ज्यामुळे त्या वेब सिरीजचा पुढचा सिजन येई पर्यंत प्रेक्षकांच्या मनामध्ये नवीन सिजन येण्याची व पाहण्याची उत्सुकता वाढेल.


वेब सिरीज प्रसिद्ध का आहेत ?

वेब सिरीज प्रेक्षकांमध्ये प्रचलित असण्याची बरीच कारणे आहेत.

आपल्या सर्वांना मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी काही पहायचे म्हटल्यास चित्रपट हा एकमेव पर्याय आपल्या समोर असायचा. पण जेव्हा पासून वेब सिरीज रिलीज होण्यास सुरुवात झाली तेव्हा प्रेक्षकांना मनोरंजनासाठी काही वेगळे पाहण्यास मिळायला लागले.

एक चित्रपट हा दोन ते तीन तासांचा असतो. पण वेब सिरीज ही जवळपास दहा ते बारा तासांची असते. त्यामुळे प्रेक्षकांना जास्त वेळ करमणुकीसाठी एक साधन मिळते.

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये वेब सिरीज उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या वेब सिरीज पाहू शकता.

अशा काही कारणांमुळे वेब सिरीज फार प्रसिद्ध आहे.


मालिका आणि वेब सिरीजमध्ये काय फरक आहे ?

मालिका आणि वेब सिरीजमध्ये काही थोडे पण महत्वाचे फरक आपल्याला पहायला मिळतात.

दररोज टीव्ही वरील मालिका ही ३० मिनिट चालू असते. या ३० मिनिटामध्ये आपल्याला मालिकेच्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती पहायला मिळतात.

वेब सिरीज ही जवळपास ३० ते ४० मिनिट चालते. ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरुन आपण वेब सिरीज बघतो. त्याच्या Subscription plan नुसार आपल्याला जाहिराती दाखवल्या जातात. काही प्लॅनमध्ये आपल्याला जाहिराती पहायला मिळत नाही.

मालिका ही दोन ते तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक दिवस चालते. पण वेब सिरीज ही आपल्याला Season नुसार पहायला मिळते.

एखाद्या वेब सिरीजचे नवीन Season हे दरवर्षी किंवा ठराविक वर्षाला प्रदर्शित होत असतात. एका सीजनमध्ये असणारे भाग हे एकाच वेळेस किंवा आठवड्यातून एक भाग प्रदर्शित होतो.

थोडक्यात, मालिकेचे भाग दररोज प्रदर्शित होतात आणि वेब सिरीजचे भाग हे Season नुसार एकत्रित प्रदर्शित होतात. हा मालिका आणि वेब सिरीजमध्ये मुख्य फरक आपल्याला बघायला मिळतो.


वेब सिरीज कशी बघायची ?

ज्या प्रकारे टीव्ही वरील मालिका किंवा चित्रपट पाहण्यासाठी आपण केबल ऑपरेटर किंवा Dish TV सारख्या कंपनीला महिन्याला किंवा वर्षाला पैसे देतो.

तसेच वेब सिरीज पाहण्यासाठी काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. जेथे आपण Monthly किंवा Yearly Plan निवडून आपण वेब सिरीज पाहू शकतो.

वेब सिरीज पाहण्यासाठी Amazon Prime, SonyLIV, Hotstar आणि Netflix या सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

येथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार Plan निवडून वेब सिरीज पाहण्याचा आनंद घेऊ शकता.


वेब सिरीज पाहण्यासाठी चांगले ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणते आहेत ?

वेब सिरीज बघण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा त्यांच्या अँपचा देखील वापर करु शकता. या विषयी सविस्तर माहिती आपण खाली पाहू.

Disney Plus Hotstar

हॉटस्टार हे प्लॅटफॉर्म प्रामुख्याने भारतातील लोकांवर लक्ष केंद्रित करुन बनवण्यात आले आहे. हिंदी भाषेतील बऱ्याच वेब सिरीज तुम्ही येथे पाहू शकता. तसेच हिंदी मालिका देखील तुम्ही येथे पाहू शकता.

तसेच प्रसिद्ध Marvel Studio देखील Disney सोबत जोडलेले आहे. त्यामुळे Marvel च्या भविष्यात येणाऱ्या चांगल्या वेब सिरीज तुम्हाला येथे बघायला मिळतील.

Bollywood आणि Hollywood चे विविध movies तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला फक्त येथे भाषा निवडायची आहे. मग त्यानुसार सर्व TV Serial, Web Series आणि movies आपल्याला दिसू लागतील.

Amazon Prime Video

Amazon Prime Video हे अमेझॉनचे (ई-कॉमर्स वेबसाईट) एक प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपण ऑनलाईन movies आणि web series पाहू शकतो.

येथे तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड select केल्यास ३० दिवसांसाठी Prime Video चे फ्री Trial मिळते. त्यामुळे तुम्ही कोणते ही पैसे न देता फ्री मध्ये येथील Content पाहू शकता.

तुम्हाला फक्त Prime Video चे अँप डाउनलोड करायचे आहे आणि membership plan निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही येथील movies आणि web series पाहू शकता.

Prime Video वर आपल्याला Mirzapur, The Family Man सारख्या चांगल्या वेब सिरीज बघायला मिळतात.

Netflix

नेटफ्लिक्स ही media service पुरवणारी एक अमेरिकन कंपनी आहे. यांचे headquarter हे California येथे आहे.

नेटफ्लिक्स वर आपल्याला वेब सिरीज, Movies, Documentaries आणि या व्यतिरिक्त बरेच काही पहायला मिळते. तसेच येथे Bollywood आणि Hollywood चे वेगवेगळे Content पहायला मिळतात.

नेटफ्लिक्स हे Paid Platform आहे. यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे bug मिळणार नाही आणि हे वापरण्यास फार Smooth आहे.

Sony LIV

Sony LIV ही एक भारतीय मनोरंजन सेवा आहे जी Sony Pictures Networks India Pvt. च्या मालकीची आहे. हे मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे.

Sony LIV वर आपल्याला हजारो तासांचे मनोरंजन कार्यक्रम, वेब सिरीज, चित्रपट, लहान मुलांसाठी Cartoon, Live TV Shows अशा प्रकारचे वेगवेगळॆ Content बघायला मिळते.

हिंदी आणि इंग्रजी मधील Premium वेब सिरीज तुम्ही येथे पाहू शकता.

हे वाचा – TRP म्हणजे काय आणि तो कसा चेक करतात ?


आज तुम्ही काय शिकलात ?

वेब सिरीज ही गोष्ट बाहेरील देशामध्ये जुनी असली तरी आपल्या देशातील लोकांसाठी ही नवीन आहे. यासाठी आपण आज वेब सिरीज म्हणजे काय (web series meaning in marathi) आणि हे एवढे प्रसिद्ध का होत आहे हे पाहिले.

आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करुन वेब सिरीज कशा प्रकारे पाहू शकतो हे देखील पाहिले.

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया मला Comment मध्ये सांगा. तुमच्याद्वारे मिळालेल्या चांगल्या Comment मला आणखी उपयुक्त माहिती या ब्लॉगवर टाकण्यासाठी प्रोत्साहित करतील.

ह्या ब्लॉगवर Publish होणाऱ्या नवीन माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment