Youtube विषयी माहिती। Youtube information in marathi

आज घराघरांमध्ये टीव्ही पेक्षा Youtube जास्त करुन पाहिले जाते. आजची तरुण पिढी टीव्ही बघण्यापेक्षा Youtube वर व्हिडिओ पाहणे पसंत करते.

Youtube वर साधारणपणे दिवसाला १ अब्ज तास व्हिडिओ पाहिल्या जातात. ह्या आकडेवारी वरुनच कळते कि Youtube किती प्रचलित आहे. आज भारतामध्ये Youtube चे २६५ दशलक्ष ऍक्टिव्ह यूजर्स आहेत आणि हि संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Youtube अमेरिकेतील व्हिडिओ दाखवणारे एक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये लोक व्हिडिओ अपलोड करण्यासोबत व्हिडिओ पाहू सुद्धा शकतात.

व्हिडिओ पाहण्यामध्ये आपण Music, Movie, टीव्ही कार्यक्रम आणि या सोबतच विविध क्षेत्रातील व्हिडिओ जे Youtube वापरकर्त्यानी अपलोड केले आहेत त्या पाहू शकतो.

आज मी तुम्हाला Youtube विषयी अशीच काही माहिती (Information) सांगणार आहे.

  • Youtube चा इतिहास
  • Youtube च्या सुविधा
  • Youtube पैसे कसे कमवते ?
वरील विषयांवर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे.

Youtube information in marathi

Youtube चा इतिहास

Youtube ची सुरुवात स्टीव्ह चेन, चाड हर्ली आणि जावेद करीम यांनी केली होती. हे तिघे Paypal कंपनीच्या  सुरुवातीपासून तेथे काम करत होते.

eBay ने नंतर Paypal खरेदी केल्यानंतर ह्या तिघांनी जॉब सोडून दिली.

एकदा ह्या तिघांना आपल्या Birthday party ची व्हिडिओ इंटरनेट वर अपलोड करायची होती. पण त्या वेळी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी Youtube सारखी सुविधा त्यावेळी नव्हती.

यातूनच ह्या तिघांना Youtube बनवण्याची प्रेरणा मिळाली. युट्युब हे फेब्रुवारी २००५ साली तयार करण्यात आले होते. युट्युब त्यावेळी नवीन असल्यामुळे लोकांमध्ये युट्युब विषयी उत्सुकता खूप वाढली.

सर्व लोक युट्युब वर विविध प्रकारच्या व्हिडिओ अपलोड करु लागले. ह्या व्हिडिओ पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर युट्युबचा वापर करु लागले.

युट्युब जास्त प्रचलित झाल्यामुळे पुढे Google ने १.६५ अब्ज डॉलर्स मध्ये युट्युब खरेदी केले.

Youtube च्या सुविधा

युट्युब वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहणे, अपलोड करणे, कंमेंट करणे, Live व्हिडिओ शेअर करणे यासारख्या सुविधा पुरवतो.

ज्या गोष्टी आपण टीव्ही वर पाहू शकतो त्या सर्व युट्युब वर देखील पाहू शकतो. युट्युब वर आपण खालील गोष्टी पाहू शकतो.

  • मालिका पाहणे
  • बातम्या
  • सिनेमा बघणे
  • Music ऐकणे
  • विविध सिनेमा किंवा वेब सिरीजचे ट्रेलर

ह्या सर्व गोष्टी युट्युब वर पाहायला मिळत असल्यामुळे लोक आज टीव्ही बघण्यापेक्षा युट्युब पाहणे जास्त पसंद करतात.

या मागचे मोठे कारण हे देखील आहे कि टीव्ही पाहण्यासाठी लोकांना घरी बसावे लागते. त्या सोबतच टीव्ही बघताना जे दाखवले जात आहे तेच पाहावे लागते. स्वतःच्या इच्छेने ते काही पाहू शकत नाही. टीव्ही पाहत असताना मध्ये जाहिराती सुद्धा येतात यामुळे लोक टीव्ही पाहताना कंटाळून जातात.

पण युट्युब वर तसे नाही. येथे लोक स्वतःच्या मर्जीने हवे ते Search करुन पाहू शकतात. या सोबतच युट्युब वर त्याच जाहिराती दाखवल्या जातात ज्यामध्ये व्हिडिओ पाहणाऱ्याला Interest आहे.

युट्युब विविध प्रकारच्या सुविधा पुरवते.

1. Youtube Premium –

युट्युब प्रीमियम हे एक प्रकारचे Subscription आहे. ज्याच्या कडे युट्युबचे प्रीमियम Subscription आहे त्याला व्हिडिओ पाहताना जाहिराती दिसत नाही. युट्युब प्रीमियमची सुरुवात १२ नोव्हेंबर २०१४ साली झाली होती.

2. Youtube TV –

विविध प्रकारचे टीव्ही शो तसेच Movie आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते.

3. Youtube Movies –

युट्युब वर आपल्याला हव्या त्या Movie पाहायला मिळतात. ह्या सर्व movie आपण फ्री मध्ये युट्युब वर पाहू शकतो. पण यामध्ये movie पाहताना जाहिराती दिसतात.

4. Youtube Go –

Youtube Go हे एक Android अँप आहे. याच्या मदतीने लोक व्हिडिओ डाउनलोड करु शकतात. त्या इतरांसोबत Share देखील करु शकतात.

5. Youtube Music –

युट्युब music साठी Subscription घ्यावे लागते. Youtube music तसेच आहे जसे Spotify आणि Apple Music. २२ मे २०१८ रोजी हे  Youtube music या नावाने ओळखले जाऊ लागले.

6. Youtube Shorts –

Youtube shorts हे Feature सप्टेंबर २०२० मध्ये beta version सोबत Launch करण्यात आले होते. यामध्ये वापरकर्ते १५ सेकंदाची व्हिडिओ बनवू शकत होते. हे काही प्रमाणात Tik tok सारखेच आहे.

7. Youtube Stories –

२०१८ साली युट्युबने यावर टेस्टिंग चालू केली. सुरुवातीला हे Youtube reels नावाने ओळखले जायचे. हे इंस्टाग्राम रील्स सारखेच होते.

Youtube reels चे नाव पुढे जाऊन Google ने Youtube Stories असे केले.

8. Youtube Kids –

Youtube Kids हे एक प्रकारचे लहान मुलांना Cartoon दाखवणारे अँप आहे. हे अँप लहान मुलांना विचारात ठेऊन बनवले गेले आहे.

Youtube Kids ची सुरुवात १५ फेब्रुवारी २०१५ रोजी झाली होती. हे अँप अँड्रॉइड आणि ios वर उपलब्ध झाले होते. ३० ऑगस्ट २०१९ रोजी याची वेबसाईट देखील तयार करण्यात आली.

Youtube पैसे कसे कमवते ?

ज्या वेळी यूट्यूबची सुरुवात झाली त्यावेळी लोक मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी युट्युबचा वापर करु लागले.

हळूहळू युट्युब वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे Advertiser (जाहिरात करणारा) युट्युब वर Ads(जाहिरात) दाखवण्यासाठी आले. आणि मग येथूनच यूट्यूबची कमाई सुरु झाली.

आपण व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्यामध्ये ज्या जाहिराती येतात त्याचे युट्युबला पैसे मिळतात.

युट्युब वर व्हिडिओ टाकणाऱ्यांची संख्या वाढावी आणि कमाई वाढावी म्हणून युट्युबने व्हिडिओ बनवणार्यांना पैसे द्यायला सुरुवात केली. यामुळे युट्युब वर व्हिडिओ टाकणाऱ्यांची संख्या वाढली आणि याचा फायदा सगळ्यांना होऊ लागला.

Youtube information in marathi

व्हिडिओ बनवणाऱ्याला पैसे मिळू लागेल. जाहिरातीदारांना त्यांचा माल विकण्यास मदत मिळाली. आणि या दोघांमध्ये युट्युब देखील पैसे कमवू लागले.

Youtube ने एक प्रकारे Ecosystem बनवून सगळ्यांचा फायदा करुन दिला.

आज युट्युब Google नंतर जगातील दुसरे सर्वात मोठे Search engine आहे. येत्या काही वर्षांमध्ये लोक टीव्ही बघणे सोडून देतील आणि टीव्ही ऐवजी युट्युब बघणे पसंद करतील.

आजची तरुण पिढी देखील टीव्ही न बघता इंटरनेटवर movie पाहण्यासाठी युट्युबचा वापर करतात.

तुम्हाला सुद्धा टीव्ही पाहण्याऐवजी Youtube पाहणे आवडते का?

तुम्हाला काय पाहायला आवडते हे मला कंमेंटमध्ये सांगा. यूट्यूबची माहिती (Youtube information in marathi) तुम्हाला कशी वाटली?

अशाच माहितीसाठी माझ्या ब्लॉगला Follow करा.

Leave a Comment