Firewall काय आहे आणि कशासाठी वापरले जाते।Firewall meaning in marathi

Firewall meaning in marathi

जर तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल तर मग तुम्हाला फायरवॉल म्हणजे काय (Firewall meaning in marathi) माहित असणे गरजेचे आहे. 
ज्या प्रकारे देशाचे जवान बॉर्डर वर राहून आपली सुरक्षा करतात. त्याच प्रक्रारे ऑनलाईनच्या दुनियेत इंटरनेट वर आपली सुरक्षा करण्यासाठी फायरवॉल गरजेचे आहे. 
आपल्या मधील बरेच जण कॉम्प्युटरचा वापर करतात आपला डेटा कोणासोबत देखील Share होऊ नये म्हणून तसेच आपले सिस्टिम कोणी हॅक करु नये यासाठी त्याची सुरक्षा करणे गरजेचे आहे. हि सुरक्षा करण्यासाठी आपल्याला फायरवॉल मदत करते. 
जर तुम्ही कॉम्प्युटर वापरत असाल तर तुम्हाला फायरवॉल काय आहे आणि हे कशासाठी वापरले जाते या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. 

Firewall म्हणजे काय।Firewall meaning in Marathi 

Firewall म्हणजे कॉम्प्युटरची अशी सुरक्षा आहे जी सिस्टिम मध्ये हॅकर आणि malware यांना येण्यापासून थांबवते. 
Firewall आपल्या कॉम्प्युटरला अशा गुप्त सॉफ्टवेअर पासून वाचवते जे लपून आपल्या कॉम्प्युटरमध्ये येतात व आपला सगळा डेटा हॅकर पर्यंत पोहोचवतात. 

Firewall कसे काम करते?

Firewall हि सुरक्षा आपल्याकडे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमच्या स्वरुपात किंवा हार्डवेअरच्या स्वरुपात असते. जेव्हा आपण कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट चालू करतो तेव्हा हे फायरवॉल आपले काम चालू करते. 
इंटरनेट चालू केल्यानंतर आपल्या कॉम्प्युटर कडे जे ट्रॅफिक येते ते आडवण्याचे काम फायरवॉल करते. आपण जेव्हा इंटरनेटच्या मदतीने व्हिडिओ बघतो किंवा एखाद्या वेबसाईट वर जातो जे काम करतो या सगळ्या दरम्यान जे ट्रॅफिक आपल्या कॉम्प्युटर कडे येते ते आडवण्याचे काम फायरवॉल करते. 
फायरवॉल आपल्या कॉम्प्युटर नेटवर्कच्या चारही बाजुंनी एक भिंत बनवते जेणे करुन चुकीचे सॉफ्टवेअर आपल्या सिस्टिममध्ये इन्स्टॉल होणार नाही किंवा चुकीची फाईल कॉम्प्युटरमध्ये येणार नाही. असे झाले तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये Virus येऊ शकतो किंवा आपला सर्व डेटा डिलीट देखील होऊ शकतो. 
फायरवॉल फक्त त्याच गोष्टी आतमध्ये येऊ देते ज्यांना आपण आतमध्ये येण्याची परमिशन देतो. Virus आणि Malware ला फायरवॉल आतमध्ये येऊ देत नाही. 

Firewall चे प्रकार 

१. हार्डवेअर फायरवॉल 

आज प्रत्येक राउटरमध्ये हार्डवेअर फायरवॉल पहिल्या पासूनच असतो. हार्डवेअर फायरवॉल एका कॉम्प्युटर मधून दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये Virus आणि Malware जाण्यापासून थांबवतो. 
समजा, एका खोलीमध्ये १० कॉम्प्युटर आहे. या कॉम्प्युटर पैकी जर कोणत्याही कॉम्प्युटर मध्ये Virus आला तर तो Virus दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये जाण्यापासून थांबवण्याचे काम हार्डवेअर फायरवॉल करते. 
या सोबतच जे कॉम्प्युटर राउटर सोबत जोडले गेले आहेत त्यांच्या मध्ये Virus येणार नाही याची देखील काळजी हार्डवेअर फायरवॉल घेते. 

२. सॉफ्टवेअर फायरवॉल 

Windows च्या नवीन जनरेशनच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये म्हणजेच Windows ७, ८, ९, १० मध्ये आपल्याला अगोदर पासूनच फायरवॉल मिळते. तसेच हे ऑन केलेले असते जेणे करुन कॉम्प्युटर सुरक्षित राहील. 
ज्या वेळेस आपण एखादे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला जातो तेव्हा एक मेसेज येतो. ज्यामध्ये फायरवॉल तुमच्याकडून Permission मागते नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी कारण फायरवॉलने ते सॉफ्टवेअर ब्लॉक केले आहे. जर तुम्हाला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे असेल तर मग Permission द्यावी लागेल. 
तसेच इंटरनेट वर खूप सारे Antivirus सॉफ्टवेअर देखील उपलब्ध आहेत. Avast, McAfee, Norton, QuickHeal ह्या सगळ्या फायरवॉलच काम एकच आहे. ते म्हणजे हॅकर आणि Virus ला आतमध्ये येऊ न देणे. 
निश्चितच फायरवॉल आपल्या कॉम्प्युटरच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे. यामुळे आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फार मदत होईल. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर त्यामध्ये फायरवॉलचा योग्य प्रकारे वापर करा. 
तुम्हाला आज मी Firewall काय आहे आणि कशासाठी वापरले जाते(Firewall meaning in marathi) या विषयी सविस्तर माहिती सांगितली. तुम्हाला जर ह्या माहिती विषयी काही अडचण असल्यास मला कंमेंटमध्ये सांगा. 
ह्या ब्लॉग वर पब्लिश होणाऱ्या नवीन पोस्टची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी म्हणून उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 

1 thought on “Firewall काय आहे आणि कशासाठी वापरले जाते।Firewall meaning in marathi”

Leave a Comment