व्हाट्सअँप वर DP आणि नाव कसे बदलायचे?

whatsapp-dp-kasa-badlycha

आज आपण व्हाट्सअँप वर DP आणि नाव कसे बदलायचे या विषयी माहिती घेणार आहोत. आपल्या मधील प्रत्येक जण आज व्हाट्सअँपचा वापर करत आहे. व्हाट्सअँप वर मेसेज कसा पाठवायचा, स्टेटस कसा ठेवायचा या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहे. 
पण व्हाट्सअँप वर DP कसा बदलायचा. तेथे स्वतःचा फोटो कसा टाकायचा या सर्व गोष्टी अजून हि बऱ्याच जणांना माहित नाही. म्हणूनच आपण ह्या विषयी आज माहिती घेणार आहोत. 
आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला मेसेज करतो तेव्हा आपल्याला DP आणि नावाद्वारे ओळखले जाते. पण जर आपण DP किंवा नाव टाकले नसेल तर समोरील व्यक्ती आपल्याला ब्लॉक देखील करु शकतो. 
जर त्याच्या फोनमध्ये आपला नंबर सेव्ह नसेल तर तो आपल्याला ब्लॉक करेल असे होऊ नये म्हणून आपण DP आणि नाव कसे बदलायचे हे जाणून घेणे गरजेचे आहे. 

व्हाट्सअँप DP काय आहे ? 

व्हाट्सअँप DP एक पद्धतीने फोटो किंवा इमेज असते जी तुमची प्रोफाईल इमेज म्हणून दिसते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या फोनमध्ये तुमचा नंबर सेव्ह नसेल तेव्हा तुमचा फोटो पाहून तो तुम्हाला ओळखेल. जर तुमचा व्हाट्सअँप DP ठीक असेल तर तुम्हाला कोणी ब्लॉक करणार नाही. 
व्हाट्सअँप DP वर तुम्हाला तुमचा फोटोच ठेवणे गरजेचे नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा, सेवांचा किंवा वस्तूचा फोटो देखील ठेऊ शकता. पण तो योग्य असला पाहिजे जेणे करुन तुम्हाला कोणी ब्लॉक करणार नाही. 

व्हाट्सअँप DP कसा बदलायचा ?

व्हाट्सअँप DP बदलणे एकदम सोपे आहे. कोणताही व्यक्ती सहज स्वतःचा व्हाट्सअँप DP बदलू शकतो. मी तुम्हाला व्हाट्सअँप DP बदलण्याच्या काही स्टेप्स सांगतो. ह्या स्टेप तुमच्याकडे कोणताही फोन असला तरी तुम्ही फॉलो करु शकता. 
व्हाट्सअँप DP बदलण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. 
स्टेप १: सर्वात अगोदर व्हाट्सअँप ओपन करा. 
स्टेप २: व्हाट्सअँपच्या उजव्या बाजूस तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 
स्टेप ३: इथे तुम्हाला सेटिंगचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. 
स्टेप ४: सेटिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रोफाईल फोटोचे आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. 
स्टेप ५: आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी कॅमेरा आयकॉन वर क्लिक करा. 
स्टेप ६: कॅमेरा आयकॉन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फोन गॅलरी ओपन होईल. 
स्टेप ७: जो फोटो तुम्हाला व्हाट्सअँप DP म्हणून ठेवायचा आहे तो सिलेक्ट करा. नंतर सेव्ह बटन वर क्लिक करा. 
स्टेप ८: तुमचा फोटो अपलोड होईल आणि सगळ्यांना तो व्हाट्सअँप DP म्हणून दिसेल. 
अशा प्रकारे तुम्ही व्हाट्सअँप DP अपलोड करु शकता. व्हाट्सअँप DP, फेसबुक DP आणि इंस्टाग्राम DP ह्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. तो म्हणजे प्रोफाईल फोटो. 

व्हाट्सअँप वर नाव कसे बदलायचे ?

व्हाट्सअँप वर लोक स्वतःचे किंवा आपल्या व्यवसायाचे, सर्विसचे, वस्तूचे नाव ठेवतात. जर तुम्हाला व्हाट्सअँप वर नाव टाकायचे असेल किंवा असलेले नाव बदलायचे असेल तर तुम्ही खालील स्टेप्सद्वारे ते सहज बदलू शकता. 
व्हाट्सअँप वर नाव बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट नाही. तुम्ही हवे ते नाव ठेऊ शकता. 
स्टेप १: व्हाट्सअँप ओपन करुन उजव्या बाजूस असणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करा. 
स्टेप २: येथून तुम्ही सेटिंग ऑप्शन ओपन करा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रोफाईल वर क्लिक करा. 
स्टेप ३: प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर Name असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. येथे तुम्ही तुम्हाला हवे असलेले नाव टाकू शकता. 
स्टेप ४: नाव टाकल्यानंतर सेव्ह करा. आता तुम्ही जे नाव टाकले आहे ते सर्वाना दिसेल. 
अशा सोप्या पद्धतीने आपण व्हाट्सअँप वरील नाव सहज बदलू शकतो. केवळ काही सेकंदच लागतील तुम्हाला नाव बदलण्यासाठी आणि ते सेव्ह करायला. 

Leave a Comment