CPU काय आहे आणि कसा काम करतो।CPU information in marathi

CPU विषयी माहिती (CPU information in Marathi) सर्वांना थोडी फार का होईना असते. पण तरी सुद्धा तुम्ही हि माहिती वाचण्यासाठी आलेला आहात म्हणजे तुम्हाला सीपीयु विषयी अधिक सखोल माहिती घ्यायची आहे.

सीपीयु हा कॉम्प्युटरमध्ये चालणाऱ्या अंतर्गत व बाह्य प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो.

ज्या प्रकारे आपले शरीर मानवी मेंदूद्वारे नियंत्रित केले जाते त्या प्रमाणे कॉम्प्युटरला नियंत्रित करणारे डिव्हाईस म्हणजे सीपीयु. म्हणून सीपीयुला Brain of the computer असे म्हटले जाते.

आपण कॉम्प्युटरला दिलेल्या सूचना सीपीयु समजून घेतो आणि त्या प्रकारे तो कार्य करतो. आपण दिलेले काम सीपीयु किती जलद गतीने करेल हे त्या सीपीयुची Capacity किती आहे ह्या गोष्टीवर अवलंबून असते.

सीपीयुच्या प्रकारानुसार त्याची काम करण्याची क्षमता हि वेगवेगळी असते. तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे त्यानुसार आपल्याला कमी किंवा जास्त क्षमतेचा सीपीयु वापरणे गरजेचे असते.

आज Technology फार पुढे गेली आहे. आज कॉम्प्युटरचा वापर विविध प्रकारची अवघड कामे करण्यासाठी देखील केला जात आहे. त्यामुळे सीपीयुमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.

तुम्हाला खालील सीपीयुच्या माहितीमध्ये संपूर्ण CPU विषयी माहिती (CPU information in Marathi) मिळणार आहे.

CPU म्हणजे काय | CPU Information in Marathi

सीपीयु हे एक प्रकारचे हार्डवेअर उपकरण असते. जे कॉम्प्युटर कडून आलेल्या सूचनांवर प्रक्रिया करते आणि काम पूर्ण करते.

कॉम्प्युटर मधील सर्व महत्वाची कामे सीपीयुद्वारे केली जातात. जसे इनपुट-आउटपुट, आकडेमोड विविध प्रकारची कामे सीपीयु करत असतो.

कॉम्प्युटरमध्ये किती हि सोपे काम असले तरी ते सीपीयुच्या मदतीने पूर्ण केले जाते. म्हणूनच याला कॉम्प्युटरचा मेंदू असे म्हटले जाते.

आपण जेव्हा एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण घ्यायला जातो अशा वेळेस आपल्याला जी प्रोसेसरची माहिती सांगितली जाते तो प्रोसेसर म्हणजे सीपीयु असतो.

सीपीयु बद्दल बोलताना त्याची स्पीड किती आहे हे जास्त करुन पाहिले जाते. कारण आज कॉम्प्युटरचा जास्त वापर हा व्हिडिओ किंवा फोटो एडिटिंग तसेच कोडींग या सारखी विविध प्रकारची कामे करण्यासाठी केला जातो.

वरील कामे जलद गतीने होण्यासाठी सीपीयुची स्पीड जास्त असणे गरजेचे असते.


CPU चा Full Form काय आहे ?

सीपीयुचा फुल फॉर्म Central Processing Unit असा आहे. याला मराठीमध्ये Translate केल्यास याचा अर्थ “केंद्रीय प्रक्रिया युनिट” असा आहे.


CPU कसा काम करतो ?

सीपीयु विषयी थोडक्यात माहिती तुम्हाला वर मिळाली असेल पण आता आपण सीपीयु नेमका काम कसा करतो या विषयी सविस्तर माहिती घेऊया.

जुन्या सीपीयु पासून ते आताच्या आधुनिक सीपीयु तयार करण्यापर्यंत यामध्ये फार बदल करण्यात आले आहेत. आज कॉम्प्युटरचा वापर केवळ Copy-Paste किंवा टायपिंग करण्यासाठी केला जात नाही.

व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, Multitasking या सारख्या विविध कामासाठी सीपीयुचा वापर केला जातो. त्यामुळे गरजेप्रमाणे त्यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत.

आधुनिक गरजांप्रमाणे यामध्ये बदल करण्यात आला असला तरी त्याची मूलभूत कार्यपद्धत हि सारखीच आहे.

सीपीयुच्या मूलभूत कार्यपद्धतीमध्ये तीन कार्यांचा समावेश होतो.

  1. Fetch
  2. Decode
  3. Execute

सीपीयु कॉम्प्युटर मधील सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो. आपण जेव्हा कीबोर्डने टाईप किंवा माऊसद्वारे क्लिक करतो तेव्हा आपल्याला कॉम्प्युटर स्क्रीन वर ज्या Activity होताना दिसतात त्या सर्व सीपीयु मार्फत घडवून आणल्या जातात.

सीपीयु डेटा Execute करतो आणि आवश्यकता असल्यास त्यावर प्रोसेसिंग करतो. कॉम्प्युटर सोबत जोडल्या गेलेल्या सर्व हार्डवेअर उपकरणांना नियंत्रित करण्याचे काम सीपीयु करतो.

हार्डवेअर कडून येणाऱ्या सूचना किंवा माहिती वर प्रोसेसिंग करुन ती आपल्याला गरजेनुसार दाखवणे हे मूलभूत काम सीपीयु करत असतो.


CPU च्या भागांची माहिती।CPU parts information in marathi

सीपीयुचे प्रामुख्याने तीन महत्वाचे भाग आहेत. ज्यांच्या मदतीने सीपीयु काम करतो.

  1. Memory 
  2. Control Unit 
  3. ALU (Arithmetic Logic Unit)
CPU parts information in marathi

1. Memory

मेमरीमध्ये महत्वाची माहिती साठवून ठेवली जाते. मेमरीलाच Internal Storage किंवा Primary Memory असे देखील म्हणतात.

मेमरीमध्ये सूचना, माहिती तसेच Intermediate result साठवून ठेवले जातात. मेमरी युनिट दुसऱ्या युनिटला गरज पडल्यास माहिती पुरवण्याचे काम देखील करते.

2. Control Unit

कंट्रोल युनिट कॉम्प्युटरच्या सर्व भागांद्वारे करण्यात येणाऱ्या Operation ला नियंत्रित करण्याचे काम करते. कॉम्प्युटरच्या सर्व युनिटला Manage करण्याचे काम कंट्रोल युनिटद्वारे केले जाते.

3. ALU (Arithmetic Logic Unit)

ALU च्या माध्यमातून कॉम्प्युटरमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या सारखी कामे केली जातात. याच्या मदतीने डेटा निवडणे, त्यामध्ये तुलना करणे इत्यादी कामे केली जातात.


CPU चे प्रकार

आपण सीपीयुचा वापर कोणत्या कामासाठी करणार आहोत त्या कामाच्या गरजेनुसार योग्य तो सीपीयु घेणे फार गरजेचे आहे.

सीपीयुचे असलेले विविध प्रकार हे वेगवेगळे काम करण्यास सक्षम असतात. आपण कॉम्प्युटरचा वापर कोणत्या कारणासाठी करणार आहोत त्या दृष्टीने सीपीयुची निवड आपण करतो.

सीपीयुचे तीन प्रकार आहेत.

  1. Single Core 
  2. Dual Core 
  3. Quad Core

1. Single Core

Single Core हा सर्वात जुना सीपीयु प्रकार आहे.

ह्या सीपीयुमध्ये आपण एका वेळेस केवळ एकच काम करु शकत होतो. जर तुम्हाला या सीपीयुमध्ये Multitasking करायची असेल तर ते तुम्ही करु शकत नाही.

जर तुम्हाला दुसरे काम करायचे असेल तर पहिले काम झाल्याशिवाय तुम्ही ते करु शकत नव्हते. जर एका वेळेस दोन काम सुरु असतील तर पहिले काम होण्याची Speed फार कमी होत होती.

2. Dual Core

Dual Core सीपीयु हा Single Core सीपीयु प्रमाणेच असतो फक्त यामध्ये दोन Core असतात.

जिथे Single Core सीपीयु एका वेळेस फक्त एकच काम करु शकतो. तेथे Dual Core सीपीयुच्या मदतीने आपण एकपेक्षा जास्त किंवा Multitasking देखील सहज करु शकतो.

3. Quad Core

Quad Core हा एक शक्तिशाली सीपीयु आहे ज्यामध्ये आपण Multitasking सहज करु शकतो.

जर तुम्हाला व्हिडिओ/फोटो एडिटिंग, Animation किंवा Gaming या सारखे heavy काम करायचे असेल तर Quad Core असलेला सीपीयु तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.

Quad Core मध्ये चार Core असतात जे Multitasking च्या वेळेस काम आपापसात वाटून घेतात.


आज तुम्ही काय शिकलात ?

आज आपण येथे सीपीयुची माहिती (CPU information in marathi) सविस्तर पाहिली.

सीपीयु कसा असतो तसेच तो कॉम्प्युटर चालण्यासाठी महत्वाचा असतो हे सगळ्यांना माहित असते. परंतु, त्याच्या प्रकारा विषयी किंवा त्याची काम करण्याची पद्धत या विषयी खूप लोकांना माहित नसते.

आज मी तुम्हाला एक कॉम्प्युटर वापरकर्ता म्हणून सीपीयु विषयी जी माहिती असणे गरजेचे आहे ती सर्व माहिती या ठिकाणी सांगितली आहे.

जर सीपीयु विषयी वर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया मला कंमेंटमध्ये सांगा.

ह्या ब्लॉग वर पोस्ट होणाऱ्या नवीन माहितीची Notification मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन Notification Allow करा.

वरील माहितीशी निगडित काही अडचण असल्यास कंमेंटमध्ये विचारु शकता.

Leave a Comment