Meme म्हणजे काय आणि हे कसे बनवायचे।Meme meaning in marathi

आज आपण इंटरनेट वर सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली गोष्ट म्हणजेच Meme विषयी माहिती (Meme meaning in marathi) पाहणार आहोत.

इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअँप अशा जवळपास सर्व प्रचलित सोशल मीडिया वेबसाईट वर आपल्याला मिम्स/meme पाहायला मिळतात. तसेच मिम्सची आवड असणारे लोक देखील खूप आहेत.

जर आपल्याला सोशल मीडिया वर लवकर स्वतःचे फॉलोवर वाढवायचे असतील तर मिम्सच्या मदतीने हे करणे सहज शक्य आहे.

तूम्हाला जर Meme म्हणजे काय या विषयी सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे मी तुम्हाला मिम्स विषयी माहिती सांगून त्याचे प्रकार कोणते आहेत तसेच मिम्स बनवायचे कसे या विषयी माहिती सांगणार आहे.

Meme म्हणजे काय।Meme meaning in Marathi

” Meme म्हणजे आपण आपले विचार फोटोच्या माध्यमातून इतरांसोबत शेअर करणे होय “

आता या ठिकाणी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. काही जण Funny मिम्स तयार करतात तर काही जण Motivational मिम्स तयार करतात आणि इंटरनेट वर पोस्ट करतात.

आज मोठ-मोठे व्यवसाय हे त्याचे इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेज वर फॉलोवर वाढावे म्हणून मिम्सचा आधार घेतात. लवकर फॉलोवर वाढवण्यासाठी मिम्स फार फायदेशीर आहे.


Meme चे प्रकार

मिम्सचे विविध प्रकार आहेत. आपण हवे त्या प्रकारचे मिम्स बनवू शकतो. जसे एखादी वस्तू किंवा व्यक्ती अशा स्वरुपात आपण मिम्स बनवू शकतो.

तुम्ही खाली Memes चे विविध प्रकार पाहू शकता. आपण बनवत असलेले मिम्स खालील पैकी कोणत्या ना कोणत्या प्रकारात येत असतील.

1. Classic

Classic मिम्समध्ये एक फोटो असतो. ज्यामध्ये वरच्या आणि खालच्या बाजूला काही तरी लिहिले जाते. अशा प्रकारचे सर्व मिम्स Classic Memes मध्ये येतात.

2. Dank

हे मिम्स चांगले असतात कारण अशा प्रकारचे मिम्स हे विशिष्ट माहिती सोबत बनवले जातात. Dank मिम्सला internet of jockes असे देखील म्हणतात.

Dank Memes जास्त करुन TV Shows, Movie अशा कारणांसाठी बनवल्या जातात.

3.  One Hit Wonder

हे मिम्स खूप चांगले असतात. पण असे मिम्स हे विशिष्ट कामासाठीच बनवले जातात. तसेच अशा प्रकारचे मिम्स फार कमी बनवले जातात.

One Hit Wonder मध्ये एखाद्या चांगल्या फोटोला Caption लावून शेअर केले जाते. असे मिम्स जास्त करुन Music शी Related मिम्स बनवण्यासाठी वापरले जातात.

4. The Education

Education Memes फार फायदेशीर असतात. असे मिम्स हे शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवणारे किंवा हसवणारे असतात. हा मिम्स प्रकार सर्वाना आवडतो.

Education Memes सगळ्यांच्या सहज लक्षात राहतो.

5. The Trenders

हे मिम्स सोशल मीडिया वर काही काळासाठी प्रसिद्ध होतात आणि नंतर अचानक कोठे तरी गायब होतात.

Trenders Memes हे जेव्हा प्रचलित असतात तेव्हा त्या वरती Views खूप मोठ्या प्रमाणात येतात. Trending मध्ये हे मिम्स फार वर येतात.

6.  The Series 

जसे कि नावा वरुनच कळते. Series Memes म्हणजे संपूर्ण Collection असतो. इंस्टाग्राम वर किंवा सोशल मीडिया वरती काही ठिकाणी तुम्हाला पूर्ण Collection असलेले मिम्स म्हणजेच The Series चे मिम्स पाहायला मिळतील.


Memes कसे बनवायचे ?

जर तुम्हाला फोटो एडिटिंगची माहिती असेल तर तुम्ही स्वतःला हवे त्या प्रकारचे मिम्स बनवू शकता. पण जर तुम्हाला एडिटिंग विषयी माहिती नसेल तर तुम्ही ऑनलाईन असलेले फ्री टूल वापरुन कमी वेळेत चांगल्या प्रकारे मिम्स बनवू शकता.

Imgflip च्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही सहज Memes बनवू शकता.

Imgflip मध्ये आपण फ्री मध्ये मिम्स बनवू शकतो. लिंक वर क्लिक करुन वेबसाईट वर गेल्यानंतर तुमच्या समोर एक फोटो येईल. येथे तुम्ही थोडी प्रॅक्टिस करु शकता.


Meme बनवण्याचे फायदे

Memes जास्त करुन आनंद घेण्यासाठी तसेच शेअर करण्यासाठी बनवले जातात. तसेच मिम्सची रिच देखील खूप जास्त असते. पण तुम्हाला माहित आहे का आपण मिम्सच्या मदतीने पैसे देखील कमवू शकतो.

इंस्टाग्राम व फेसबुक वर तुम्हाला असे काही पेजेस मिळतील ज्यांचे फॉलोवर आणि लाईक्स खूप जास्त आहेत. असे लोक मिम्सच्या मदतीने महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.

आपल्या सर्वांना मिम्स वाचायला तसेच ते शेअर करायला आवडतात. आपण मिम्स बनवून फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर अपलोड करु शकतो. मिम्समुळे रिच पटकन मिळते त्यामुळे फॉलोवर देखील लवकर वाढतील.

तुमचे फॉलोवर चांगल्या प्रमाणात वाढल्यानंतर तुम्ही देखील मिम्सच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.

मित्रांनो, Memes चा वापर आज मोठ्या कंपन्या देखील स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरत आहे. जेणे करुन त्यांचे प्रॉफिट वाढेल.

Meme येत्या काळात आणखी प्रसिद्ध होतील व याची रिच आणखी वाढेल. तुम्ही जर चांगल्या प्रकारे मिम्स बनवू शकत असाल तर तुमचे देखील सोशल मीडिया वर फॉलोवर झपाट्याने वाढतील.


आज तुम्ही काय शिकलात ?

मी आज तुम्हाला Meme म्हणजे काय आणि हे कसे बनवायचे (Meme meaning in marathi) या विषयी माहिती सांगितली. हि माहिती तुम्हाला कशी वाटली मला कंमेंटमध्ये सांगा.

आपल्या ब्लॉग वर अशीच उपयुक्त माहिती पोस्ट होत असते. नवीन पोस्ट केलेल्या माहितीची Notification मिळण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन Notification Allow करा.

ह्या ब्लॉगशी निगडित काही अडचण किंवा सुधारणा करायच्या असतील तर ते आपण मला कंमेंटमध्ये सांगू शकता.

Leave a Comment