आपल्या नावाची Ringtone कशी बनवायची?

How to make a ringtone of your name in Marathi

आज प्रत्येक व्यक्तीकडे फोन आहे. आजच्या डिजिटल युगात कदाचितच असा कोणी असेल ज्याच्या जवळ फोन नसेल. 
आपण फोनचा वापर विविध कामासाठी करतो. इंटरनेट वापरण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 
पण जेव्हा फोन सर्वात अगोदर बनवण्यात आला होता तेव्हा त्याचे मुख्य काम हे एकमेकांना कॉल करण्याचे किंवा कॉल उचलणे हा होता. हे फोनचे पहिले काम होते. 
प्रत्येकाच्या फोनमध्ये एक आकर्षणाची किंवा दिखावा करण्याची गोष्ट म्हणजे रिंगटोन. सर्व जण आपल्या फोनमध्ये विविध प्रकारची रिंगटोन लावत असतात. 
आज सध्या स्वतःच्या नावाची रिंगटोन लावण्याचे वेड सगळ्यांना लागले आहे. आपण आपल्या नावाने विविध प्रकारची रिंगटोन फोनला लावू शकतो.  
आज मी तुम्हाला या विषयी माहिती सांगणार आहे कि आपण आपल्या नावाची रिंगटोन बनवून फोनला कशा प्रकारे लावू शकतो. 
रिंगटोन बनवण्याची सगळी प्रोसेस खाली विविध स्टेपद्वारे तुम्हाला पाहायला मिळेल. 

आपल्या नावाची Ringtone कशी बनवायची ?

आपल्या स्वतःच्या नावाची रिंगटोन बनवणे एकदम सोपे आहे. रिंगटोन बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या Chrome ब्राऊसरमध्ये जावे लागेल. 
तेथे FDMR असे सर्च करा. तुमच्या समोर FDMR ची वेबसाईट येईल. त्यावर क्लिक करा. 
FDMR चा फुल फॉर्म Free Download Mobile Ringtone असा आहे. येथे तुम्ही तुमच्या नावाची रिंगटोन बनवून ती फोनला लावू शकता. 
रिंगटोन बनवण्यासाठी FDMR च्या सर्च बॉक्समध्ये तुमचे नाव टाका आणि सर्च करा. तुमच्या समोर तुमच्या नावाच्या सगळ्या रिंगटोन येतील. त्यापैकी जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही डाउनलोड करु शकता. 
आता आपण रिंगटोन डाउनलोड करण्याची सगळी प्रोसेस विविध स्टेपद्वारे पाहूया. 
स्टेप १ : सर्वात अगोदर Chrome ब्रॉउसरमध्ये जाऊन FDMR असे टाईप करा. तुमच्या समोर वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा. वेबसाईटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर FDMR ची वेबसाईटओपन होईल. 
How to make a ringtone with your name
स्टेप २ : FDMR च्या सर्च बॉक्समध्ये तुमचे नाव किंवा ज्या नावाची तुम्हाला रिंगटोन तुम्हाला बनवायची आहे ते नाव टाका आणि सर्च करा. नाव टाकून सर्च केल्यास तुमच्या नावाची रिंगटोन तुम्हाला दिसेल. 
स्टेप ३ : तुमच्या समोर तुम्ही टाकलेल्या नावाची रिंगटोन येईल. त्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही डाउनलोड करु शकता. 
How to make a ringtone with your name in marathi

स्टेप ४ : रिंगटोन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ती कॉलिंग रिंगटोन म्हणून सेट करु शकता. 
वरील सोप्या स्टेप फॉलो करुन तुम्ही सहज स्वतःच्या नावाची रिंगटोन डाउनलोड करु शकता. 
तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे मला कंमेंटमध्ये सांगा. 
अशीच उपयोगी आणि अँड्रॉईड टिप्स मी या ब्लॉगवर टाकत असतो. जर तुम्हाला अशीच लोकप्रिय माहिती हवी असेल तर उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 
जेणे करुन मी जेव्हा नवीन माहिती पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला नवीन पोस्टची नोटिफिकेशन लगेच मिळेल. 

Leave a Comment