Captcha म्हणजे काय आणि हे का वापरले जाते।Captcha meaning in marathi

आज आपण इंटरनेट वरील टिप्समध्ये Captcha म्हणजे काय(captcha meaning in marathi) या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आपण जेव्हा एखाद्या वेबसाईट वर लॉगिन करतो किंवा इंटरनेट वर ऑनलाईन पेमेंट करताना बऱ्याचदा आपल्याला captcha भरावा लागतो. 

तुम्ही कधी विचार केला आहे का ह्या captcha चे काम काय असते. इंटरनेट वर आपल्याला कॅपचा का भरावा लागतो ?

आज इंटरनेटच्या काळात जी पण गोष्ट घडते तिला काही तरी कारण असते. इंटरनेट वर आपल्याला कॅपचा भरायला लावण्याचे देखील काही तरी कारण आहे. 

आज मी तुम्हाला येथे कॅपचा काय असते तसेच कॅपचा विषयी खूप सारी माहिती सांगणार आहे जी तुम्ही या अगोदर कोठेही ऐकली नसेल. 

Captcha म्हणजे काय।Captcha meaning in Marathi

कॅपचा इंटरनेट वरील असे टूल आहे ज्याच्या मदतीने आपण Real User आणि Automated User म्हणजेच बॉट यांच्या मधील फरक समजू शकतो. वेबसाईट वर येणाऱ्या User पैकी कोणते Real User आहेत आणि कोणते Automated User आहेत हे कॅपचामुळे आपल्याला कळते.

कॅपचाला जगासमोर २००० साली Luis Von Ahn, Manuel Blum, Nicholas Hopper आणि John Langford यांनी आणले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास कॅपचा हि मानव आणि कॉम्प्युटर यांना एकमेकांपासून वेगळे करण्याची पद्धत आहे. 


Captcha चा फुल फॉर्म काय आहे ?

कॅपचाचा फुल फॉर्म “Complete Automated Public Turing Test To Tell Computers and Human Apart” हा आहे.


Captcha Code का वापरला जातो ?

कॅपचा कोडचा वापर सुरक्षासाठी केला जातो. कॅपचा कोड फक्त मनुष्य सोडवू शकतो. कोणत्याही प्रकारचा बॉट हा कॅपचा कोड सोडवू शकत नाही. 

कॅपचा कोडमुळे हॅकर आणि स्पॅमरला रोखण्यासाठी मदत होते. कारण जर त्यांना थांबवले नाही तर ते पासवर्ड देखील चोरु शकतात. 

आपण महत्वाचे काम करत असताना किंवा बँकेतील व्यवहार ऑनलाईन करत असताना कधी कधी आपल्याला कॅपचा सोडवावा लागतो. कॅपचा सोडवल्यामुळे आपले बँकेचे काम सुरक्षित पद्धतीने होते. 

तुम्हीच विचार करा जर या ठिकाणी कॅपचाचा वापर केला गेला नसता तर हॅकर किंवा स्पॅमर सहजरित्या तुमची बँक अकाउंट माहिती किंवा पासवर्ड चोरुन तुमच्या अकाउंट मधून पैसे काढून घेऊ शकतात. 

एखाद्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही कॅपचा कोड सोडवला म्हणजेच तुम्ही त्या ब्लॉग किंवा वेबसाईटला स्पॅमर्स पासून वाचवत आहात. हे एक चांगले काम आहे. 


Captcha Code कसा सोडवायचा ?

ज्या व्यक्तींना इंटरनेट विषयी सखोल माहिती नसते त्यांना कॅपचा कसा सोडवायचा हे कळत नाही. अशा वेळेस ते कोठे हि क्लिक करतात किंवा मग त्या वेबसाईट वरुन पुन्हा मागे जातात. 

कॅपचा कोड सोडवायला १ मिनिट देखील लागत नाही. जर तुम्हाला तो कसा सोडवायचा हे माहित असेल. 

कॅपचामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे फोटो दाखवले जातील त्यातील एखाद्या ठराविक फोटो वरच तुम्हाला क्लिक करायचे असते. तुम्हाला सायकल, गाडी किंवा इतर कोणत्याही फोटो वर क्लिक करायला सांगतील. 

कॅपचामध्ये तुम्हाला बऱ्याचदा विविध प्रकारचे नंबर किंवा इंग्लिश मधील अक्षरे वाकड्या-तिकड्या स्वरुपात दिली जातात. हे नंबर किंवा अक्षरे कोणती आहेत हे ओळखून तुम्हाला टाईप करायचे असते. 

कॅपचा भरल्यानंतर तुम्हाला Verify बटनावर क्लिक करायचे आहे. 


Captcha चे प्रकार 

इंटरनेट वर विविध प्रकारचे कॅपचा आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारची वेबसाईट ओपन करत आहात त्या प्रकारचे कॅपचा तुम्हाला मिळतात. तुम्हाला इंटरनेट वर प्रामुख्याने खालील प्रकारचे कॅपचा पाहायला मिळतात. 

1. Text-Based Captcha

Text वर आधारित कॅपचा आपल्याला इंटरनेट वर खूप ठिकाणी पाहायला मिळतो. अशा प्रकारचा कॅपचा हा फार सुरक्षित असतो.

Text आधारित कॅपचामध्ये इंग्लिशमध्ये वाकडे तिकडे शब्द असतात जे आपल्याला ओळखून टाईप करायचे असतात. हे शब्द अशा प्रकारे लिहले जातात जे फक्त आपल्या सारख्या मनुष्यालाच समजतील. कोणत्याही प्रकारचे बॉट हे शब्द ओळखू शकत नाही. 

2. Image-Based

Image वर आधारित असलेला कॅपचा हा सोडवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. Text वर आधारीत असलेल्या कॅपचामध्ये आपल्याला शब्द ओळखून टाईप करावा लागतो. पण Image based कॅपचामध्ये आपल्याला फक्त काही फोटो निवडायचे असतात.

Image based कॅपचामध्ये विविध प्रकारचे फोटो असतात. आपल्याला कोणत्या तरी एका प्राण्याचे किंवा इतर वस्तूचे दोन तीन फोटो निवडायचे असतात. अशा प्रकारचा कॅपचा सोडवण्यासाठी फार सोपा असतो. 

3. ReCAPTCHA

ReCAPTCHA हा गूगलने तयार केलेला आहे. हा कॅपचा सोडवणे केवळ ५ सेकंदाचे काम आहे. 

ह्या कॅपचामध्ये “I am not a robot” अशा मेसेज असतो. तुम्हाला चेक बॉक्स वर क्लिक करायचे असते. क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईट ओपन करु शकता. 

गूगलचा हा कॅपचा आपण एखाद्या वेबसाईट वर गेल्यानंतर कोणती Activity करत आहे या वर लक्ष ठेवतो. जर त्याला काही वेगळे वाटल्यास आपल्याला कॅपचा सोडवण्यासाठी दिला जातो. 


Captcha वापरण्याचे फायदे काय आहेत ?

मी तुम्हाला कॅपचा वापरण्याचे प्रमुख फायदे वर अगोदरच सांगितले आहेत. कॅपचामुळे बॉट, स्पॅमर यांच्या पासून आपल्या वेबसाईटचे तसेच इंटरनेट वापरणाऱ्या इतर लोकांचे संरक्षण करता येते. पण या व्यतिरिक्त देखील आणखी काही फायदे आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत. 

  • ऑनलाईन तयार केलेले अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी 
  • ऑनलाईन खरेदी सुरक्षित करण्यासाठी 
  • वेबसाईटला बॉट पासून वाचवण्यासाठी 
  • स्पॅमर किंवा हॅकर पासून वेबसाईटचे संरक्षण करण्यासाठी 
  • ब्लॉग वरील स्पॅम कंमेंट थांबवण्यासाठी 

अशा प्रकारे विविध फायदे आपल्याला मिळतात. इंटरनेटचा वापर करत असताना आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी captcha meaning in marathi आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.


आज तुम्ही काय शिकलात ?

मी तुम्हाला आज captcha meaning सांगून त्याचे फायदे व प्रकार या विषयी सविस्तर माहिती दिली. वरील माहिती विषयी जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कंमेंटमध्ये विचारु शकता. 

मी अशाच प्रकारची इंटरनेट वरील विविध माहिती तुमच्यासाठी आणत असतो. ह्या ब्लॉग वर पोस्ट केल्या जाणाऱ्या नवीन माहिती विषयी जर तुम्हाला नोटिफिकेशन हवी असेल तर डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 

माझे काम जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया मला कंमेंटमध्ये सांगा. 

1 thought on “Captcha म्हणजे काय आणि हे का वापरले जाते।Captcha meaning in marathi”

Leave a Comment