Spam म्हणजे काय आणि या पासून सुरक्षित कसे रहायचे।Spam meaning in marathi

इंटरनेटचा वापर जसा चांगल्या कामासाठी केला जातो तसेच त्याचा वापर वाईट कामासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. आज व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. तसेच व्यवसाय इंटरनेटच्या मदतीने केला जात असल्याने खूप सारे ऑनलाईन टूल येथे वापरले जातात.

जसे की गुगलचे विविध टूल म्हणजेच ई-मेल, गुगल मीट, Duo, गुगल शीट अशा अनेक सर्विसेस आपण वापरतो. पण या सर्व ठिकाणी आपल्यासोबत फसवणूक होण्याची भीती देखील मोठ्या प्रमाणात असते.

ज्या प्रकारे हे ऑनलाईन टूल आपले काम सोपे करते तसेच हे आपले काम वाढवू देखील शकते म्हणजेच नुकसान देखील करु शकते. ऑनलाईनच्या जगात ई-मेलद्वारे किंवा फोन कॉलद्वारे आपली फसवणूक करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्पॅम होय.

स्पॅमच्या मदतीने आपल्याला खोटे मेल पाठवले जातात तसेच स्पॅम कॉल करुन फसवणुक केली जाते. इंटरनेटचा वापर करताना आपल्याला खोटे मेल आणि कॉल कोणते आहेत हे ओळखता येणे गरजेचे आहे.

आजच्या या पोस्टमध्ये आपण स्पॅम म्हणजे काय (Spam meaning in marathi) याचे प्रकार कोणते आहेत तसेच स्पॅम पासून सुरक्षित कसे रहायचे या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Spam म्हणजे काय।Spam meaning in marathi

Spam हा एक इंग्रजी शब्द आहे याचा मराठीमध्ये विशेष असा काही अर्थ सांगता येणार नाही. परंतु, इंग्रजीमध्ये स्पॅमचा अर्थ ” Unsolicited Email or Irrelevant Messages Sent on the Internet ” असा होतो.

थोडक्यात, मराठीमध्ये स्पॅमचा अर्थ म्हणजे ” इंटरनेट वर पाठवलेले अनपेक्षित ई-मेल किंवा संबंध नसलेले संदेश ” होय. 

स्पॅम या शब्दाचा वापर इंटरनेट वर येणाऱ्या अनपेक्षित मेल तसेच चुकीच्या मेसेजसाठी वापरला जात होता. तसेच स्पॅम मेलचा वापर फक्त जाहिरातीसाठी केला जात होता. पण काही कालावधीनंतर याचा वापर इतर अनेक कारणांसाठी करण्यात आला जसे की फसवणूक करणे.

स्पॅम मेल हे मोठ्या प्रमाणात एकाच वेळेस येतात आणि ज्या व्यक्तीला हे येतात त्याला देखील माहित नसते की हे कोठून येत आहेत.

स्पॅम फक्त ई-मेलद्वारे होत नाही तर मेसेज, सोशल मीडियाद्वारे, कमेंटमध्ये असे विविध प्रकार आहेत स्पॅम करण्याचे जसे फेसबुक वर फेक अकाऊंट बनवून इतर फोटो किंवा व्हिडिओ खाली कमेंट करणे तसेच एखादी खोटी पोस्ट टाकणे.

परंतु, या सर्वांमध्ये स्पॅम ई-मेल येणे याचे प्रमाण खूप जास्त आहे. या स्पॅम ई-मेलला रोखण्यासाठी कंपनीने आता Antispam प्रोग्रॅमचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ह्याच्या मदतीने स्पॅम ई-मेल आपोआप ओळखून स्पॅम फोल्डरमध्ये ते टाकले जातात.

पण या सर्वांमध्ये काही स्पॅमर्स मेल अशा प्रकारे तयार जे या Antispam प्रोग्रॅमला देखील ओळखता येत नाही आणि असे मेल हे तुमच्या इनबॉक्समध्ये दिसायला लागतात. हे स्पॅमर्स मेल अशा कंपनीचे नाव वापरुन पाठवतात ज्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता. त्यामुळे तुम्ही हे मेल ओपन करता आणि त्यामध्ये असलेल्या स्पॅम लिंक वर क्लिक करता.


स्पॅमचे प्रकार कोणते आहेत ?

स्पॅमर त्यांचे मेसेज मोठ्या प्रमाणात पाठवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात. जसे कि वस्तू विक्री करण्यासाठी जाहिरातीच्या स्वरुपातील मेल पाठवू शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती सगळ्यांसमोर आणू शकतात.

स्पॅमर तुमची वैयक्तिक माहिती इतरांना कळू नये यासाठी तुमच्या कडून पैसे देखील मागू शकतो. किंवा तुम्हाला एखादे चुकीचे काम करण्यास देखील सांगू शकतो.

ई-मेल स्पॅम फिल्टर या पैकी बरेच ई-मेल पकडतात तसेच सध्याचे स्मार्टफोन स्पॅम कॉल ओळखून तुम्हाला सावध करतात. तरी देखील या सर्वांमधून एखाद्या मेल किंवा कॉलद्वारे तुम्हाला फसवले जाऊ शकते. त्या सोबतच स्पॅमचे वेगळे प्रकार देखील या ठिकाणी वापरले जाऊ शकतात.

त्यासाठी स्पॅमचे खालील प्रकार तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

1. फिशिंग ई-मेल (Phishing E-Mail)

फिशिंग ई-मेल हा एक स्पॅम सायबर गुन्हा आहे. अशा प्रकारचे मेल अनेकांना मोठ्या संख्येने पाठवले जातात व या फिशिंग ई-मेलचा उद्देश तुमच्या बँक अकाऊंट विषयी किंवा तुमच्या डेबिट व क्रेडिट कार्ड विषयी माहिती घेणे हा असतो.

2. सोशल नेटवर्किंग स्पॅम

जस-जसे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअँप या सारखे प्रसिद्ध सोशल मीडिया माध्यमे प्रचलित होत आहे तसेच स्पॅमर देखील या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात स्पॅम करण्यासाठी करु लागले आहेत.

इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर खोटे अकाऊंट बनवून विविध ठिकाणी कमेंट करणे. स्पॅम स्वरुपातील पोस्ट तयार करणे या सारखे काम करुन ते आपल्याला आकर्षित करत असतात.

3. मोबाईल स्पॅम

मोबाईल स्पॅम हा SMS स्वरुपातील स्पॅम असतो. अशा प्रकारच्या SMS मध्ये तुम्हाला एखादी आकर्षित अशी ऑफर दिली जाते. तसेच यामध्ये तुम्हाला एक स्पॅमी लिंक देखील दिली जाते.

4. मेसेज स्पॅम

मेसेज स्पॅम हे ई-मेल स्पॅम प्रमाणेच असतात पण हे जलद गतीने खूप लोकांना पाठवले जातात. यामध्ये स्पॅमर्स त्यांचा संदेश व्हाट्सअँप, Sharechat या सारख्या लगेच मेसेज पाठवणाऱ्या अँपचा वापर करतात.

5. मोठ्या प्रमाणात संदेश (Bulk Message)

खूप मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणे म्हणजे Bulk Message करणे हा स्पॅमचा मुख्य प्रकार आहे. अशा प्रकारचे मेसेज लाखो-करोडो लोकांना एकाच वेळेस पाठवले जातात. अशा स्पॅम मेसेजमध्ये जास्त करुन जाहिराती असतात. या Bulk मेसेजच्या मदतीने स्पॅमरचा उद्देश तुम्हाला एखादी वस्तू विकण्याचा असतो.


स्पॅम पासून सुरक्षित कसे रहायचे ?

स्पॅम पासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या सोबत फसवणूक होणार नाही. स्पॅम पासून सुरक्षित राहण्यासाठी खालील महत्वाच्या गोष्टी आपण करु शकतो.

1. सार्वजनिक ठिकाणी तुमचा ई-मेल देऊ नका

आज प्रत्येक जण इंटरनेटचा सहज वापर करु शकतो. या सोबतच स्पॅमर देखील इंटरनेट वर विविध ठिकाणी लपलेले आहेत. हे स्पॅमर इंटरनेट वर नवीन ई-मेल शोधत असतात जेणे करुन हे स्पॅम मेल पाठवू शकतील.

पण तुम्ही जेव्हा तुमचा ई-मेल सार्वजनिक ठिकाणी पोस्ट करता तेव्हा हे स्पॅमर तुम्हाला देखील स्पॅम मेल पाठवण्यास सुरुवात करतात. त्यामुळे सोशल मीडिया वर किंवा सार्वजनिक ठिकाणी तुमचा ई-मेल देऊ नका.

2. क्लिक करण्यापूर्वी विचार करा

तुमच्या ई-मेल इनबॉक्समध्ये स्पॅम असलेले ई-मेल फिल्टर होऊन येतात. परंतु, काही स्पॅम मेल अशा प्रकारे बनवलेले असतात जेणे करुन ते तुमच्या इनबॉक्समध्ये दिसू लागतात. अशा वेळेस आपण सावध असणे गरजेचे आहे.

स्पॅम मेल खूप वेळा एखाद्या ब्रँडेड कंपनीचे नाव वापरुन पाठवले जातात किंवा एखाद्या वस्तूची ऑफर देऊन आपल्याला त्या ई-मेलकडे आकर्षित केले जाते.अशा प्रकारच्या ई-मेलमध्ये वेगवेगळ्या लिंक दिल्या जातात. ज्या स्पॅम लिंक असतात.

त्यामुळे असे कोणत्याही प्रकारचे मेल ओपन करताना किंवा त्यामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करताना विचार करणे गरजेचे आहे.

3. स्पॅम संदेशाला उत्तर देऊ नका (Do not reply to spam messages)

बरेच स्पॅम संदेश हे हॅकरद्वारे पाठवण्यात आलेले असतात. अशा हॅकरचा उद्देश आपल्या ई-मेलचा किंवा डिव्हाईसचा ऍक्सेस मिळवणे हा असतो. अशा परिस्थितीत जर आपण स्पॅम संदेशाला उत्तर दिले तर हॅकरला आपल्या ई-मेल विषयी माहिती मिळते.

4. तुमचा वैयक्तिक किंवा व्यावसायिक ई-मेल वापरणे टाळा

ऑनलाईन एखाद्या नवीन वस्तूची ऑफर किंवा सेल आल्यानंतर त्वरित आपल्याला माहित व्हावी यासाठी आपण ई-मेल देतो. जेणे करुन आपल्याला त्या वस्तूच्या ऑफर किंवा सेल विषयी माहिती मिळेल. पण, अशाच ठिकाणी हॅकर किंवा स्पॅमर देखील लक्ष ठेऊन असतात.

त्यामुळे अशा ठिकाणी दुसऱ्या एखाद्या ई-मेलचा वापर करा जो तुमच्यासाठी महत्वाचा नसेल.


आज तुम्ही काय शिकलात ?

Spam करण्याचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी जे प्रकार स्पॅम करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जातात ते आपण या ठिकाणी पाहिले आहेत. तसेच Spam म्हणजे काय आणि या पासून सुरक्षित कसे रहायचे (Spam meaning in marathi) हे देखील आपण येथे पाहिले आहे. जर तुम्हाला वर सांगितलेल्या माहिती विषयी काही अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारु शकता.

Leave a Comment