Money Heist स्टिकर आता व्हाट्सअँपमध्ये: अशा प्रकारे डाउनलोड करा आणि वापरा

Money-heist-sticker-download-marathi

आज सर्व जण चित्रपट पाहण्यापेक्षा वेब सिरीज पाहणे पसंद करतात. सध्या इंटरनेट वर अलीकडेच Release झालेल्या Money Heist च्या सीजन ५ ची जोरदार चर्चा आहे. 

Money Heist च्या ५ व्या सीजन निमित्ताने व्हाट्सअँपने या वेब सिरीजचे sticker आणले आहेत. हे स्टिकर ‘ Sticker Heist ‘ या नावाने ओळखले जातात. या स्टिकरमध्ये तुम्हाला Money Heist मधील विविध character दिसतील. 
हे स्टिकर तुम्ही तुमच्या व्हाट्सअँप चॅटमध्ये वापरु शकता. ज्या प्रकारे आपण व्हाट्सअँप वर एकमेकांसोबत बोलताना विविध प्रकारचे स्टिकर वापरतो त्या प्रकारे तुम्ही या स्टिकरचा वापर करु शकता. 

Money Heist चे कोणते स्टिकर मिळतात ? 

व्हाट्सअँपने आणलेल्या ‘ Sticker Heist ‘ मध्ये आपल्याला Money Heist चे १७ स्टिकर मिळतात. हे सर्व स्टिकर Animated आहेत. 
या स्टिकरमध्ये तुम्हाला त्यांच्या चेहऱ्या वरचे हावभाव तसेच विविध Action करताना स्टिकर मिळतील. 
तुम्हाला Tokyo, Lisbon, Moscow, Berlin, Nairobi, Rio, Denver, Stockholm, Bogota, Palermo आणि Professor यांचे स्टिकर पाहायला मिळतील. 

Money Heist स्टिकर डाउनलोड कसे करायचे ?

हे स्टिकर तुम्ही फक्त व्हाट्सअँपमध्ये वापरु शकता. हे स्टिकर व्हाट्सअँपमध्ये डाउनलोड करुन वापरणे फार सोपे आहे. 
Money Heist स्टिकर डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. 
१. पहिल्यांदा व्हाट्सअँप ओपन करा. 
२. त्यानंतर चॅट ओपन करा. तेथे तुम्हाला स्टिकरचे आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. 
३. तेथून व्हाट्सअँप स्टिकर स्टोअरमध्ये जा. 
४. तेथे तुम्हाला Sticker Heist दिसतील. ते डाउनलोड करा. 
वरील स्टेप वापरुन तुम्ही हे स्टिकर डाउनलोड करु शकता. हे सर्व स्टिकर केवळ 658 KB चे आहेत. 
Money-heist-sticker-download-marathi

हे स्टिकर हळूहळू फेसबुक व इंस्टाग्राम वर देखील येतील. आता सध्या हे स्टिकर तुम्ही व्हाट्सअँपमध्ये वापरु शकता. 
अशीच लोकप्रिय माहिती मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 

Leave a Comment