कोणते ही दुकान न टाकता ३ लाखांच्या गुंतवणुकीत महिन्याला ३० हजार कमवाल, जाणून घ्या कसे

कोणता ही व्यवसाय हा ग्राहकाची समस्या लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी सुरु केला जातो. अशा पद्धतीने सुरु केलेला व्यवसाय आपल्याला चांगला प्रॉफिट देखील कमवून देतो आणि ग्राहकाला त्याच्या प्रॉब्लेम पासून समाधान देखील मिळते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसाय विषयी माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही पालकांची त्यांच्या मुलांविषयी असणारी समस्या दूर करु शकता आणि भरपूर पैसे देखील कमवू शकता. तसेच या व्यवसायात फक्त तुम्हाला ३ लाखांची गरज आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही महिन्याला सहज ३० हजार कमाई चालू करु शकता.

सायकल भाड्याने देण्याचा सुरु करा व्यवसाय

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला सायकल चालवायला फार आवडते. बरेच जण सायकल चालवून शाळेत जात असतात त्यामुळे आई-वडील मुलांना सायकल घेऊन देत असतात. या व्यतिरिक्त जी मुले बसने शाळेत जातात त्यांना देखील सायकल खेळायला हवी असते म्हणून मुलांच्या हट्टामुळे त्यांना सायकल खरेदी करुन दिली जाते.

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लोक सायकल भाड्याने का घेतील?

मुले ही कालांतराने मोठी होत असतात त्यामुळे त्यांच्या लहानपणी घेतलेली सायकल त्यांना मोठे झाल्यानंतर चालवायला त्रास होतो. त्यामुळे आई-वडिलांना पुन्हा आपल्या मुलांसाठी नवीन सायकल खरेदी करावी लागते. आणि हीच समस्या दूर करण्यासाठी आपण सायकल भाड्याने देणार आहोत.

एक सायकल मार्केटमध्ये साधारणपणे ३ हजार रुपयांना मिळते. आपण ही ३ हजारांची सायकल त्या मुलांना ३०० रुपये भाड्याने महिन्याला देऊ शकतो. यामुळे होईल असे की जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा पालकांना त्यांच्या मुलांसाठी मोठी सायकल भाड्याने द्यायची आहे. यामुळे पालकांचे मुलांना नवीन सायकल खरेदी करुन देण्याचे पैसे वाचतील व मुलांना देखील प्रत्येक महिन्याला वेगळी सायकल चालवण्याचा आनंद घेता येईल.

तसेच उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुले मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांच्या घरी जातात मग त्या महिन्यांमध्ये पालकांना सायकलचे रेंट देखील द्यावे लागणार नाही.

अशा प्रकारे सुरु करा व्यवसाय

सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात किती लोक त्यांच्या मुलांना सायकल भाड्याने घेऊन देण्यास तयार आहेत हे पहावे लागेल. जर तुम्ही शहरात राहत असाल तर तेथे हा व्यवसाय फार चालू शकतो.

cycle shop

जर तुम्हाला १०० सायकल भाड्याने देण्याची ऑर्डर मिळाली तर तुम्हाला अगोदर या १०० सायकल खरेदी कराव्या लागतील. त्यासाठी साधारणपणे तुम्हाला ३ लाख रुपये लागतील. तसेच जर एखाद्या महिन्यामध्ये सायकल कमी मुलांनी भाड्याने घेतल्या तर उरलेल्या सायकल ठेवण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक जागा उपलब्ध असायला पाहिजे.

किती पैसे कमवाल?

या व्यवसायात तुम्ही जेवढ्या जास्त मुलांना सायकल भाड्याने द्याल तेवढी जास्त कमाई तुमची होईल. कोणत्याही सायकलचे भाडे हे तुम्ही त्या सायकलच्या किंमती वरुन ठरवू शकता. जर तुम्ही ३ हजार रुपयांची सायकल १०० मुलांना ३०० रुपये भाड्याने महिन्याला दिली तर तुम्ही महिन्याला ३० हजार कमवू शकता.

शहरामध्ये दोन ते तीन मोठ्या सोसायटीमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती दिली तर सुरुवातीला भाड्याने सायकल घेणारी १०० मुले तुम्हाला सहज मिळतील. आणि हीच मुले त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन देखील करतील ज्यामुळे तुम्हाला अजून सायकल भाड्याने देता येतील.

हे पहा – TATA सोबत EV चार्जिंग स्टेशन खोलून कमवा लाखो रुपये, अशी करा सुरुवात

२ हजार रुपये होईल जास्त कमाई

मुले सायकल चालवणार त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी लागणारे हेल्मेट, नी कैप, हातमोजे आणि जॅकेट तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करु शकता. या गोष्टी तुम्ही हव्या तर भाड्याने किंवा मग या मुलांना एका फिक्स रेटमध्ये कायम स्वरुपी देऊ शकता.

तसेच मुले ही सायकल वरुन पडत असतात आणि सायकल पंपचर देखील होत असते. त्यामुळे सायकल रिपेरिंग करण्याचे आणि पंपचर काढण्याचे पैसे देखील आपण त्यांच्या कडून घेऊ शकतो. अशा प्रकारे सायकल भाड्याने देण्या व्यतिरिक्त तुम्ही एक्सट्रा इनकम देखील करु शकता.

अशा प्रकारच्या बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप आजच जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment