Zero Competition Business – कुनफा बनवून महिन्याला होईल लाखोंची कमाई, ग्राहक स्वतःहा करतील तुमची मार्केटिंग

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्हाला एखाद्या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही तो व्यवसाय अगोदर सुरु करणारे असायला हवे किंवा मग त्या व्यवसायामध्ये तुम्ही सगळ्यात बेस्ट असायला हवे. जर तुम्हाला व्यवसायात खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर पहिला पर्याय तुमच्यासाठी योग्य राहील.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसाय विषयी सांगणार आहे जो मोठ्या शहरांमध्ये खूप चालत आहे पण लहान शहरामध्ये तो अजून ही कोणी सुरु केलेला नाही. त्यामुळे मार्केटमध्ये या व्यवसायात तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायला कोणी नसेल.

कुनफा व्यवसाय संधी

ज्या व्यक्तींना बाहेरील किंवा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉल वरील खाद्य पदार्थ खायला फार आवडतात. त्यांच्या मध्ये कुनफा हा पदार्थ फार प्रसिद्ध होत चालला आहे. बंगळुरू, मुंबई, म्हैसूर, हैदराबाद आणि दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये हा पदार्थ जास्त प्रमाणात लोक खात आहे.

कुनफा हा एक खाद्य पदार्थ आहे, आपण त्याला गोड पदार्थ देखील म्हणू शकतो. परंतु हे मिठाईपेक्षा फार वेगळे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथे हा खाद्य पदार्थ जर बनवला जात नसेल तर तुमच्यासाठी कुनफा बनवण्याचा व्यवसाय एकदम उत्तम राहील.

तुम्हाला फक्त कुनफा कशा प्रकारे तयार केला जातो हे शिकायचे आहे आणि व्यवसायाला सुरुवात करायची आहे. तुमच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये जर कोणी हा व्यवसाय करत नसेल तर नक्कीच तुमची चांगली कमाई होणार आहे.

अशा प्रकारे सुरु करा कुनफा व्यवसाय

कुनफा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या ठिकाणी एक जागा भाड्याने घ्यावी लागेल. जेथे लोक जास्त प्रमाणात येतात किंवा जेथे मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ विकले जातात अशा ठिकाणी जागा मिळाली तर उत्तम राहील.

जागा मिळाल्यानंतर तेथे तुम्ही लोकांना बसण्यासाठी खुर्ची व टेबल देखील लावू शकता आणि लोकांना चविष्ट असा कुनफा बनवून खाऊ घालू शकता. सुरुवातीला लोकांना कुनफा काय असतो हे माहित नसल्यामुळे ते जास्त प्रमाणात तुमच्या दुकानाकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला या गोष्टीचा फायदा उचलायचा आहे.

जेव्हा लोक पहिल्यांदा तुमच्याकडे कुनफा खाण्यासाठी येतील तेव्हा तुम्हाला त्यांना एकदम उत्तम पद्धतीने कुनफा बनवून खाऊ घालायचा आहे जेणे करुन ते लोक पुन्हा तुमच्याकडे कुनफा खाण्यासाठी येतील. अशा पद्धतीने तुमचा हा व्यवसाय खरोखर यशस्वी होऊ शकतो.

हे पहा – ही २ लाखांची मशीन तुम्हाला दिवाळी पर्यंत ६ लाख कमवून देईल, कसे ते पहा

किती होईल कमाई?

कुनफा हा खाद्य पदार्थ कॉलेजच्या मुलामुलींना तसेच इतर व्यक्तींना देखील फार आवडतो. या व्यतिरिक्त पार्टीमध्ये देखील हा पदार्थ पाहुणे मंडळींना खायला दिला जातो. त्यामुळे कुनफा बनवून पैसे कमवण्यासाठी तुम्ही दुकान टाकू शकता किंवा पार्टीच्या ऑर्डर देखील घेऊ शकता.

एक कुनफा साधारणपणे ४०० रुपयांना विकला जातो ज्यामध्ये २०० रुपये प्रॉफिट मार्जिन असते. जर तुम्ही दिवसाला केवळ १० कुनफा विकला तर दिवसाला २,००० आणि महिन्याला ६०,००० नुसता तुमचा प्रॉफिटच असेल. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करणे तुमच्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे.

अशा प्रकारच्या बिझनेस आयडियाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment