New Business Idea: TATA सोबत EV चार्जिंग स्टेशन खोलून कमवा लाखो रुपये, अशी करा सुरुवात

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत चालले आहे. या सोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री देखील जास्त होऊ लागली आहे. अशा इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंग वर चालत असल्याने ठराविक किलोमीटर चालल्यानंतर त्यांना चार्ज करावे लागते.

यामुळे सध्या नवीन बिझनेस आयडिया खूप प्रसिद्ध होत आहे ती म्हणजे EV चार्जिंग स्टेशन खोलण्याचा. इलेक्ट्रिक गाडयांना चार्जिंग करण्यासाठी अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन रस्त्याच्या बाजूला तयार केले जातात. जसे पेट्रोल व डिझेल पंप आहे तसेच आता चार्जिंग स्टेशन देखील मोठ्या प्रमाणात उघडले जाऊ लागले आहे.

TATA सोबत सुरु करा EV चार्जिंग स्टेशन

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांच मार्केट वाढत चालले आहे त्यामुळे बऱ्याच मोठ्या कंपन्या EV चार्जिंग स्टेशन खोलण्यासाठी फ्रेंचाइझी प्रोवाइड करत आहे. या सगळ्यांमध्ये टाटा कंपनी देखील EV चार्जिंग स्टेशन टाकण्यासाठी स्वतःची फ्रेंचाइझी प्रोवाइड करते.

टाटा पॉवर सोबत तुम्ही ही फ्रेंचाइझी टाकू शकता. जर तुम्हाला टाटा सोबत चार्जिंग स्टेशनची फ्रेंचाइझी टाकायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करुन तुम्ही फ्रेंचाइझीसाठी Apply करु शकता.

Apply For TATA Charging Station Franchise

चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी आवश्यक गोष्टी

जर तुम्हाला चार्जिंग स्टेशन उघडायचे असेल तर त्यासाठी योग्य जागेची निवड करणे फार महत्वाचे आहे. तसेच जेवढ्या गाड्या तुमच्या चार्जिंग स्टेशन वर येतील त्यांना पार्क करण्यासाठी आवश्यक तेवढी जागा देखील तुमच्याकडे असली पाहिजे.

सुरुवातीला तुम्हाला इलेक्ट्रिकल कनेक्शन, टेक्नीशियन अशा गोष्टींची आवश्यकता असेल. या व्यतिरिक्त तुमच्या व्यवसायाची जाहिरात आणि मार्केटिंग करण्यासाठी देखील तुम्हाला योग्य अशा व्यक्तींची गरज पडेल.

दोन प्रकारचे असतात चार्जर

जेव्हा तुम्ही चार्जिंग स्टेशन टाकणार असाल तेव्हा तुम्हाला कळेल की गाडी चार्ज करण्यासाठी दोन प्रकारचे चार्जर असतात. एक म्हणजे DC आणि दुसरा असतो AC. इलेक्ट्रिक गाडी लवकर चार्ज करण्यासाठी या चार्जरद्वारे डायरेक्ट करंट दिला जातो. देशामध्ये मोठ्या रस्त्यांवर तुम्हाला जास्त करुन हे DC चार्जर पहायला मिळतील. याउलट AC चार्जरमुळे गाडी स्लो चार्ज होते. तसेच या चार्जरला इलेक्ट्रिसिटी देखील कमी प्रमाणात लागते.

तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा चार्जर योग्य आहे?

तुमच्या चार्जिंग स्टेशनमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा चार्जर प्रोवाइड कराल हे तुमच्या गरजेवर आणि सोई सुविधांवर अवलंबून आहे. तरी दोन्ही चार्जर विषयी महत्वाचे मुद्दे आपण खाली पाहूया.

AC – Slow Charger
  • फास्ट चार्जरच्या तुलनेत स्लो चार्जर बसवणे आणि देखभाल करणे अधिक परवडणारे असते. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी स्लो चार्जर टाकणे जास्त फायदेशीर सिद्ध होईल.
  • जर तुमच्याकडे गाडी पार्क करुन चार्ज करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असेल तर AC चार्जर बसवणे तुमच्यासाठी योग्य राहील. जेणे करुन लोक रात्रभर किंवा जास्त वेळासाठी गाडी तेथे चार्जिंगसाठी ठेऊ शकतील.
  • स्लो चार्जिंगमुळे बॅटरी दीर्घकाळ टिकते. त्यामुळे तुम्हाला सारखी बॅटरी बदलावी लागणार नाही.
DC – Fast Charger
  • जर तुमचे चार्जिंग स्टेशन highway च्या जवळ असेल तर तेथे फास्ट चार्जर बसवणे योग्य राहील. कारण फास्ट चार्जरमुळे गाडी पटकन चार्ज होते ज्यामुळे लोकांना जर लांबचा प्रवास करायचा असेल तर त्यांना गाडी चार्ज होण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.
  • फास्ट चार्जर साधारणपणे महामार्ग, व्यावसायिक क्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.

हे पहा – गरीब असो किंवा मध्यम वर्गीय, कोणी पण सुरु करु शकते केळ्याची पावडर बनवण्याचा व्यवसाय

गुंतवणूक आणि कमाई

चार्जिंग स्टेशन टाकण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला १ ते १० लाखाच्या दरम्यान खर्च येईल. कारण यामध्ये तुम्हाला नवीन चार्जिंग कनेक्शन, जागा, टेक्नीशियन आणि मार्केटिंग असा विविध प्रकारचा खर्च तुम्हाला करावा लागेल. जर जागा तुमची स्वतःची असेल तर खर्च थोडा कमी होईल.

चार्जिंग स्टेशनद्वारे कमाई करण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत.

  1. चार्जिंग फी – चार्जिंग स्टेशनचे मालक चार्जिंग प्रक्रियेदरम्यान वापरलेल्या विजेसाठी ठराविक रक्कम ग्राहकांकडून घेऊ शकतात. ही रक्कम किती असेल हे गाडी चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ आणि वापरलेल्या विजेच्या प्रमाणावर अवलंबून असते.
  2. Subscription प्लॅन – जे लोक नेहमी आपल्या चार्जिंग स्टेशन वर गाडी चार्ज करण्यासाठी येतात त्यांना Subscription प्लॅन प्रोवाइड केला जातो. जेणे करुन ते नेहमी आपल्याकडेच गाडी चार्ज करतील.
  3. पार्टनरशिप – स्थानिक व्यावसायिकांशी म्हणजे हॉटेल्स, मॉल असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून तुम्ही मिळून जर चार्जिंग स्टेशन टाकले तर खर्च कमी करण्यास आणि कमाई जास्त करण्यास मदत होईल.
  4. Advertising and Promotions – तुम्ही तुमच्या चार्जिंग स्टेशन वर जाहिरातीदारांना त्यांच्या जाहिरात लावण्याची अनुमती देऊ शकता.

वर दिलेल्या कमाईच्या मार्गांद्वारे तुम्ही स्वतःचे चार्जिंग स्टेशन टाकून चांगली कमाई करु शकता.

अशा प्रकारच्या बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment