बाजरीच्या मदतीने सुरु करु शकता अनेक प्रकारचे व्यवसाय, या उत्पादनांच्या मदतीने करा सुरुवात

आपण विविध प्रकारच्या व्यवसाय संधी सतत शोधत असतो. ज्यामध्ये आपल्याला चांगले प्रॉफिट देखील मिळेल आणि ग्राहकाचा देखील चांगला फायदा होऊ शकेल. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्ही भरपूर कमाई करु शकता.

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाजरी हे धान्य असते. ज्याच्या भाकरी खाणे प्रत्येकालाच फार आवडते. पण जर आपण या बाजरीचा वापर भाकरी बनवण्या व्यतिरिक्त इतर पदार्थ बनवण्यासाठी केला तर फक्त या धान्याच्या माध्यमातून देखील आपण एक व्यवसाय सुरु करु शकतो.

बाजरीमध्ये असतात अनेक पौष्टिक पदार्थ

बाजरीमध्ये अनेक पोषक पदार्थ पुरेशा प्रमाणात असतात. ज्यामुळे ती खायला आपल्या सर्वाना आवडते. बाजरीमध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्यांच्या पासून बनवलेले पदार्थ जर आपण बाजारात विकले तर लोक मोठ्या प्रमाणात ते खरेदी करतील आणि आपला व्यवसाय देखील फार पुढे जाईल.

या पदार्थांसह सुरु करा व्यवसाय

बाजरी या धान्याच्या माध्यमातून आपण एखादा लहान व्यवसाय सुरु करु शकतो. चला तर पाहूया बाजरी पासून आपण कोणते पदार्थ तयार करु शकतो.

1. बाजरीची खीर –

बाजरीची खीर खायला गोड आणि स्वादिष्ट असते. जी दूध, साखर, कोपरा आणि बाजरीच्या मदतीने तयार केली जाते. बाजरीची खीर कशी बनवायची हे तुम्ही युट्युब वर पाहू शकता.

2. बाजरीची पिन्नी –

pinni of millet

बाजरीची पिन्नी ही एक प्रसिद्ध पंजाबी गोड डिश आहे. जी गूळ, तूप, नट आणि बाजरीच्या पीठाने बनविली जाते. पंजाबमध्ये ही डिश फार आवडीने खाल्ली जाते.

3. बाजरीचे पीठ –

बाजरीच्या दाण्यांपासून हे पीठ तयार केले जाते. जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये हे पीठ असते. हे पीठ भाकरी, रोटली किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. तुम्ही हवे तर बाजरीचे पीठ विकू देखील शकता.

4. बाजरीचे लाडू –

बाजरीचे लाडू हे गोड, पौष्टिक आणि पारंपारिक मिठाईचा एक प्रकार आहे. जे बाजरीचे पीठ, गूळ, तूप आणि नटांपासून बनवले जातात. हे लाडू तुम्ही मिठाईच्या दुकानदारांना किंवा थेट ग्राहकांना देखील विकू शकता.

5. बाजरीचे दाणे पाणी/सरबत –

बाजरीच्या दाण्यापासून बनवलेले पाणी भरपूर प्रमाणात पोषक असते आणि उन्हाळ्यात ते थंडाई किंवा सरबत म्हणून वापरले जाते. ज्याप्रमाणे लोक लिंबू सरबत पितात त्याच प्रमाणे बाजरी पासून तयार केलेला सरबत देखील लोक मोठ्या प्रमाणात पितील.

हे पहा – महिलांसाठी हा व्यवसाय आहे खूप फायदेशीर, शहरामध्ये आहे मोठ्या प्रमाणात मागणी

अशी करा व्यवसायाची सुरुवात

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर यासाठी लागणारी बाजरी कोठून येईल आणि किती प्रमाणात येईल. तसेच बाजरी पासून तयार केलेले पदार्थ ग्राहकाला आपण ऑनलाईन विकणार की ऑफलाईन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल.

जर तुम्ही अगोदरच खाद्य पदार्थांशी संबंधित एखादा व्यवसाय करत असाल तर मग हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम राहील. तसेच तुम्ही केवळ बाजरीचे पीठ तयार करुन देखील लोकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने विकू शकता आणि चांगली कमाई करु शकता.

अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment