तुम्ही जर कॉम्प्युटरचा वापर करत असाल तर मग तुम्ही Wordpad (Wordpad information in marathi) हे पाहिलेच असेल. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या सर्वच कॉम्प्युटरमध्ये हे असते.
वर्डपॅड हे एक असे साधारण Text एडिटर आहे ज्याच्याद्वारे तुम्ही टेक्स्ट टाईप करु शकता किंवा लिहिलेल्या टेक्स्टमध्ये बदल करु शकता. Document तयार करण्यासाठी तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी देखील हे वापरले जाते.
नोटपॅड पेक्षा वर्डपॅड हे थोडे Slow(कमी गतीने) काम करते. पण ग्राफिक्स किंवा मोठ्या फाईलला हे सहज हाताळू शकते.
आज मी तुम्हाला वर्डपॅड म्हणजे काय(Wordpad information in marathi) तसेच हे कसे वापरावे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे.
Wordpad म्हणजे काय। Wordpad information in marathi
Wordpad हे मायक्रोसॉफ्टने बनवलेले एक Text based सॉफ्टवेअर आहे. Notes बनवण्यासाठी, टेक्स्ट फॉरमॅट तयार करण्यासाठी तसेच विविध document मध्ये बदल करण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
वर्डपॅड हे सर्व विंडोज कॉम्प्युटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु नोटपॅडमुळे आणि MS Word आल्यापासून याचा वापर आता फार कमी झाला आहे. तरी देखील अजून ही काही लोक याचा वापर करतात. कारण यामध्ये नोटपॅड तसेच MS Word पेक्षा काही विशेष गोष्टी आहेत.
Wordpad कसे वापरावे ?
वर्डपॅड हे सॉफ्टवेअर Simple design मध्ये बनवण्यात आले आहे. जेणे करुन वयस्कर व्यक्ती देखील सहज हे सॉफ्टवेअर वापरु शकतील. आता आपण वर्डपॅडच्या सर्व tools विषयी माहिती पाहूया.
१. Bold
ह्या टूलचा वापर करुन तुम्ही एखाद्या शब्दाला डार्क काळा कलर देऊ शकता. एखाद्या लाईनमध्ये जर तुम्हाला विशिष्ट शब्दावर फोकस करायचा असेल तर अशा वेळेस Bold हे टूल फार उपयोगी ठरते.
२. Underline
वर्डपॅड मधील कोणत्याही शब्दाला, टाईटलला किंवा लाईनला अंडरलाईन करण्यासाठी हे टूल वापरु शकता. तसेच विशिष्ट कारणासाठी देखील याचा वापर करु शकता.
३. Italic Font
वर्डपॅडमध्ये तुम्ही जे टाईप केले आहे ते जर तुम्हाला तिरप्या अक्षरात हवे असेल तर तुम्हाला हे टूल वापरावे लागेल. हे टूल वापरुन तुम्ही संपूर्ण टेक्स्ट किंवा विशिष्ट शब्द देखील Italic Font मध्ये तयार करु शकता.
४. Language (भाषा)
या टूलचा वापर करुन तुम्ही लिहिलेले टेक्स्ट हव्या त्या भाषेत बदलू शकता. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करता येत नसेल तर मराठीमध्ये टाईप करुन तुम्ही ते इंग्लिशमध्ये Translate करु शकता.
५. Size
हे टूल वापरुन तुम्ही एखाद्या शब्दाचा आकार कमी-जास्त करु शकता.
६. Strikethrough
तुम्ही टाईप किंवा लिहिलेल्या एखाद्या शब्दावर जर तुम्हाला आडवी लाईन ओढायची असेल तर हे टूल तुम्ही वापरु शकता.
७. Text color
याचा वापर करुन तुम्ही एखाद्या शब्दाचा रंग बदलू शकता. तुम्ही टाईप केलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला एखाद्या शब्दावर जास्त Highlight किंवा फोकस करायचा असेल तर तुम्ही हे टूल वापरु शकता.
८. Insert Object
जर तुम्हाला Excel मधील एखादी फाईल किंवा graph यामध्ये आणायचा असेल तर तुम्ही हे टूल वापरु शकता. याच्या मदतीने तुम्ही Adobe photoshop मधील फोटो देखील वर्डपॅडमध्ये आणू शकता.
९. Find
वर्डपॅडमध्ये जर तुम्ही खूप मोठी माहिती टाईप केली असेल आणि त्या माहिती मधून जर तुम्हाला एखादा ठराविक शब्द शोधायचा असेल तर तुम्ही हे टूल वापरु शकता. हे फार उपयोगी टूल आहे.
१०. Start a list
हे वापरुन तुम्ही वर्डपॅडमध्ये लिस्ट फॉरमॅट तयार करु शकता. जर तुम्हाला काही गोष्टी नंबर टाकून एका खाली एक लिहायच्या असतील तर हे टूल उपयोगी आहे.
Wordpad चा वापर कशासाठी केला जातो ?
वर्डपॅडचा वापर विविध कारणासाठी केला जातो त्यातील काही कारणे खाली पाहू शकता.
१. Document तयार, ओपन आणि Save करण्यासाठी
२. तुम्ही यामध्ये दिनांक, फोटो तसेच लिंक Insert करु शकता.
३. Document चा फॉरमॅट बदलण्यासाठी जसे कि तुम्ही त्याची Size बदलू शकता किंवा प्रिंटचा फॉरमॅट बदलू शकता.
४. तुम्ही तयार केलेले Pages एका रांगेत लावण्यासाठी देखील वर्डपॅड वापरु शकता.
या लेखावरील माझे मत
आज आपण येथे Wordpad म्हणजे काय आणि हे कसे वापरायचे(Wordpad information in marathi) या विषयी विस्तारमध्ये माहिती पाहिली. हि माहिती तुमच्यासाठी फायदेशीर होती अशी मी आशा करतो.
वरील वर्डपॅडची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया मला कंमेंटमध्ये कळवा.
ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या अशाच उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.
जेणे करुन नवीन माहितीची नोटिफिकेशन त्वरित तुम्हाला मिळेल.