Safe Mode म्हणजे काय आणि हे वापरण्याचे फायदे तोटे काय आहेत ?

safe-mode-mhanje-kay

आपण सर्व जण फोनची सुरक्षा वाढवण्यासाठी त्यामध्ये असलेला आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे अँप्स आपल्या फोनमध्ये Install करत असतो. तरी सुद्धा आपल्याला खात्री नसते कि आपला डेटा सुरक्षित आहे. 

प्ले स्टोअर वर फोन सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला खूप अँप मिळतात आणि तुम्ही ते इन्स्टॉल देखील करता. पण तरी सुद्धा आपला फोन हा हँग करतो किंवा एखादे वापरत असलेले अँप अचानक बंद होते या सारख्या समस्या आपल्याला फोनमध्ये दिसू लागतात. 
तुमचा फोन ज्या वेळेस हँग होतो किंवा तुम्ही वापरत असलेले Application अचानक बंद होते याचा अर्थ असा होतो कि तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे किंवा तुमच्या फोनच्या सिस्टिममध्ये काही तरी दोष आढळला आहे. अशा वेळेस फोनमध्ये असलेला Safe mode खूप मदत करतो. 
Safe mode हा एक प्रकारे आपल्या फोनचा सुरक्षा कवच आहे. ज्या वेळेस आपण फोन मधील Safe mode चालू करतो त्यानंतर आपल्या फोनची खऱ्या अर्थात सुरक्षा वाढते. 
आज मी तुम्हाला फोन सुरक्षित करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजेच Safe mode विषयी माहिती सांगणार आहे. तसेच हे चालू कसे करायचे आणि हे वापरण्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. 

Safe mode काय आहे ?

सेफ मोड आपल्या अँड्रॉईड फोनला देण्यात आलेली एक अशी सुरक्षा आहे ज्यामुळे फोनमध्ये असलेले Third party अँप्स (प्ले स्टोअर किंवा एखाद्या वेबसाईट वरुन डाउनलोड केलेलं अँप) किंवा व्हायरस आपोआप Disable होतो. 
आपण बऱ्याचदा प्ले स्टोअर वरुन किंवा एखाद्या वेबसाईट वरुन कोणत्या तरी कारणामुळे एखादे अँप डाउनलोड करतो. परंतु हे अँप Background मध्ये हळूहळू आपली सर्व माहिती गोळा करत असतात व स्वतःच्या हितासाठी त्याचा वापर करत असतात. 
आपण जेव्हा एखादे अँप Install करतो तेव्हा ते अँप आपल्या कडून विविध गोष्टींसाठी Permission(अनुमती) मागते. जसे कि Storage, Location, Message अशा प्रकारची Permission मागते. आणि आपण न बघता सर्वाना अनुमती देतो. 
एकदा अनुमती मिळाल्या नंतर हे अँप आपले काम सुरु करतात आणि तुमची सगळी माहिती गोळा करतात. जर तुम्हाला हे थांबवायचे असेल तर तुम्ही सेफ मोड चालू करु शकता. सेफ मोड चालू केल्यानंतर हे अँप लगेच Disable(बंद) होतात. 
तसेच जर तुमचा फोन हँग होत असेल किंवा त्यामध्ये व्हायरस आला असेल अशा वेळेस तुम्ही सेफ मोड चालू केल्यानंतर फोन हँग होणार नाही व जर फोनमध्ये व्हायरस असेल तर तो आपोआप बंद होईल. 
अशा प्रकारे सेफ मोड तुमच्या फोनची सुरक्षा करत असतो. 

Safe mode चालू कसा करायचा ?

सेफ मोड चालू करण्यासाठी प्रत्येक फोनची पद्धत हि वेगळी असते. त्यामुळे सेफ मोड चालू करण्यासाठी मी तुम्हाला इथे जी पद्धत सांगेल ती तुमच्या फोनसाठी असेलच असे नाही. म्हणून मी तुम्हाला सेफ मोड चालू करण्याची अशी पद्धत सांगणार आहे जी सर्वानाच उपयोगी ठरेल. 
तुमच्या फोनमध्ये सेफ मोड चालू करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप फॉलो करा. 
स्टेप १ : तुमच्या फोनमध्ये Google ओपन करा आणि सर्च बारमध्ये टाईप करा “Activate safe mode on” आणि पुढे तुमच्या फोनचे नाव आणि मॉडेल टाका. 
safe-mode-mhanje-kay

स्टेप २ : त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा. तुमच्या समोर काही Result(वेब पेजेस) ओपन होतील त्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या वेबसाईट वर क्लिक करुन वेबसाईट ओपन करा. 
स्टेप ३ : वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या फोन मधील सेफ मोड कसा चालू करायचा या विषयी माहिती मिळेल. त्या माहितीच्या आधारे तुम्ही सेफ मोड चालू करु शकता. 
तुमच्या फोन मधील सेफ मोड चालू करण्याचा हा सर्वात सोपा पर्याय आहे जो सर्वांच्या अँड्रॉईड फोनसाठी उपयुक्त आहे. 

Safe mode बंद कसा करायचा ?

सेफ मोड चालू करण्यासाठी तुम्ही जी स्टेप फॉलो केली होती तीच स्टेप फॉलो करा. तुमच्या फोन मधील सेफ मोड कसा चालू करायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्या वेबसाईट वर जाणार आहात तिथेच तुम्हाला हा सेफ मोड बंद कसा करायचा या विषयी देखील माहिती मिळेल. 
जर तुम्हाला सेफ मोड बंद करण्याची माहिती त्या वेबसाईट वर मिळाली नाही तर मग खालील स्टेप फॉलो करा 
स्टेप १ : Google वर “Deactivate safe mode on” आणि पुढे तुमच्या फोनचे नाव व मॉडेल टाका आणि सर्च करा. 
स्टेप २ : तुमच्या समोर काही Result(वेब पेजेस) ओपन होतील त्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या वेबसाईट वर क्लिक करुन वेबसाईट ओपन करा. 
स्टेप ३ : वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या फोन मधील सेफ मोड कसा बंद करायचा या विषयी माहिती मिळेल. त्या माहितीच्या आधारे तुम्ही सेफ मोड बंद करु शकता. 
तुमच्या फोनमध्ये चालू केलेला सेफ मोड तुम्ही अशा प्रकारे बंद करु शकता. 

Safe mode वापरण्याचे फायदे 

१. जर तुमचा फोन हँग होत असेल तर अशा वेळेस सेफ मोडचा वापर केल्याने तुमचा फोन हँग होणार नाही. 
२. फोनमध्ये व्हायरस आला असेल तर तो बंद करण्यासाठी सेफ मोड फायदेशीर आहे. 
३. फोनची बॅटरी जास्त वेळ टिकण्यासाठी देखील याचा फायदा होतो. 

Safe mode वापरण्याचे तोटे 

सेफ मोड वापरण्याचा एकच तोटा आहे तो म्हणजे तुम्ही Third party अँप्स (प्ले स्टोअर किंवा एखाद्या वेबसाईट वरुन डाउनलोड केलेलं अँप) वापरु शकत नाही. हा सेफ मोडचा सर्वात मोठा तोटा आहे. 
सेफ मोड वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. आता हे तुमच्या वर अवलंबून आहे कि तुम्ही सेफ मोड कोणत्या कारणासाठी वापरणार आहात. 
मी तुम्हाला येथे सेफ मोड विषयी तसेच ते कसे चालू किंवा बंद करायचे या विषयी देखील सविस्तर माहिती सांगितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कंमेंटमध्ये कळवा.
Technology विषयी अशीच उपयुक्त माहिती या ब्लॉग वर पोस्ट होत असते. अशाच उपयुक्त व नवीन माहितीची Notification मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 
जेणे करुन ह्या ब्लॉग वर जेव्हा नवीन माहिती Publish होईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. 

Leave a Comment