Podcast म्हणजे काय आणि याचे फायदे काय आहेत।Podcast meaning in marathi

आपण सर्व जण माहिती पाहण्यासाठी युट्युबचा तसेच अधिक विस्तृत स्वरुपात माहिती हवी असल्यास गुगलचा वापर करतो. माहिती मिळवण्यासाठी हे दोन मोठे प्लॅटफॉर्म असताना एक असे माध्यम जे तेजीने गुगल आणि यूट्यूबच्या बरोबरीला येत आहे ते म्हणजे Podcast. 

एक असे माध्यम जे जगामध्ये अगोदर पासून प्रचलित आहे परंतु भारतामध्ये आता कुठे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे ते म्हणजे पॉडकास्ट. 

पॉडकास्ट देखील एक माहिती पुरविणारे माध्यम आहे. पॉडकास्टमध्ये आपल्याला Interview(मुलाखत), चर्चा अशा स्वरुपातील माहिती पाहण्यास मिळते. फरक फक्त एवढाच आहे कि यामध्ये असणारी माहिती आपल्याला Audio फॉरमॅटमध्ये मिळते. 

आज सगळीकडे व्हिडिओ Content(माहिती) मोठ्या प्रमाणात पाहिले जाते अशा वेळेस पॉडकास्ट सारखे Audio स्वरुपात माहिती पुरविणारे माध्यम एवढे प्रचलित का होत आहे हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. 

Podcast म्हणजे काय (Podcast meaning in marathi) तसेच याचा वापर वाढण्याचे व हे प्रचलित होण्याचे काय कारण आहे या विषयी आज आपण येथे सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Podcast म्हणजे काय।Podcast meaning in marathi

” पॉडकास्ट म्हणजे माहिती पुरविण्याचे किंवा घेण्याचे असे माध्यम जेथे मुलाखत, कथा आणि पुस्तक सारांश ह्या सर्व गोष्टी ऑडिओ फॉरमॅटमध्ये उपलब्ध असतात. “

तुम्ही Play Store वर kindle, Audible सारखे अँप्लिकेशन पाहिले असतील जे आपल्याला ऑडिओ स्वरुपात पुस्तकाचा सारांश किंवा वेगवेगळ्या story सांगतात ते सर्व पॉडकास्टचे उदाहरण आहेत.


Podcast प्रचलित होण्याचे कारण काय आहे ?

आज सर्वांचे जीवन खूप पळापळीचे झाले आहे. सर्वांकडे खूप कमी वेळ आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ माध्यमातून एखादी माहिती घेण्यासाठी कुणाकडे वेळ राहिलेला नाही. 

बरेच जण ९ ते ५ जॉब करतात त्यानंतर प्रवास करुन घरी जात असताना आपण पॉडकास्ट चालू करुन हेडफोनच्या माध्यमातून ते ऐकू शकतो. 

पॉडकास्ट हे ऐकण्याचे काम असल्याने आपण ते इतर कोणते हि काम करताना किंवा प्रवास करताना ते सहज ऐकू शकतो. युट्युबमध्ये आपल्याला फोनमध्ये  लक्ष द्यावे लागते. त्यामुळे युट्युब पाहताना आपण दुसरे एखादे काम करु शकत नाही. 

तसेच पॉडकास्टमध्ये आपल्याला विविध पुस्तके जसे कि Self Growth, Finance, Business अशा विविध प्रकारातील पुस्तके ऐकायला मिळतात. ज्या व्यक्तींना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येतो अशा व्यक्ती ऑडिओ फॉरमॅटमध्ये पुस्तके ऐकणे पसंत करतात. 

पॉडकास्ट हे आपण एखादे काम करता करता ऐकू शकत असल्यामुळे जास्त प्रचलित झाले आहे.


Podcast चे प्रकार

पॉडकास्टमध्ये जी माहिती आपल्याला ऐकायला मिळते त्या माहितीचे देखील प्रकार पडतात. थोडक्यात हे पॉडकास्टचे विविध प्रकार आहेत जे आपल्याला खाली पहायला मिळतात.

1. काल्पनिक पॉडकास्ट (Fiction Podcast)

काल्पनिक पॉडकास्ट म्हणजेच यामध्ये आपल्याला कथा सांगितल्या जातात. या सर्व कथा काल्पनिक असून याचे विविध Season आपल्याला पाहायला मिळतात. सर्व Season मधील भाग हे वेळोवेळी प्रदर्शित केले जातात. 

कथा सांगणाऱ्या पॉडकास्ट देखील मोठ्या प्रमाणात ऐकल्या जातात. अशा काल्पनिक पॉडकास्टमध्ये आवाज आणि कथा सांगण्याची पद्धत फार महत्वाची असते.

2. कादंबरी पॉडकास्ट (Podcast Novels)

कादंबरी हा एक साहित्यिक प्रकार आहे. कादंबरी पॉडकास्टच्या स्वरुपात तयार करुन तिचे विविध भागात(Episode) रुपांतर करुन विविध पॉडकास्ट माध्यमांवर पब्लिश केले जाते.

3. Video पॉडकास्ट

तुम्ही युट्युब वर तंज्ञाचे एखाद्या ठराविक मुद्यावर बोलताना खूप जास्त वेळेच्या म्हणजेच १ तास किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या व्हिडिओ पाहिल्या असतील त्या सर्व व्हिडिओ हे व्हिडिओ पॉडकास्टचे उदाहरण आहे. 

व्हिडिओ पॉडकास्टमध्ये तुम्हाला दोन व्यक्ती एकमेकांसोबत ठराविक मुद्यावर बोलताना दिसतात.


Podcast तयार करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म आहेत ?

Google वर सर्च केल्यानंतर तुम्हाला खूप सारे पॉडकास्ट प्लॅटफॉर्म मिळतील. त्यापैकी मी तुम्हाला काही प्लॅटफॉर्म खाली सांगतो.

  • Podbean 
  • BuzzSprout
  • blubrry
  • SoundCloud

या व्यतिरिक्त देखील अजून खूप पॉडकास्ट होस्टिंग Provider आहेत. तुम्ही हवे असल्यास एकदा ते चेक करु शकता.


Podcast चे फायदे

पॉडकास्टचे खूप फायदे आहेत त्यातील काही आपण खाली पाहू शकतो.

  • पॉडकास्ट ऐकताना आपण इतर कामे देखील करु शकतो.
  • वाचण्याची आवड नसल्यास आपण पुस्तकांमधील माहिती ऐकून शिकू शकतो.
  • पॉडकास्ट आपण कोठे हि बसून किंवा फिरताना ऐकू शकतो.
  • पॉडकास्टमुळे खूप वेळ वाचतो.

असे बरेच फायदे आपल्याला पॉडकास्टच्या वापरामुळे पाहायला मिळतात.

हे वाचा – Driving Licence साठी ऑनलाईन Apply कसे करायचे ?


आज तुम्ही काय शिकलात ?

आज आपण येथे Podcast म्हणजे काय आणि हे प्रचलित का आहे (Podcast meaning in marathi) या विषयी सविस्तर माहिती पाहिली. पॉडकास्टचा वापर येणाऱ्या कालावधीत आणखी वाढेल त्यामुळे तुम्ही आज जी पॉडकास्टची माहिती घेतली याचा तुम्हाला फायदाच होईल. 

जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया मला कमेंटमध्ये कळवा. तुमची मिळालेली चांगली कमेंट मला आणखी चांगली माहिती तयार करण्यासाठी मदत करेल. 

ह्या ब्लॉग वर Publish होणाऱ्या नवीन पोस्टची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment