गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्राम आणि युट्युब वर एक व्यक्ती फार प्रसिद्ध होत आहे ज्याचे नाव अंकित बैयनपुरिया आहे. काही महिन्यांपूर्वी या तरुणाने ७५ दिवसाचे एक चॅलेंज घेतले होते. ज्यामध्ये त्याने असे काही केले ज्यामुळे तो इतका प्रसिद्ध झाला आहे आणि आज महिन्याला लाखो रुपये देखील कमवत आहे.
आजच्या या माहितीमध्ये आपण या तरुणाने असे काय केले ज्यामुळे हा महिन्याला लाखो रुपये कमवत आहे हे पाहणार आहे. आजची ही माहिती तुम्हाला देखील आयुष्यात जास्त पैसे कमवण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा.
कोण आहे अंकित बैयनपुरिया
अंकित बैयनपुरिया हे हरियाणातील बयानपूर गावामध्ये राहतात. या व्यक्तीचे वय ३० वर्षे असून तो युट्युब आणि इंस्टाग्राम वर कन्टेन्ट बनवण्यासोबत जिम ट्रेनिंग देखील देतो. गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या ७५ दिवसाच्या चॅलेंजमुळे हा व्यक्ती सध्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर प्रसिद्ध होत आहे.
त्याने घेतलेल्या या चॅलेंजमुळे त्याच्या आयुष्यात फार चांगले परिणाम घडून आले आहेत. सध्या त्याच्या युट्युब चॅनेल वर २० लाखांपेक्षा जास्त subscriber आणि इंस्टाग्राम वर ६० लाख फॉलोवर आहे.
७५ दिवसाच्या चॅलेंजमध्ये काय केले?
सध्या देशात प्रत्येक जण ७५ दिवसाचे चॅलेंज घेऊ लागले आहे. पण या चॅलेंजची सुरुवात अंकित बैयनपुरिया पासून सुरु झाली आहे. अंकितने ७५ दिवसाच्या चॅलेंजमध्ये जे काही केले त्यामुळे त्याच्या आयुष्यात जे काही बदल आले ते पाहून खूप जण आता हे चॅलेंज स्वीकारु लागले आहे.
या ७५ दिवसाच्या चॅलेंजमध्ये अंकित सकाळी आणि संध्याकाळी २ वेळा व्यायाम करायचा. तसेच तो पौष्टिक आहार देखील घेत होता. या नंतर तो त्याचे दिवसभरातील जे काही काम असेल ते करत होता. तो दररोज या सगळ्या गोष्टी करताना फोनमध्ये रेकॉर्ड करायचा आणि ते इंस्टाग्राम वर शेअर करायचा. त्याचे ७५ दिवसाचे दररोजचे हे रुटीन रील्स पाहून लोक प्रेरित होऊ लागले आणि त्यामुळे त्याचे फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागले.
अंकित बैयनपुरिया कसे पैसे कमवतो?
सध्या सोशल मीडिया वर अंकित चांगला व्हायरल होत असल्यामुळे त्याच्यासाठी आता पैसे कमवण्याचे अनेक मार्ग तयार झाले आहेत. अंकित त्याच्या युट्युब आणि इंस्टाग्राम अकाउंट वरुन महिन्याला १ ते २ लाखाच्या आसपास पैसे कमवत आहे. अंकित बैयनपुरिया कोणत्या मार्गाने किती पैसे कमवतो हे आपण एकदा पाहूया.
1. अंकित बैयनपुरिया इंस्टाग्राम

अंकित बैयनपुरियाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सध्या ६० लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहे. त्यामुळे बरेच ब्रँड त्याच्याकडे प्रमोशनसाठी येतात. अंकित त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट टाकण्यासाठी २० ते ३० हजार रुपये चार्ज घेतो. त्याच्या अकाउंट वर दररोज २ ते ३ पोस्ट आणि एक रील पब्लिश केली जाते.
2. अंकित बैयनपुरिया युट्युब

अंकितच्या युट्युब चॅनेल वर २० लाखांपेक्षा जास्त subscriber आहेत. तो दररोज एक vlog त्याच्या युट्युब चॅनेल वर टाकत असतो. त्याच्या सर्व विडिओ वर मिलियनमध्ये views येतात. त्यामुळे तो यूट्यूबच्या माध्यमातून सहज महिन्याला १ लाखापेक्षा जास्त पैसे कमवत असेल.
हे पहा – मात्र १४ हजारांची मशीन तुम्हाला महिन्याला ३० हजार कमवून देईल
3. अंकित बैयनपुरिया Sponsorship
अंकित बैयनपुरिया हे कुस्ती रेसलर आणि बॉडी बिल्डर असल्यामुळे ते नेहमीच फिटनेस आणि नुट्रीशन प्रॉडक्टला प्रमोट करत असतात. काही दिवसांपूर्वी ते MuscleBlaze ब्रँडला प्रमोट करताना दिसले. अशा प्रकारचे प्रमोशन करुन ते महिन्याला ५० ते ६० हजार रुपये कमवतात.
सध्या अंकित बैयनपुरिया संपूर्ण देशाला ७५ दिवसाचे चॅलेंज स्वीकारण्यासाठी प्रेरित करत आहे. या चॅलेंजमुळे त्यांच्या आयुष्यात फार बदल घडून आला आहे. तसेच या चॅलेंजमुळे ते फार प्रसिद्ध झाले आणि आज ते विविध मार्गाने प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये कमवत आहे.
अशाच माहितीसाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇