नवीन उद्योजक, हाऊस वाइफ आणि रिटायर्ड कर्मचारी जर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असेल तर आजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे. कारण या व्यवसायामध्ये जास्त भांडवलाची गरज नाही आणि फार कमी जागेमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. त्यामुळे व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप भांडवल लागते म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करत नाही अशी कारणे देणे आता चालणार नाही.
आम्ही तुम्हाला आज ज्या व्यवसाया बद्दल सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला एका मशीनची गरज असते. तसेच हा संपूर्ण व्यवसाय ह्या मशीन वरच अवलंबून आहे. चला तर मग जाणून घेउया कोणती आहे ती मशीन आणि ती काय काम करते.
कशासाठी वापरली जाते ही मशीन
आम्ही तुम्हाला ज्या मशीन विषयी सांगणार आहे तिला Automatic dosa making machine असे म्हणतात. मशीनच्या नावावरुनच तुम्हाला कळले असेल की ही मशीन डोसा बनवण्याचे काम करते. तसेच ही मशीन जेवढ्या पटकन डोसा बनवते तेवढ्या पटकन माणूस देखील डोसा बनवू शकत नाही.
ही मशीन चक्क एक मिनिटाच्या आत डोसा तयार करते तसेच या मशीनला वीज देखील कमी लागते. त्यामुळे लोकांना डोसा बनवून खाऊ घालण्याचा व्यवसाय तुम्हाला जास्त नफा कमवून देऊ शकतो. ही मशीन तुम्हाला बाजारामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन १४ हजारांमध्ये मिळून जाईल.
अशा पद्धतीने सुरु करा व्यवसाय
सुरुवातीला लोकांना बाहेर फिरताना काही तरी मसालेदार खायला फार आवडायचे. पण सध्या वाढत्या आजारांमुळे लोक चविष्ट आणि शरीराला फायदेशीर असे खाद्य पदार्थ खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहे. त्या मुळेच मागील २ वर्षांमध्ये डोसा खाण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढू लागले आहे.
जर या मशीनच्या साहाय्याने तुम्हाला स्वतःचा डोसा बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये अशी जागा पहावी लागेल जेथे लोक जास्त प्रमाणात खाद्य पदार्थ खाण्यासाठी येतात. जेथे अशी जागा उपलब्ध असेल तेथे तुम्हाला फक्त एक टेबल लावायचा आहे आणि लोकांना बसण्यासाठी खुर्ची ठेवता येईल अशा प्रकारे व्यवस्था करायची आहे.
ही मशीन फार छोटी असल्याने टेबल वर जास्त जागा देखील घेणार नाही. त्यामुळे तुम्ही कमी जागेमध्ये स्वतःचा डोसा बनवण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जवळपास २० ते २५ हजार रुपयांची गरज पडेल.
हे पहा – महिलांसाठी हा व्यवसाय आहे खूप फायदेशीर, शहरामध्ये आहे मोठ्या प्रमाणात मागणी
पहा कसा तयार केला जातो डोसा
सुरुवातीला डोसा हा एका मोठ्या तव्यावर तयार केला जायचा. पण आता बाजारामध्ये डोसा बनवण्याची मशीन आल्यामुळे हे काम फार सोपे झाले आहे. ही Automatic dosa making machine कशा पद्धतीने डोसा बनवते हे तुम्ही खालील विडिओमध्ये पाहू शकता.
किती होईल कमाई?
एक डोसा साधारणपणे १०० ते १५० रुपयांना विकला जातो. जर तुम्ही चांगल्या लोकेशनला तुमचा व्यवसाय सुरु केला आणि मात्र १०० रुपयांत जरी डोसा बनवून दिला तर तुम्ही दिवसाला कमीत कमी १५०० ते २००० रुपये सहज कमवू शकाल. या व्यवसायामध्ये जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही डोसा खाऊ घालाल तेवढी जास्त तुमची कमाई होईल.
अशाच नवीन व्यवसायाची माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇