iPhone Sale – आयफोन १२, १३ वर फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन देत आहे भरपूर सूट, जाणून घ्या नवीन किमती

सध्या सगळीकडे सणांचे आनंदमय वातावरण आहे. लोक या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वस्तूंची खरेदी देखील करत आहे. लोक सणांमध्ये नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी फार उत्सुक असतात त्यामुळे बऱ्याच कंपन्या त्यांच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देखील देतात. त्यामुळे लोक आणखी जास्त प्रमाणात खरेदी करतात.

सणांच्या या उत्सवामध्ये आता फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर देखील मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वस्तूंवर जास्त प्रमाणात डिस्काउंट म्हणजेच सूट मिळत आहे.

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर सुरु झाला सेल

सणांमध्ये लोक नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी फार उत्साहित असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या जसे की फिल्पकार्ट आणि अमेझॉन त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विविध इलेक्ट्रिक वस्तूंवर खूप चांगले डिस्काउंट देत आहे.

ऑक्टोबरच्या या महिन्यात फ्लिपकार्ट वर BIG BILLION DAYS आणि अमेझॉन वर GREAT INDIAN FESTIVAL सिझन चालू आहे. सध्या या सेलमध्ये आयफोनच्या १२ आणि १३ मॉडेल वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे आयफोनचे हे दोन मॉडेल घेण्यासाठी ग्राहक फार आकर्षित झाले आहे.

आयफोन १२ मिळतो एवढ्या किमतीला

आयफोन १२ खरेदी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठा डिस्काउंट हा फ्लिपकार्ट वर मिळत आहे. येथे आयफोन १२ फक्त ३२,९९९ रुपयांना मिळत आहे. फोनची किंमत ३८,९९९ आहे. पण यावर बँक ऑफर ३ हजार आणि जुना फोन exchange केल्यास ३ हजाराची सूट मिळते. अशा प्रकारे तुम्ही हा फोन मात्र ३२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

आयफोन १२ मध्ये तुम्हाला मागच्या बाजूस दोन १२ मेगा पिक्सेलचे कॅमेरा आणि पुढच्या बाजूस १२ मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच यामध्ये तुम्हाला ६४ जीबीची स्टोरेज देखील पहायला मिळते.

हे पहा – तुमचा मोबाईल देखील ट्रॅक होत आहे का? जाणून घ्या मोबाईल ट्रॅक होण्याची लक्षणे

आयफोन १३ मिळतो एवढ्या किमतीला

जर तुम्हाला आयफोन १३ खरेदी करायचा असेल तर तुम्ही अमेझॉनची साईट चेक करु शकता. अमेझॉन वर सुरु असलेल्या GREAT INDIAN FESTIVAL मध्ये आयफोन १३ तुम्हाला ३९,९९९ रुपयांना मिळून जाईल. आयफोन १३ ची किंमत ४५,९९९ आहे. पण SBI बँक डिस्काउंट आणि जुना फोन exchange करुन तुम्हाला हा ३९,९९९ रुपयांना पडत आहे.

आयफोन १३ मध्ये तुम्हाला १२८ जीबी स्टोरेज आणि १२ मेगा पिक्सेलचे दोन कॅमेरा पहायला मिळतात. या व्यतिरिक्त हा फोन 5G ला सपोर्ट करुन तुम्हाला १९ तासांचा बॅटरी बॅकअप देखील देतो.

अशाच तंत्रज्ञानातील अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment