VPN म्हणजे काय आणि हे कसे वापरायचे ? | vpn information in marathi

VPN-information-in-marathi

इंटरनेटचा वापर करत असताना अशा काही वेबसाईट असतात ज्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला निर्बंध घातले जातात. हे निर्बंध हटवण्यासाठी आणि त्या वेबसाईटचा वापर करण्यासाठी आपल्याला VPNची गरज असते. 

एवढेच नाही तर अशा काही वेबसाईट असतात ज्या आपला डेटा किंवा आपली वैयक्तिक माहिती तसेच IP Address जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेस VPN आपल्याला सुरक्षा प्रदान करते. व्हीपीएनं आपल्या डेटाला Encrypt करते व आपल्या डिव्हाईसचा IP Address इतरांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते. 
ज्या व्यक्तींना इंटरनेटचा वापर सुरक्षित पद्धतीने करायचा आहे तसेच आपला डेटा सुरक्षित ठेवायचा आहे. अशा व्यक्तींसाठी आज आपण व्हीपीएनं विषयी अशीच काही उपयुक्त माहिती जाणून घेणार आहे. 

VPN म्हणजे काय।VPN meaning in marathi 

VPN एक असे नेटवर्क आहे जे आपल्याला Public network म्हणजे इंटरनेट आणि Private network म्हणजे Wifi सोबत सुरक्षित Connection प्रदान करते. व्हीपीएनं आपले नेटवर्क सुरक्षित करते व आपली वैयक्तिक माहिती हॅकर पासून लपवून ठेवण्याचे काम करते.
व्हीपीएनंचा जास्त वापर हा ऑनलाईन व्यवसायात केला जातो. ज्यांचा व्यवसाय हा ऑनलाईन म्हणजेच इंटरनेट वर अवलंबून आहे अशा ठिकाणी व्हीपीएनंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच Organisation, सरकारी agency, Education Institute सारख्या ठिकाणी व्हीपीएनं वापरले जाते. 
प्रत्येक देशामध्ये तेथील सरकार काही वेबसाईटचा वापर करण्यास निर्बंध लावते. अशा वेळेस जर आपण त्या वेबसाईटचा वापर केला तर आपल्यावर कारवाई होऊ शकते तसेच जेलमध्ये देखील टाकले जाऊ शकते. अशा वेळेस जर आपल्याला त्या वेबसाईटचा वापर करायचा असेल व ही सगळी माहिती सरकार कडून लपवून ठेवायची असेल तर आपण व्हीपीएनं वापरु शकतो. 
व्हीपीएनंच्या मदतीने IP Address लपवून व नेटवर्क सुरक्षित करुन आपण हवी ती वेबसाईट वापरु शकतो. 

VPN चा फुल फॉर्म काय आहे ?

व्हीपीएनंचा फुल फॉर्म Virtual Private Network असा आहे. 

VPN कसे काम करते ?

व्हीपीएनंचे मुख्य काम हे आपले इंटरनेट Connection सुरक्षित ठेवणे व आपली वैयक्तिक माहिती इतरांपासून लपवून ठेवणे हे आहे. त्या सोबतच इंटरनेट वरील अशा काही वेबसाईट ज्यांचा वापर करण्यास आपल्या देशात मनाई आहे या वेबसाईटचा Access कुणाला ही न कळता करुन देणे हे देखील व्हीपीएनंचे महत्वाचे काम आहे. 
ज्या वेळी आपण मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्हीपीएनं चालू करतो त्यावेळी व्हीपीएन सोबत जोडलेले आपले Device हे Local Network प्रमाणे काम करते. त्यानंतर आपण जेव्हा ती वेबसाईट ओपन करतो जी आपल्या देशात ब्लॉक केली आहे त्या वेळी व्हीपीएनंचे खरे काम सुरु होते.
आपली वेबसाईट Access करण्याची request ब्लॉक असणाऱ्या वेबसाईट पर्यंत व्हीपीएनं स्वतःच्या सर्वर मार्फत पोहोचवतो. आणि मग त्या वेबसाईट वर असणारी माहिती आपल्या Device वर दाखवते. 
ज्या वेबसाईटचा वापर करण्यास आपल्या देशात मनाई आहे तिचा वापर करण्यासाठी त्या देशात मनाई नसते. मग त्या देशातील व्हीपीएनं आणि आपण वापरत असलेल्या व्हीपीएनंमध्ये एक नेटवर्क Connection तयार होते. हे नेटवर्क Connection Encrypted केलेले असते याचा अर्थ आपली वैयक्तिक माहिती कोणी चोरु शकत नाही. 
तुम्हाला व्हीपीएनंचा वापर करायचा असेल तर इंटरनेट वर फ्री मध्ये तसेच Paid Version हे फोन आणि लॅपटॉपसाठी देखील उपलब्ध आहेत. 

Computer साठी व्हीपीएनं कसे वापरायचे ?

कोणत्याही कॉम्प्युटरसाठी व्हीपीएनं सेट करणे अगदी सोपे काम आहे. तुम्हाला फक्त तुमचे व्हीपीएनं सॉफ्टवेअर ओपन करायचे आहे व तेथे व्हीपीएनं On/Off चे option दिलेले असते. तुम्हाला चालू करायचे कि बंद हे तुम्ही ठरवू शकता. 
व्हीपीएनं चालू किंवा बंद करणे अगदी सोपे आहे. परंतु महत्वाचा प्रश्न हा आपल्यासाठी चांगले व्हीपीएनं सॉफ्टवेअर कोणते आहे हे निवडणे आहे. मी तुम्हाला येथे चांगले व्हीपीएनं सॉफ्टवेअर कोणते आहेत या विषयी सांगणार आहे. त्यातील काही Paid Version आहेत तर काही फ्री आहेत.  
 तुम्ही जर साधारण कामासाठी व्हीपीएनं वापरणार असाल तर व्हीपीएनंचे फ्री Version तुम्ही वापरु शकता. 

Computer साठी Best VPN Software कोणते आहे ? 

  • protonvpn
  • privadovpn
  • hide. me
  • windscribe
  • ZPN Connect
  • tunnelbear

Smartphone साठी व्हीपीएनं कसे सेट करायचे ?

फोनमध्ये व्हीपीएनं वापरण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला Android फोनसाठी Play Store वरुन व iphone साठी AppStore वरुन व्हीपीएनं अँप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर ते Install करुन तुम्ही त्याचा वापर करु शकता. 
आपण खाली स्टेपद्वारे पाहूया हे सर्व कसे करायचे. 
स्टेप १ : पहिल्यांदा आपल्या फोनमध्ये एक व्हीपीएनं अँप डाउनलोड करा. जसे कि, Windscribe हे अँप तुम्ही वापरु शकता. 
स्टेप २ : त्यानंतर ते अँप ओपन करा. येथे तुम्हाला हवी ती Location तुम्ही सेट करु शकता. त्यानंतर Connect बटनावर क्लिक करा. 
स्टेप ३ : Connect केल्यानंतर तुमचा फोन व्हीपीएनं नेटवर्क सोबत कनेक्ट होईल. 

Smartphone साठी Best VPN App कोणते आहे ?

Play Store किंवा AppStore वर तुम्हाला व्हीपीएनं अँप खूप मिळतील. मी तुम्हाला येथे काही चांगल्या व्हीपीएनंची नावे सांगतो. तुम्ही त्यापैकी किंवा या व्यतिरिक्त दुसरे देखील अँप डाउनलोड करु शकता. 
  • Proton VPN 
  • Windscribe VPN
  • Betternet
  • TunnelBear
  • Hotspot Shield
  • Hide me VPN

VPN वापरण्याचे फायदे 

१. व्हीपीएनं वापरुन आपण अशी कोणती हि वेबसाईट जी ब्लॉक करण्यात आली आहे तिचा वापर करु शकतो. 
२. व्हीपीएनंचा वापर करुन आपण आपली वैयक्तिक माहिती(IP Address, Location) ही इतरांपासून लपवू शकतो. 
३. जे Movies किंवा Web Series पाहण्यासाठी मनाई आहे ते तुम्ही व्हीपीएनंच्या मदतीने पाहू शकता. 

VPN वापरण्याचे तोटे 

१. फ्री व्हीपीएनंमध्ये आपल्याला Paid व्हीपीएनं सारखे चांगले Features(सुविधा) मिळत नाही. 
२. इंटरनेट वर तुम्हाला जे व्हीपीएनं मिळतात त्या सर्वांवर तुम्ही विश्वास ठेऊ शकत नाही. 
३. चांगले VPN Provider निवडण्यासाठी तुम्हाला जास्त माहिती काढावी लागेल. 

या लेखावरील माझे मत 

आज आपण येथे VPN म्हणजे काय (vpn information in marathi) पाहिले. ज्याला व्हीपीएनं विषयी काही माहित नव्हते त्या व्यक्तीला वरील माहिती वाचून व्हीपीएनं काय असते व हे कशा प्रकारे काम करते समजले असेल.
तुम्हाला वरील व्हीपीएनं विषयी माहिती कशी वाटली कृपया मला कंमेंटमध्ये कळवा. हि माहिती तुमच्या मित्रांसोबत Share करा. 

Leave a Comment