Digital Signature काय आहे आणि कशी काम करते ?

digital-signature-kay-ahe

आज आपली कोणत्याही कागद पत्रावर किंवा दस्तावेज वर असलेली Signature(सही) हा पुरावा असतो कि आपली त्या कागदपत्रांसाठी मान्यता आहे. तसेच एखाद्या कार्यालयीन कामामध्ये आपण दिलेली सही हि सिद्ध करते कि आपली त्या कार्यास मान्यता आहे.

आजच्या काळात आपण केलेली Signature हि फार महत्वाची असते. कार्यालयीन कामामध्ये किंवा जिथे विश्वास निर्माण करण्याची वेळ येते तिथे आपली एक सही खूप महत्वाची मानली जाते. म्हणून आपण सही करताना फार विचार करतो.
पण आज आपल्या आजू बाजूला असे बरेच व्यक्ती आहेत जे आपल्या सारखीच हुबेहूब Signature करु शकतात. अशा वेळी ती व्यक्ती आपल्या बँकेतील पैसे देखील सहज काढू शकते. ही गोष्ट आपल्याला खरोखर भीती वाटण्यासारखी आहे. 
परंतु आता आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण आपण आता Physical Signature कडून Digital Signature कडे वळलो आहे. ज्यामुळे आपल्या सहीचा चुकीच्या पद्धतीने वापर करता येणे अशक्य आहे. आज आपण येथे Digital Signature काय आहे आणि हे कसे बनवायचे या विषयी माहिती घेणार आहोत. 

Digital Signature काय आहे ?

Digital Signature हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या Document किंवा दस्तावेज विषयी ते खरे आहे कि खोटे हे जाणून घेऊ शकतो. 
Digital Signature हे तंत्रज्ञान अशा प्रकारे बनवण्यात आले आहे जर याच्या सोबत कोणी छेडछाड केली तर ती लगेच पकडली जाईल. यामुळे आपली सही कोणी Copy करु शकणार नाही. 
एक Valid Digital Signature आपल्याला विश्वास देते कि पाठवलेले Document विश्वासू आणि ओळखीच्या व्यक्तीकडून पाठवण्यात आले आहे. हे Document ज्या व्यक्तीने पाठविले आहे ती सुद्धा हि गोष्ट मान्य करते. 

Digital Signature कशी काम करते ?

Digital Signature ही Public-key cryptography वर आधारीत आहे. ज्याला Asymmetric Cryptography असे देखील म्हणतात. ही Cryptography Public Key Algorithm चा वापर करुन दोन Key तयार करते जे Private आणि Public Key या नावाने ओळखले जातात.  
आपल्याकडे आणि आपण ज्या व्यक्तीला Document पाठवणार आहोत अशा दोन्ही व्यक्तींकडे Private आणि Public अशा दोन Key असतात. येथे Document पाठवणाऱ्याला आणि Document Receive करणाऱ्याला दोघांनाही एकमेकांची Public key माहित असते. परंतु दोघांना एकमेकांची Private key माहित नसते. 
Digital Signature कशा प्रकारे काम करते हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण खाली एक उदाहरण पाहूया. 
digital-signature-kay-ahe
समजा, दोन व्यक्ती आहेत. रमेश आणि सुरेश रमेशलाSender) काही महत्वाचे Document सुरेशला(Receiver) पाठवायचे आहेत.
  • ज्या Document वर Digital Signed करण्याची गरज आहे तेथे hash function(छोटा प्रोग्रॅम) apply लागू केला जातो. ज्यामुळे एक ‘numbered sequence’ तयार होतो ज्याला hash म्हणतात. 
  • ह्या hash ला रमेशच्या Private Key द्वारे encrypt केले जाते. 
असे केल्यानंतर Document Digitally Signed होते आणि ते सुरेशला पाठवले जाईल. 
आता सुरेशला ते Signed केलेले Document मिळतील. पण त्या Document ची Authenticity(सत्यता) चेक करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. 
  • सगळ्यात अगोदर सुरेशला ते Document ‘hash function’ करावे लागेल. त्यानंतर त्याला hash(H1) मिळेल. 
  • त्यानंतर Signed document ला decrypt करण्यासाठी रमेशच्या Public key चा वापर करावा लागेल. यानंतर सुरेशला result मध्ये hash(H2) मिळेल. (रमेशने Private key चा वापर करुन जे Document encrypt केले होते ते Document सुरेश हा रमेशच्या Public key चा वापर करुन Decrypt करेल.)
आता दोन्ही hash म्हणजेच H1 आणि H2 ला Compare करावे लागेल. आणि जर H1 आणि H2 दोन्ही सारखे आले म्हणजे पाठवलेले Document खरे आहेत. 

Digital Signature आणि Digital Certificate यामध्ये काय फरक आहे ?

Digital Signature आणि Digital Certificate यामध्ये खूप फरक आहे. Digital Certificate चा वापर एखाद्या वेबसाईटची सत्यता किंवा खरेपणा तपासण्यासाठी केला जातो. तर Digital Signature चा वापर एखादे Document Verify करण्यासाठी केला जातो. 

Digital Signature चे फायदे 

Digital Signature चे मुख्य काम कोणत्याही Digital Document सोबत होणारी छेडछाड किंवा Fraud ला रोखणे हे असते. Digital Signature मुळे आपल्याला कोणत्याही document ची सत्यता कळते. 
Digital Signature चे आणखी देखील काही फायदे आहेत.

१. Authentication –

आपल्या सगळ्यांना माहित आहे कि Digital Signature ही त्या User च्या Private key शी लिंक असते. तसेच ही Private key फक्त तोच वापरु शकतो त्यामुळे document कोणी पाठवले आणि त्या document चा खरा मालिक कोण आहे हे लगेच कळते. 

२. Integrity –

Digital Sign मध्ये जर कोणत्याही प्रकारची गडबड आढळली तर सिद्ध होते कि Digital Signature सोबत कोणी तरी छेडछाड केली आहे. 

३. Non-repudiation –

जर कोणत्या User ने Digital Signature केली आहे तर मग नंतर तो ” मी Digital Signature केली नाही ” असे म्हणू शकत नाही. कारण कोणत्या पण User च्या Digital Signature चा वापर करुन Signing ला Fake(खोटे) बनवले जाऊ शकत नाही. 

या लेखावरील माझे मत 

आज आपण येथे Digital Signature म्हणजे काय तसेच ही signature कशा प्रकारे काम करते हे पाहिले. या ठिकाणी तुम्हाला Digital Signature विषयी सांगितलेली माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. 
Digital Signature सारखीच नवनवीन उपयुक्त माहिती ह्या ब्लॉग वर Publish होत असते. या ब्लॉग वर Publish होणाऱ्या उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 

Leave a Comment