घरबसल्या ५० हजार रुपये कमवून देणारी आहे ही मशीन, ग्राहक स्वतःहा तुमच्याकडे धावत येईल

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आज आम्‍ही तुम्‍हाला एका अशा बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये कमी पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. जर तुम्ही देखील इंटरनेट वर सतत कमी भांडवलामध्ये सुरु होणाऱ्या व्यवसायाची शोधाशोध करत असाल तर आजची ही बिझनेस आयडिया तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल.

जर या व्यवसायात तुम्ही थोडी गुंतवणूक केली तर महिन्याला चांगली कमाई करु शकाल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला २ लाखांचे भांडवल लागेल आणि या मधून तुम्हाला जवळपास ५० ते ६० हजार महिन्याला कमाई चालू होईल. तसेच ही एक प्रकारे नवीन स्टार्टअप आयडिया असल्यामुळे या व्यवसायात जास्त स्पर्धा देखील नाही. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आज तुमच्याकडे योग्य संधी आहे.

vacuum forming मशीनद्वारे होईल भरपूर कमाई

ई-कॉमर्स वेबसाईट वर खूप कंपन्या आपले प्रॉडक्ट विकत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाईन प्रॉडक्ट ऑर्डर करते तेव्हा कंपनी त्या प्रॉडक्टचे पॅकेजिंग चांगल्या प्रकारे करुन ते ग्राहकांपर्यंत पाठवते.

पॅकेजिंग करताना कंपनी प्रॉडक्टच्या बाहेरुन चांगल्या प्रकारे पॅकिंग करते आणि त्यावर विशिष्ट ग्राफिक डिजाईन देखील करते पण पॅकेजिंगच्या आतमध्ये असणारी वस्तू ग्राहकापर्यंत सुरक्षित जाण्यासाठी तिला आत मधून देखील योग्य अशी पॅकिंग करणे गरजेचे असते जेणे करुन ती वस्तू आतमध्ये जास्त हलणार नाही व त्यामुळे डॅमेज देखील होणार नाही.

तुम्ही जेव्हा ऑनलाईन मोबाईल ऑर्डर करता तेव्हा तो फोन आतमध्ये एका कव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारे फिट केलेला असतो. त्यामुळे जेव्हा हा फोन ट्रान्सपोर्ट होऊन आपल्या पर्यंत येतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचे डॅमेज होत नाही. अशा प्रकारे वस्तूची बॉक्सच्या आत मधून चांगली पॅकिंग करुन देण्यासाठी vacuum forming मशीनचा वापर केला जातो.

त्यामुळे तुम्ही देखील व्हॅक्युम फॉर्मिंग मशीन खरेदी करुन कंपनीला पॅकेजिंग करण्याची सर्विस प्रोव्हाईड करु शकता आणि भरपूर पैसे कमवू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला व्हॅक्युम फॉर्मिंग मशीन खरेदी करावी लागेल. ही मशीन तुम्हाला मार्केटमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन १ ते २ लाखाच्या किमतीत मिळून जाईल.

हे पहा – आता प्रत्येक व्यक्तीला मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, केवळ ५ मिनिटात काढा तुमचे आयुष्मान कार्ड

ही मशीन तुम्ही तुमच्या घरी बसून आजूबाजूच्या कंपन्यांना त्यांचे प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे पॅकेजिंग करण्यासाठी मदत करु शकता. व्हॅक्युम फॉर्मिंग मशीनद्वारे पॅकेजिंग करण्याची अशी सर्विस प्रोव्हाइड करुन तुम्ही महिन्याला ५० ते ६० हजार सहज कमवू शकता.

अशाच नवीन बिझनेस आयडियाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment