New Business Idea – घराला स्मार्ट बनवण्याचा व्यवसाय तुमचे नशीब बदलेल, महिन्याच्या अखेरीस होईल लाखोंची कमाई

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्मार्टीकरण आणि परिवर्तन दिसून येत आहे. आज मानवाच्या जीवनाची गरज मानल्या जाणाऱ्या स्मार्ट फोनने आपले जीवन स्मार्ट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मार्केटमध्ये खूप नवीन स्टार्टअप देखील सुरु झाले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्मार्ट बिझनेस आयडिया बद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरात बसून फक्त एका क्लिकवर लाखो रुपये कमवू शकता. ही कल्पना एक नवीन युगाचा व्यवसाय आहे जिथे घरगुती इंटरनेट कनेक्शन, स्मार्ट उपकरणे आणि आपले कौशल्य एकत्र करुन एक फायदेशीर व्यवसाय तयार केला जातो.

पोंगोहोम सोबत सुरु करा व्यवसाय

PongoHome हे होम ऑटोमेशन स्टार्टअप आहे जे घराला स्मार्ट बनवण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरवितात. घरांना अत्यंत सुरक्षित, सोयीस्कर आणि वापरण्यासाठी अनुकूल बनवणे हा या व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे. जर तुम्ही यांच्या सोबत मिळून व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

तुम्ही पोंगोहोमची व्यापारी डीलरशिप किंवा डिस्ट्रिब्युटरशिप घेतल्यावर तुम्हाला त्यांचे सर्व अधिकार आणि सुविधा मिळतील, ज्या तुम्ही तुमच्या क्षेत्रात वापरु शकता. यामुळे तुम्हाला नवीन व्यवसायाची संधी तर मिळेलच, पण त्याच बरोबर तुम्हाला पैसे कमवण्याची संधी ही मिळेल.

आधुनिक काळातील आहे हा व्यवसाय

पोंगोहोम ही एक टेक कंपनी आहे जी तुमच्या घराला स्मार्ट आणि आधुनिक बनवण्यासाठी मदत करते. कंपनी आपल्या नवनवीन उत्पादनांद्वारे घरातील स्विच बोर्ड स्मार्ट बनवते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल वरुन घरातील दिवे चालू किंवा बंद करु शकता, पंखा ऑपरेट करु शकता या व्यतिरिक्त भरपूर काही करु शकता.

smart home

या कंपनीचे तीन प्रमुख प्रॉडक्ट आहेत. पहिले प्रॉडक्ट “होम ऑटोमेशन” आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे घर स्मार्ट होममध्ये कन्व्हर्ट करु शकता आणि सेंट्रल हबद्वारे घरातील सर्व गॅझेट नियंत्रित करु शकता. दुसरे प्रॉडक्ट “कृषी ऑटोमेशन” आहे. ज्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेतातील पाणी मोबाईल वरुन नियंत्रित करु शकतात, ज्यामुळे शेतीची प्रक्रिया सुलभ आणि अधिक प्रभावी होते. कंपनीचे तिसरे प्रॉडक्ट “सेन्सर्स” आहेत. ज्यामध्ये ट्यूब लाइट्स, सीलिंग पॅनेल लाइट्स, डे नाईट सेन्सर लाइट्स आणि स्मार्ट ट्यूब लाइट्स सारख्या उत्पादनांचा समावेश होतो.

पोंगोहोमच्या प्रॉडक्टद्वारे वापरकर्त्यांना त्यांचे जीवन सोयीस्कर आणि सुरक्षित बनवण्यासाठी मदत मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये या उपकरणाद्वारे शेती करण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त, ही उत्पादने डीलरशिपसाठी मोठ्या व्यावसायिक संधी देखील उपलब्ध करुन देतात.

हे पहा – घरबसल्या ५० हजार रुपये कमवून देणारी आहे ही मशीन, ग्राहक स्वतःहा तुमच्याकडे धावत येईल

तुमची घरातील ऊर्जा वाचवण्यासाठी आणि घरगुती गरजा सुनिश्चित करण्यासाठी पोंगोहोम प्रॉडक्टचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे पोंगोहोमच्या मदतीने घराला स्मार्ट बनवण्याचा व्यवसाय सुरु करुन तुम्ही जर महिन्याभरात अशा 30 ते 40 क्लायंटचे काम करुन दिल्यास तुम्ही दरमहा प्रचंड उत्पन्न मिळवू शकता.

अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडियाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment