आता प्रत्येक व्यक्तीला मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, केवळ ५ मिनिटात काढा तुमचे आयुष्मान कार्ड

देशातील गरीब आणि अल्प वर्गातील व्यक्तींना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील लोकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. त्यामुळे ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे.

ही योजना मोदी सरकारने २३ सप्टेंबर २०१८ रोजी सुरु केली असून तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आयुष्मान कार्ड काढण्याचे फायदे

आयुष्मान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला खालील लाभ सरकारद्वारे पुरविले जातात.

 • प्रत्येक वर्षाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
 • १००० पेक्षा जास्त रोगांवर उपचार
 • राज्यातील १३५०+ रुग्णालयात मोफत उपचार
 • रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील १५ दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलेल.
 • आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला १ रुपयाही रोख भरावा लागणार नाही.

आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आवश्यक गोष्टी

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

अशा प्रकारे काढा तुमचे आयुष्मान कार्ड

 1. सर्वात अगोदर तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट(beneficiary.nha.gov.in) वर जावे लागेल.
 2. तेथे तुम्हाला Login as Beneficiary सिलेक्ट करुन मोबाईल नंबर verify करावा लागेल. पुढे log in बटन वर क्लिक करा.
 3. तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला राज्य, योजना, जिल्हा सिलेक्ट करावे लागेल. मग पुढे सर्च बटन वर क्लिक करा.
 4. या नंतर पुढे तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. येथून तुम्ही स्वतःचे आयुष्मान कार्ड सहज डाउनलोड करु शकता.

अशा प्रकारची नवीन माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment