मशीनद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या पेस्टला आहे मोठ्या प्रमाणात मागणी, वर्षाच्या शेवटी होईल करोडोंची कमाई

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्ही लहान स्तरावर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर मग हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य राहील. कारण हा व्यवसाय तुम्ही अगदी घरी बसून कमी भांडवलामध्ये सुरु करु शकता. तसेच हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही गावाला किंवा शहरात रहायला असायला हवे असे देखील नाही. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल.

कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला करेल मालामाल

कांद्याची पेस्ट जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हॉटेलमध्ये लोकांना जेवण बनवताना कांद्याची पेस्ट जास्त प्रमाणात वापरली जाते. हॉटेलमध्ये कांद्याची पेस्ट तयार करण्यापेक्षा हे लोक मार्केट मधून डायरेक्ट कांद्याची पेस्ट खरेदी करतात. त्यामुळे कांद्याच्या पेस्टला जास्त प्रमाणात मागणी वाढत आहे.

या व्यतिरिक्त कांद्याची पेस्ट केसांचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वापरली जाते. त्यामुळे ग्रूमिंग इंडस्ट्रीमध्ये देखील या पेस्टची मागणी वाढत आहे.

कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात कच्चा माल म्हणजे कांद्याची आवश्यकता असते. हा कच्चा माल तुम्हाला गरज असेल त्या प्रमाणात तुम्ही खरेदी करु शकता. या व्यतिरिक्त कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी एक पेस्ट मेकर मशीनची गरज पडते. ही मशीन तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाईन दीड लाखांपर्यंत मिळून जाईल. तसेच एक पॅकिंग मशीन देखील लागेल ती जवळपास तुम्हाला ५० हजार रुपयात मिळून जाईल.

जर तुमच्याकडे मशीन घेण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही भारत सरकारद्वारे मिळणाऱ्या मुद्रा योजने अंतर्गत लोनसाठी अप्लाइ करु शकता. अशा प्रकारे मात्र २ लाखांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता.

हे पहा – नोकरी करण्यापेक्षा रेल्वे सोबत हा व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला ६० हजार कमाई चालू करा

कमाई किती होईल?

बाजारामध्ये कांद्याची पेस्ट २०० ते ४५० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. तुम्ही ही पेस्ट तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात विकू शकता. दिवसाला सरासरी हॉटेलमध्ये किमान १० किलो कांद्याची पेस्ट लागते. जर तुम्ही फक्त एका हॉटेलला दररोज १० किलो पेस्ट १०० रुपये किलो भावाने विकली तर तुम्ही दिवसाला १००० आणि महिन्याला ३० हजार कमाई करु शकाल.

तसेच जर तुम्ही दररोज २ ते ३ हॉटेलला कांद्याची पेस्ट विकली तर तुम्ही महिन्याला सहज १ लाख रुपये कमवू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment