Railway Business Idea – नोकरी करण्यापेक्षा रेल्वे सोबत हा व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला ६० हजार कमाई चालू करा

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही आजच रेल्वे सोबत स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता. अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही रेल्वे सोबत व्यवसाय सुरु करु शकता आणि महिन्याला हजारो रुपये कमवू शकता.

रेल्वे तिकीट बुक करण्याचा व्यवसाय

भारतीय रेल्वे कंपनीची सहायक कंपनी IRCTC ट्रेन तिकीट बुक करण्यासोबत आणखी खूप प्रकारच्या सुविधा पुरवते. तुम्ही स्वतः IRCTC सोबत काम करुन हजारो रुपये कमवू शकता. जर तुम्हाला देखील रेल्वे सोबत व्यवसाय करुन भरपूर पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला IRCTC च्या मदतीने तिकीट एजंट बनावे लागेल.

लोक रेल्वेने प्रवास करण्यासाठी स्टेशन वर जाऊन तिकीट बुक करताना तुम्ही पाहिले असेल. पण तिकीट बुक करण्याचा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे ऑनलाईन तिकीट बुक करणे. भारतीय रेल्वेने अशा प्रकारे ऑनलाईन तिकीट बुक करण्याची जिमेदारी IRCTC कंपनीला दिली आहे.

सध्या लोक रेल्वे स्टेशन वर जाऊन तिकीट बुक करण्यापेक्षा ऑनलाईन तिकीट बुक करणे जास्त पसंद करतात. त्यामुळे जर तुम्ही IRCTC साठी तिकीट एजंट झाला तर लोकांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यास मदत करुन महिन्याला चांगली कमाई करु शकाल.

अशा प्रकारे बना रेल्वे तिकीट एजंट

रेल्वे तिकीट एजंट बनण्यासाठी तुम्ही IRCTC च्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन एजंट बनण्यासाठी request अप्लाई करु शकता. या व्यतिरिक्त तुम्ही erail वेबसाईटच्या माध्यमातून देखील तिकीट एजंट बनण्यासाठी रजिस्ट्रेशन करु शकता.

रेल्वे तिकीट एजंट बनण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि फोटोची आवश्यकता असते.

हे पहा – नोकरीपेक्षा नाश्ता बनवण्याच्या व्यवसायात होते जास्त कमाई

किती होईल कमाई?

रेल्वे तिकीट एजंट झाल्यानंतर प्रवाशांचे तिकीट बुक केल्यावर तुम्हाला ठराविक प्रमाणात कमिशन मिळते. प्रवाशांचे तिकीट बुक करताना तुम्हाला खालील प्रकारे कमिशन मिळते.

  • Non AC Class Ticket ( SL, 2S ) – २० रुपये प्रति तिकीट
  • AC Class Ticket (1A, 2A, 3A, CC) – ४० रुपये प्रति तिकीट
  • Additional PG Commission – १ टक्के

जर तुम्ही दिवसाला केवळ १०० लोकांचे नॉन एसी क्लासचे तिकीट बुक केले तर २० रुपये प्रति तिकीट प्रमाणे तुम्ही दिवसाला २००० आणि महिन्याला ६० हजार रुपये कमाई कराल. या व्यतिरिक्त जर तुम्ही एसी क्लासचे तिकीट बुक केले तर आणखी जास्त पैसे कमवू शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment