Swiggy सोबत हा व्यवसाय सुरु करुन महिन्याला होईल लाखोंची कमाई, ग्राहक स्वतःचा तुमच्याकडे येईल

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा तुम्हाला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाईम जॉब हवी असेल तर अशा परिस्थितीत Swiggy सोबत काम करुन पैसे कमवण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा एक खूप चांगला पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहे.

Swiggy हि कंपनी देशातील विविध शहरांतील लोकांना Food Services पुरवते. फूड सर्विसेस पुरवण्यासाठी ही देशामध्ये प्रचलित आहे. त्यामुळे ह्या कंपनी सोबत काम करुन किंवा व्यवसाय करुन पैसे कमवण्याची चांगली संधी आपल्याला मिळत आहे. 

आज आम्ही तुम्हाला येथे Swiggy सोबत व्यवसाय करुन पैसे कसे कमवायचे या विषयी माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांसाठी, बेरोजगारसाठी तसेच व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीसाठी ही माहिती फार उपयुक्त ठरणार आहे. 

Swiggy काय आहे? 

Swiggy भारतातील सगळ्यात मोठी ऑनलाईन फुड ऑर्डर करण्याची प्रसिद्ध कंपनी आहे. ह्या कंपनीची सुरुवात राहुल जैमिनी यांनी २०१४ साली केली होती. सुरुवातीच्या वेळेस फक्त ६ डिलिव्हरी boy आणि २५ हॉटेल्स सोबत त्यांनी सुरुवात केली होती. 

काही कालावधीनंतर लोकांना यांची सर्विस फार आवडू लागली. त्यामुळे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात नवनवीन रेस्ट्रॉरंट आणि हॉटेल्स जोडले जाऊ लागले. त्या सोबतच Swiggy ची सर्विस वापरणाऱ्यांमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली. 

आज Swiggy देशातील लाखो लोकांना जॉब देते. तसेच यांच्या सोबत व्यवसाय देखील लोक मोठ्या प्रमाणावर करत आहे. 

Swiggy सोबत व्यवसाय करण्याचा Scope काय आहे?

पूर्वी लोक हॉटेल्स किंवा रेस्ट्रॉरंटमध्ये जाऊन आवडते पदार्थ खात होते. पण आता सर्व डिजिटल झाले आहे. आता आपण हॉटेल मधील सर्व पदार्थ घरबसल्या ऑनलाईन मागवू शकतो. त्यामुळे सर्व जण हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरी बसूनच हवे ते मागवून घेतात. 

दरवर्षी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्या सोबतच Swiggy सारख्या ऑनलाईन फुड सर्विसचा लाभ घेणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्या सर्वांसाठी स्विगी सोबत व्यवसाय करण्याची व पैसे कमवण्याची चांगली संधी आहे. 

Swiggy सोबत व्यवसाय करण्याची पद्धत 

Swiggy सोबत व्यवसाय करण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत.

  • Swiggy पार्टनर व्यवसाय 
  • Swiggy Delivery Boy व्यवसाय 
1. Swiggy पार्टनर व्यवसाय

जर तुमचे लहान रेस्ट्रॉरंट किंवा हॉटेल असेल व त्यामध्ये जास्त लोक येत नसतील तर तुम्ही स्विगी सोबत जोडले जाऊन स्वतःच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या वाढवू शकता. तसेच जर तुमचे हॉटेल चांगले चालत असेल पण तुम्हाला हा व्यवसाय अधिक वाढवायचा असेल. अशा परिस्थितीत देखील तुम्ही स्विगी सोबत जोडले जाऊन तुमचे हॉटेल ऑनलाईन नेऊन अधिक ग्राहक मिळवू शकता. 

Swiggy पार्टनर बनण्यासाठी योग्यता –

जर तुमची Swiggy सोबत पार्टनर बनण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पार्टनर बनण्याच्या योग्यता (Eligibility) विषयी माहित असणे गरजेचे आहे. स्विगीचे पार्टनर बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे खाली पाहूया. 

१. स्विगीचा पार्टनर बनण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे एखादे रेस्ट्रॉरंट/हॉटेल किंवा कॅफे असणे फार गरजेचे आहे. जर तुमचे स्वतःचे हॉटेल नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या चांगल्या हॉटेल सोबत भागीदारी करु शकता. 

२. स्विगीचा पार्टनर बनण्यासाठी तुमचा व्यवसाय Government on India सोबत रजिस्टर असला पाहिजे.

३. स्विगी पार्टनर बनण्यासाठी तुमचे स्वतःचे बँक अकाऊंट असणे देखील गरजेचे आहे.

४. स्विगी पार्टनर बनण्यासाठी तुमच्या जवळ फूड लाईसन्स असणे फार गरजेचे आहे. जर तुमच्या जवळ फूड लाईसन्स नसेल तर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे लाईसन्स काढून घ्या.

५. या सोबतच स्विगी सोबत पार्टनर बनण्यासाठी तुमच्या जवळ एक कॅन्सल चेक असणे देखील गरजेचे आहे.

६. आधार कार्ड आणि पॅन कार्ड झेरॉक्स 

७. तुमच्या हॉटेल मधील मेनू 

Swiggy पार्टनर कसे बनायचे?

स्विगी सोबत पार्टनर बनणे फार सोपे आहे. स्विगी सोबत पार्टनर बनण्यासाठी तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता.

स्टेप १ : सर्वात अगोदर तुम्हाला स्विगीच्या Official वेबसाईट वर जाऊन Partner with us च्या Option मध्ये जावे लागेल. 

स्टेप २ : तेथे तुम्हाला Get Started चे Option दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगितले जाईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला हॉटेल संबंधित सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 

स्टेप ३ : जेव्हा तुम्ही सगळा फॉर्म भराल त्यानंतर तुम्हाला स्विगी कडून एक Confirmation call येईल. 

स्टेप ४ : स्विगीमध्ये आपले हॉटेल किंवा रेस्ट्रॉरंट रजिस्टर करण्यासाठी Apply केल्यानंतर तुम्हाला दोन आठवडे वाट पाहावी लागेल. 

स्टेप ५ : त्यानंतर तुम्हाला स्विगीच्या Sales Executive Team सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करावे लागेल. कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याअगोदर ते नीट वाचून घ्या. 

Swiggy पार्टनर बनल्यावर कमीशन किती मिळेल ?

स्विगी सोबत पार्टनर बनल्यानंतर तुमच्या हॉटेलच्या जेवणावर व प्रसिद्धीनुसार त्यांना कमिशन द्यायचे असते. स्विगीचा पार्टनर बनून तुम्ही १५ ते २५ टक्के कमिशन त्यांना देता. पण जेव्हा तुमच्याकडे दिवसाला ५० किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डर येतात त्यानंतर तुम्हाला स्विगीला कमिशन देण्याची गरज नसते. 

2. Swiggy Delivery Boy व्यवसाय

जर तुम्ही बेरोजगार असाल तर अशा वेळेस तुम्ही स्विगी डिलिव्हरी बॉयची जॉब करुन चांगले पैसे कमवू शकता. तसेच जर तुम्ही कॉलेज Student असाल तर पार्ट टाइममध्ये तुम्ही हे काम करु शकता आणि स्वतःचा खर्च भागवू शकता. 

स्विगी आपल्याला तीन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी देते. ते म्हणजे Morning, Evening आणि Night. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कामाची वेळ निवडू शकता. 

Swiggy Delivery Boy बनण्यासाठी योग्यता 

स्विगी डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी तुमच्यामध्ये खालील गोष्टींची पूर्तता किंवा योग्यता असणे गरजेचे आहे.

१. जे लोक दहावी पास आहेत तेच केवळ स्विगी डिलिव्हरी बॉयची जॉब करु शकतात. 

२. डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी तुमच्या जवळ बाईक असणे गरजेचे आहे. 

३. डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी तुमच्या जवळ ड्रायविंग लाईसन्स व गाडीची सर्व कागदपत्रे असणे देखील गरजेचे आहे. 

४. स्वतःची Identity सिद्ध करण्यासाठी तुमच्या जवळ आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे गरजेचे आहे. 

५. तुमचे एखाद्या बँकेत अकाऊंट असणे देखील गरजेचे आहे.

६. त्यानंतर एक स्मार्टफोनची देखील तुम्हाला गरज पडेल. 

वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहे जर तुम्हाला स्विगी डिलिव्हरी बॉयचे काम करायचे असेल तर. 

Swiggy Delivery Boy बनण्यासाठी फी 

जर तुम्हाला स्विगीसाठी डिलिव्हरी बॉयचे काम करायचे असेल तर त्यासाठी १२०० ते १५०० रुपये Joining फी द्यावी लागते. 

हे पहा – लेमनग्रासच्या मागणीत होतेय मोठ्या प्रमाणात वाढ, २५ हजार रुपये गुंतवून ५ लाख रुपये होईल कमाई

Swiggy Delivery Boy ची Salary किती असते ?

जर तुम्ही डिलिव्हरी बॉयचे काम पार्ट टाईम करणार असाल तर महिन्याला तुम्ही १० ते १२ हजार रुपये सहज कमवू शकता. पण हेच काम जर तुम्ही फुल टाईम केले तर महिन्याला सहज २० ते २५ हजार रुपयांपर्यंत कमवू शकता. 

स्विगी सोबत व्यवसाय कसा करायचा तसेच यासाठी कोणत्या अटी आहेत ह्या आणि अशा अनेक महत्वाच्या गोष्टींविषयी आपण उपयुक्त माहिती येथे पाहिली आहे. स्विगी सोबत व्यवसाय करुन पैसे कमवण्यासाठी ऐवढी माहिती पुरेशी आहे. 

तुम्ही देखील स्विगी सोबत व्यवसाय करणार आहात का हे आम्हाला कंमेंटमध्ये कळवा.

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment