या गवताच्या मागणीत होतेय मोठ्या प्रमाणात वाढ, २५ हजार रुपये गुंतवून ५ लाख रुपये होईल कमाई

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

आज आपले शेतकरी फक्त पारंपरिक शेतीच नाही करत. तर ते आता अशा प्रकारची शेती करत आहे ज्या मधून त्यांना चांगला नफा होईल. शेतकरी सध्या खास प्रकारच्या पिकांची लागवड करु लागले आहेत. ज्यामध्ये त्यांना कमी मेहनतीमध्ये चांगले उत्पन्न मिळत आहे. त्या सर्व पिकांमध्ये लेमनग्रास हे पीक सध्या शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळवून देत आहे.

जर तुम्हाला देखील शेतीमध्ये इतरांपेक्षा वेगळे काही तरी करुन चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही लेमनग्रासचा व्यवसाय सुरु करु शकता.

बाजारात वाढतेय लेमनग्रासची मागणी

लेमनग्रासचा वापर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी सध्या केला जात आहे. त्यातील सर्वात फेमस प्रॉडक्ट म्हणजे लेमन टी बनवण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

या व्यतिरिक्त डिओडोरंट्स, साबण आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुगंध म्हणून हे वापरले जाते. तसेच लेमनग्रासचा वापर व्हिटॅमिन ए आणि नैसर्गिक सायट्रल तयार करण्यासाठी देखील केला जातो.

अशा प्रकारे सुरु करा व्यवसाय

लेमनग्रासचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला अगोदर पेरणीची तयारी करावी लागेल. लेमनग्रासची पेरणी करण्यासाठी पावसाळ्याचे दिवस उत्तम मानले जातात. कारण या दिवसांमध्ये हवेत भरपूर आद्रता असल्याने पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे लेमनग्रासची झाडे सहज वाढतात.

पेरणी केल्यानंतर लेमनग्रासच्या चांगल्या उत्पादनासाठी १५ दिवसांच्या आत पाणी दिले जाते. यामुळे गवताचे उत्पादन चांगले होते. हे पीक चांगले उगवल्यानंतर आपण वर्षातून तीन ते चार वेळा याची कापणी करु शकतो.

कमाई किती होईल?

एक हेक्टरमध्ये लेमनग्रासची पेरणी केल्यानंतर एका वेळेस १२ ते १३ टन लेमनग्रास काढता येते. अशा प्रकारे एक वर्षामध्ये जवळपास ६० ते ६५ टन लेमनग्रास मिळेल.

एक टन गवतापासून 5 लिटर तेल तयार होते. जे बाजारात जवळपास १२०० ते १५०० रुपये प्रति लिटरने विकले जाते. अशा प्रकारे लेमनग्रासच्या तेलाद्वारे तुम्ही वर्षाला ४ ते ५ लाख कमवू शकता.

हे वाचा – एक अंड ५० रुपयांना तर सामान्य चिकन पेक्षा चारपट महाग विकले जाते या कोंबडीचे मांस – असा सुरु करा व्यवसाय

किती खर्च होईल?

जर एका हेक्टरमध्ये लेमनग्रासची पेरणी केली तर तुम्हाला 50 हजार रुपये खर्च येतो. मग पुन्हा याची पेरणी करावी लागत नाही.

लेमनग्रासच्या पेरणीसाठी सुमारे १० हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये काढणी, खुरपणीचा खर्च जोडल्यास २०-२५ हजार रुपये होतात. अशा प्रकारे फक्त २५ हजार रुपये गुंतवून तुम्ही वर्षाला ५ लाख रुपये कमवू शकता.

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment