Driving Licence साठी ऑनलाईन Apply कसे करायचे।Driving Licence application online Maharashtra

ज्या वेळेस आपण ऑफलाईन Driving license काढण्याचा विचार करतो. त्या वेळेस आपल्या सर्वांना RTO ऑफीसचे किती चक्कर मारावे लागतात, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक Driving license काढत नाही.

जर तुम्ही गाडी वापरत असाल तर तुमच्याकडे ड्रायविंग लाईसन्स असणे फार गरजेचे आहे. अन्यथा जर तुम्हाला पोलिसांनी पकडले तर तुम्हाला खूप मोठा फाईन द्यावा लागेल. हा फाईन वाचवण्यासाठी तसेच Highway वर सुरक्षित प्रवास करण्यासाठी Driving license काढून घेणे फार गरजेचे आहे.

मी तुम्हाला या ठिकाणी Driving Licence application online Maharashtra विषयी माहिती सांगणार आहे.

मी तुम्हाला येथे ऑनलाईन पद्धतीने Learning License आणि Driving license कसे काढायचे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. जेणे करुन तुम्ही घरबसल्या स्वतःचे लाईसन्स मागवू शकता.

ड्रायविंग लाईसन्स काढण्याची सर्व प्रोसेस ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे तुम्ही घरात बसून तुमच्या फोन किंवा लॅपटॉप वरुन ड्रायविंग लाईसन्स application फॉर्म भरु शकता.

Driving Licence application online Maharashtra

ड्रायविंग लाईसन्स काय आहे ?

ड्रायविंग लाईसन्स एक असे Official document आहे जे भारत सरकारद्वारे पुरविण्यात येते. ड्रायविंग लाईसन्समुळे आपल्याला कार, bike, ट्रक किंवा बस सार्वजनिक रस्त्यावर चालवण्याचा अधिकार मिळतो.

भारतामध्ये ड्रायविंग लाईसन्स हे त्या राज्यातील RTA(Regional Transport Authority) व RTO(Regional Transport Office) द्वारे पुरविण्यात येते.

सन १९८८ मधील Motor Vehicle Act नुसार कोणताही भारतीय नागरिक ड्रायविंग लाईसन्स शिवाय रस्त्यावर गाडी चालवू शकत नाही. ड्रायविंग लाईसन्स नसताना गाडी चालवताना भेटल्यास त्याला फाईन(रक्कम) भरावा लागतो.


ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी वय मर्यादा

ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी भारत सरकारने काही वयो-मर्यादा लावल्या आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारचे वाहन चालवणार आहात या नुसार हि वय मर्यादा वेगवेगळी आहे.

1. मोटरसायकल (घेर नसलेली ५०cc पर्यंत क्षमता असणारी)

अशा प्रकारची गाडी चालवण्यासाठी व्यक्तीचे वय कमीत कमी १६ वर्षे असले पाहिजे. त्यासोबत आई-वडिलांची अनुमती असणे देखील गरजेचेआहे.

2. मोटरसायकल घेर असलेली

येथे त्या व्यक्तीचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

3. व्यावसायिक जड आणि वाहतूक वाहने

अशा प्रकारची वाहने चालवण्यासाठी व्यक्ती ८वी पास तसेच १८वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. (काही राज्यांमध्ये २० वर्ष पूर्ण असणे गरजेचे असते.)


ड्रायविंग लाईसन्ससाठी लागणारी कागदपत्रे।Driving licence documents in marathi

ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हि कागदपत्रे तुम्हाला ड्रायविंग लाईसन्स काढताना जमा करावी लागतात.

तुमचे ड्रायविंग लाईसन्स पटकन निघण्यासाठी तसेच लाईसन्स काढताना कोणता हि अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती कागदपत्रे देणे गरजेचे आहे.

ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी खालील कागदपत्रे गरजेची आहेत.

Age Proof (खालीलपैकी एक Document पाहिजे)

  • Birth Certificate
  • PAN Card
  • Passport
  • 10th Classmark Sheet
  • शाळा सोडल्याचा दाखला

कायमचा पत्ता असण्याचा पुरावा (खालीलपैकी एक Document पाहिजे)

  • पासपोर्ट
  • आधार कार्ड
  • लाईट बिल
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड

Learning Licence साठी ऑनलाईन Apply कसे करायचे ?

ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी Learning Driving license नंबर असणे गरजेचे आहे. या शिवाय ड्रायविंग लाईसन्स काढणे शक्य नाही.

सर्वात अगोदर Learning License काढणे गरजेचे असते. Learning License काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

1. तुम्हाला सर्वात अगोदर सारथी वेबसाईटला ओपन करावे लागेल. तेथे तुम्हाला Apply for learner licence चे Option दिसेल त्यावर क्लिक करा.

2. लर्निंग लाईसन्स काढण्यासाठी आपल्याला ज्या स्टेप फॉलो कराव्या लागतील त्या सर्व येथे दिसतील. पुढे Continue बटनावर क्लिक करा.

3. तुमच्या समोर खालील पेज ओपन होईल. येथे तुम्हाला Applicant does not hold any Driving/Learner license issued in india या पर्यायावर क्लिक करा. मग Submit बटनावर क्लिक करा.

4. नंतर खालील पेज ओपन होईल. येथे Authentication प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे किंवा मोबाईल नंबरद्वारे प्रोसेस पूर्ण करु शकता.

आधार कार्डद्वारे पूर्ण करणार असल्यास Submit via Aadhaar Authentication व मोबाईल नंबरद्वारे प्रोसेस पूर्ण करणार असल्यास Submit without Aadhaar Authentication पर्यायावर क्लिक करा.

5. Authentication प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे एक फॉर्म येईल. फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, राज्य, RTO office, वय, शिक्षण, पत्ता, Vehicle class सिलेक्ट करुन Submit बटनावर क्लिक करा. 

6. इथे Acknowledgement फॉर्म Generate होईल. तुम्हाला इथे काही Documents अपलोड करावे लागतील. त्यानंतर टेस्ट Schedule करुन पेमेंट करुन फॉर्म पूर्ण होईल.

अशा प्रकारे तुम्ही लर्निंग लाईसन्स ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.


Driving Licence साठी ऑनलाईन Apply कसे करायचे?

जर तुमच्या जवळ सर्व आवश्यक Documents तसेच Learning License नंबर असेल तर तुम्ही ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी पात्र आहात.

ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

1.  पहिल्यांदा सारथी वेबसाईट ओपन करा. तुमच्या समोर खालील पेज ओपन होईल. तेथे Apply for Driving License या पर्यायावर क्लिक करा.

2. तुमच्या समोर खालील पेज ओपन होईल. येथे तुम्हाला Learning License नंबर आणि जन्म तारीख टाकायची आहे. पुढे OK बटनावर क्लिक करा.

3. पुढे तुम्हाला फोटो, सही आणि इतर महत्वाचे Document अपलोड करुन Submit करायचे आहे.

4. तुम्हाला Driving Test Schedule करावी लागेल. त्यानंतर Fee Payment करा. नंतर तुमच्या फोन नंबर व ई-मेल ऍड्रेस वर Acknowledgement मेसेज गेला असेल.

तुम्ही ज्या दिवशी Driving Test Schedule केली असेल त्या दिवशी RTO Office जाऊन टेस्ट पूर्ण करा. मग काही दिवसा नंतर तुम्हाला ड्रायविंग लाईसन्स मिळेल.


ड्रायविंग लाईसन्सची फी किती असते।Driving licence fees in maharashtra

ड्रायविंग लाईसन्स काढण्यासाठी खालील प्रकारे फी/रक्कम आकारली जाते. हि रक्कम महाराष्ट्र राज्यात पुढीलप्रमाणे आकारली जाते. 

  • Learning License – १५१ रुपये आणि Test Fee ५० रुपये 
  • Driving License – ७१६ रुपये 
  • Renewal of Driving License – ४१६ रुपये. कालावधी संपल्यानंतर अर्ज केल्यास १००० रुपये 
  • Duplicate Driving License – २१६

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ड्रायविंग लाईसन्स (Driving Licence application online Maharashtra) काढू शकता.

ऑनलाईन पद्धतीने Learning License आणि Driving License काढत असल्यामुळे तुम्हाला सारखे RTO ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. तुम्हाला फक्त Test देण्यासाठी RTO ऑफिसला जावे लागेल.

हे वाचा – Meme म्हणजे काय आणि हे कसे बनवायचे ?


आज तुम्ही काय शिकलात ?

Driving license काढण्यासाठी आपल्याला अनेक Process कराव्या लागतात. ह्या सगळ्या Process पूर्ण करण्यासाठी आपल्याला RTO ऑफिसला खूप वेळा जावे लागते.

पण, वरील माहिती वाचल्यानंतर तुम्हाला आता सारखे RTO ऑफिसला जाण्याची गरज पडणार नाही. Driving license काढण्यासाठी ऑनलाईन Apply कसे करायचे हि माहिती सर्वांसाठी फार उपयुक्त आहे.

आपल्या ब्लॉग वर तुम्हाला अशीच उपयुक्त माहिती मिळत असते. हि माहिती तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी डाव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा.

Leave a Comment