कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई करायची असेल तर अमूल सोबत सुरु करा हा व्यवसाय

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा प्रत्येकाला असते पण व्यवसाय कोणता करावा हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची माहिती देणार आहे. हा व्यवसाय १२ ही महिने चालतो. तसेच अमूल सारख्या मोठ्या कंपनीची साथ तुमच्या सोबत असेल. तर हा व्यवसाय आहे अमूलची फ्रेंचायझी ओपन करुन डेअरी प्रॉडक्ट विकण्याचा.

दूध, दही, आईस्क्रीम या सारख्या डेअरी प्रॉडक्टची मागणी वर्षभर असते. ग्राहकांना या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी अमूल व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांना आपली फ्रेंचायझी ऑफर करते. अमूल ही कंपनी आपल्या देशात फेमस असून तिचे प्रॉडक्ट लोक मोठ्या प्रमाणावर विकत घेतात. त्यामुळे अमूल कंपनीची फ्रेंचायझी विकत घेऊन आपण चांगली कमाई करु शकतो.

जर तुम्हाला देखील अमूल फ्रेंचायझी विकत घ्यायची असेल आणि याद्वारे चांगली इनकम करायची असेल, तर या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतील या विषयी आम्ही खाली माहिती देणार आहे. अमूल सोबत व्यवसाय करण्याचे तसे बरेच फायदे आहेत परंतु त्यातील एक फायदा म्हणजे तुम्हाला प्रॉफिट शेयरिंगसाठी विचारले जात नाही तर अमूल तुम्हाला कमिशनवर वस्तू पुरवते.

किती गुंतवणूक करावी लागेल?

अमूल फ्रेंचायझी विकत घेण्याअगोदर तुम्हाला त्यांच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. जसे की तुमचे दुकान मुख्य रस्त्यावर किंवा बाजारात असले पाहिजे. तुम्ही कोणती फ्रेंचायझी घेत आहे त्यानुसार दुकानासाठी आवश्यक जागा हवी.

अमूल फ्रेंचायझीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे २ ते ५ लाख असले पाहिजे. अमूल साधारणपणे दोन प्रकारच्या फ्रेंचायझी आपल्याला ऑफर करते. त्या दोन फ्रेंचायझी विषयी आपण पुढे जाणून घेऊया.

किती खर्च होईल?

अमूल आपल्याला दोन प्रकारच्या फ्रेंचायझी ऑफर करते. एक म्हणजे अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रेंचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी.

जर तुम्हाला पहिल्या फ्रेंचायझीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर २ लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून २५,००० द्यावे लागतील. या व्यतिरिक्त तुमच्याकडून रिनोवेशनसाठी 1 लाख रुपये आणि इक्वीपमेंटसाठी 75 हजार रुपये घेतले जातील.

तसेच जर दुसऱ्या फ्रेंचायझीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ६ लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुमच्या कडून 50,000 रुपये सिक्युरिटी, 4 लाख रुपये रिनोवेशनसाठी आणि 1.50 लाख रुपये इक्वीपमेंटसाठी घेतले जातील.

अमूल फ्रेंचायझीनॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटीरिनोवेशनइक्वीपमेंटएकूण गुंतवणूक
अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रेंचायझी२५,०००१,००,०००७५,०००= २,००,०००
अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी५०,०००४,००,०००१,५०,०००= ६,००,०००
किती कमिशन मिळेल?

जर तुम्ही अमूल आउटलेटची फ्रेंचायझी घेतली तर कंपनी तुम्हाला अमूल प्रोडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राइज म्हणजेच एमआरपीवर कमिशन देते. अमूल आउटलेट फ्रेंचायझीमध्ये तुम्हाला एका मिल्क पाऊचवर 2.5 टक्के, मिल्क प्रोडक्ट्सवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. 

जर तुम्ही अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी घेतली तर तुम्हाला रेसिपीवर बेस्ड आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50% कमिशन मिळते. कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के कमिशन आणि अमूल प्रोडक्‍ट्स वर 10 टक्के कमिशन देते.

अमूल फ्रेंचायझी सुरु करण्यासाठी आवश्यक घटक

अमूल फ्रेंचायझी सुरु करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्या तुम्ही खाली पाहू शकता.

  • डीप फ्रीजर
  • विसी कूलर
  • दूध कूलर
  • पिझ्झा ओव्हन
  • उपकरणे
  • मिक्सर
  • कोन हँडलर मशीन
  • POS मशीन

हे वाचा –  ही क्रीम बनवून होईल भरपूर कमाई, गावात किंवा शहरात राहून सुरु करा हा व्यवसाय

अमूल फ्रेंचायझी सुरु करण्याचे फायदे

ब्रँड नेम: दुधाशी संबंधित वेगवेगळे प्रॉडक्ट ग्राहकांना पुरवण्यामध्ये आणि ग्राहकांचा प्रॉडक्ट वरील विश्वास जपून ठेवण्यामध्ये अमूल कंपनी अग्रेसर आहे. आज संपूर्ण देशात दुधाचे प्रॉडक्ट विकण्यासाठी अमूल हे ब्रँड बनले आहे.

ग्राहकांची मोठी बाजारपेठ: दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत अमूलने स्वत:ची मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. त्यामुळे ही फ्रेंचायझी तुम्हाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी आणण्याची शक्यता आहे.

सुलभ ऑपरेशन्स: अमूल फ्रेंचायझी फंक्शनच्या दृष्टीने सुलभ व्यवस्थापनासह येते. यामध्ये उत्पादनांचे स्टोरेज, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि प्रॉडक्टचे वितरण करणे सोपे होते.

वाजवी गुंतवणूक: ही फ्रेंचायझी तुमच्या भांडवली क्षमतेनुसार तुम्ही घेऊ शकता अशा विविध गुंतवणुकीच्या संधी आणते आणि वाजवी नफा मार्जिनसह येते.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment