तुम्ही सुद्धा फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता का? मग एकदा ही माहिती वाचाच

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जुगाड करण्याच्या बाबतीत आपला भारत देश फार पुढे आहे. खराब परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी इथे लोक विविध प्रकारचे जुगाड करत असतात. त्यातील एक जुगाड म्हणजे फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणे. जर बाहेर फिरताना आपल्याला अचानक पैशांची गरज पडली तर आपण फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेले पैसे वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का फोनच्या कव्हरमध्ये ठेवलेले पैसे तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात.

फोनमध्ये लागू शकते आग

आजकाल मोबाईल फोनमुळे आग लागणे किंवा स्फोट होणे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण असे होण्यामागे आपला निष्काळजीपणा देखील असू शकतो. फोन जास्त गरम झाल्यामुळे आग लागते.

फोनचा जास्त वापर केल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यामुळे देखील असे होऊ शकते. या व्यतिरिक्त फोनच्या प्रोसेसर किंवा बॅटरी वर जास्त दबाव आल्याने देखील असे होते. जेव्हा आपण फोनला चुकीच्या पद्धतीचा कव्हर लावतो तेव्हा बॅटरी जास्त गरम होते आणि हीट बाहेर न पडल्यामुळे देखील आग लागण्याची शक्यता असते.

फोनच्या कव्हरमुळे वाढते तापमान

अनेक तज्ञ कव्हर शिवाय फोन वापरण्याची शिफारस करतात. या मागचे मुख्य कारण म्हणजे कव्हरमुळे फोन जास्त गरम होत असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर फोनच्या कव्हरचा प्रोसेसर वर ही परिणाम होऊ शकतो आणि तो जास्त गरम होऊ शकतो.

त्यामुळे फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवणे टाळावे, अन्यथा प्रोसेसर जास्त गरम झाल्यास नोटला आग लागू शकते. फोनमध्ये नोट ठेवण्याची पद्धत इतकी धोकादायक आहे की जास्त तापमानामुळे फोनचा स्फोट देखील होऊ शकतो.

हे वाचा – चक्क ३ महिन्यांसाठी मोफत वापरु शकता नेटफ्लिक्स! अशा प्रकारे फ्री मध्ये मिळेल नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन

फोन कव्हर फोनमधून बाहेर पडणारी उष्णता थांबून ठेवतो, ज्यामुळे फोन जास्त गरम होतो आणि त्यामुळे दुर्घटना होते. अशा परिस्थितीत फोनच्या कव्हर वर काहीही न ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फोनवर कोणत्याही प्रकारचे घट्ट कव्हर ठेवू नका.

अशाच टेकनॉलॉजि अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment