Shopsy च्या मदतीने ऑनलाईन वस्तू refer करुन पैसे कमवा

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now
shopsy-dware-paise-kase-kamvayche

मित्रांनो, इंटरनेट वरुन पैसे कमवायचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत हे सर्व मार्ग मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असतो. 
आज मी तुम्हाला ऑनलाईन वस्तू Refer करुन पैसे कसे कमवायचे या विषयी माहिती सांगणार आहे. 
घाबरु नका मी तुम्हाला येथे वेबसाईट बनवून त्यावर वस्तू ऍड करुन पैसे कसे कमवायचे या विषयी नाही सांगणार. शॉपीफायच्या मदतीने वेबसाईट बनवून आपण पैसे कसे कमवू शकतो या विषयी आपण अगोदरच पाहिले आहे. 
मी आज तुम्हाला इंटरनेट वरुन पैसे कमवण्याच्या नवीन अँप विषयी म्हणजेच shopsy विषयी सांगणार आहे.
shopsy द्वारे तुम्ही ऑनलाईन वस्तू refer करुन चांगले पैसे कमवू शकता. shopsy हे अँप फ्लिपकार्टचे आहे म्हणजेच तुम्ही ह्या अँप वर विश्वास ठेऊ शकता. 

shopsy काय आहे ? 

shopsy हे एक ऑनलाईन E-commerce अँप आहे. शॉपसी हे अँप फ्लिपकार्टद्वारे तयार करण्यात आले आहे. शॉपसीच्या मदतीने आपण स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय चालू करुन पैसे कमवू शकतो. 
शॉपसी अँपमध्ये तुम्हाला १५ करोड वस्तू मिळतात जे तुम्ही ऑर्डर किंवा रेफर करु शकता. शॉपसी वर तुम्हाला फॅशन, सौंदर्य, मोबाईल आणि घरगुती विविध वस्तू मिळतात. 
शॉपसी वर पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोणतीही investment करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त अँप डाउनलोड करुन वस्तू रेफर करायच्या आहेत. 

shopsy च्या मदतीने पैसे कसे कमवायचे ?

शॉपसीद्वारे पैसे कमवायचे असल्यास सर्वात अगोदर प्ले स्टोअर वर जाऊन हे अँप डाउनलोड करा. 
शॉपसीद्वारे पैसे कमवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 
स्टेप १: शॉपसी अँप ओपन केल्यानंतर तुम्हाला जी वस्तू विकायची किंवा रेफर करायची आहे त्या वस्तू वर क्लिक करा. समजा तुम्हाला फोन रेफर करायचा आहे तर फोन सर्च करा. 
स्टेप २: तुमच्या समोर खूप सारे फोन येतील त्यातील जो रेफर करणार आहात त्यावर क्लिक करा. 
स्टेप ३: तुम्ही वस्तू व्हाट्सअँप किंवा फेसबुकद्वारे शेअर करु शकता. जी वस्तू तुम्ही रेफर करणार आहात ती वस्तू विकल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळतील हे देखील तेथे दिसेल. (शॉपसी अँप वापरण्याची हि एक चांगली गोष्ट आहे.)

स्टेप ४: वस्तू व्हाट्सअँप किंवा फेसबुकद्वारे शेअर करा जेव्हा ती वस्तू कोणी विकत घेईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील. 
शॉपसी अँपद्वारे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला वरील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. 
तुम्हाला आता कळले असेल तुम्ही कसे वस्तू रेफर करुन पैसे कमवू शकता. 
तुम्ही ह्या वस्तू तुमच्या मित्रांना किंवा जे लोक तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत त्यांना रेफर करु शकता. त्यांना कोणती वस्तू खरेदी करायची आहे या विषयी तुम्ही माहिती घेऊन वस्तू रेफर करु शकता. 
तसेच फेसबुक ग्रुप तयार करुन देखील तुम्ही तेथे ह्या वस्तू शेअर करु शकता. 

shopsy च्या मदतीने महिन्याला किती कमवू शकतो ?

शॉपसीच्या मदतीने तुम्ही महिन्याला किती कमवू शकता हे तुम्ही किती वस्तू विकता या गोष्टीवर अवलंबून आहे. 
शॉपसीच्या मदतीने तुम्ही महिन्याला ५ ते ६ हजार किंवा त्यापेक्षा जास्त देखील कमवू शकता. शॉपसीच्या माहितीनुसार तुम्ही ह्या अँपद्वारे महिन्याला ३० हजार रुपये देखील कमवू शकता.
शॉपसीच्या मदतीने जास्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजि बनवावी लागेल कि तुम्ही कसे पैसे कमवू शकता. 
जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर कोणते ना कोणते काम तुम्हाला सुरु करावेच लागेल. ऑनलाईन पैसे कमवण्याची सुरुवात करण्यासाठी शॉपसी हा देखील एक चांगला पर्याय आहे. 
मी तुमच्यासाठी ऑनलाईन पैसे कमवण्याचे विविध मार्ग शोधत असतो. जर तुम्हाला हा मार्ग आवडला नसेल तर चिंता करु नका. मी पैसे कमवण्याशी निगडित नवीन मार्गांविषयी माहिती आपल्या ब्लॉग वर टाकत असतो. 
मी ह्या ब्लॉग वर पैसे कमवण्याशी निगडित जी नवीन माहिती टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी म्हणून उजव्या बाजूस असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करुन नोटिफिकेशन Allow करा. 
माझे काम जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया मला कंमेंटमध्ये कळवा. जेणे करुन मला अशीच चांगली माहिती तयार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. 

Leave a Comment