Ration Card – हे केले नाही तर तुमचे रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या काय करावे लागेल

सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन अपडेट आणली आहे. या अपडेट विषयी सर्व रेशन कार्ड धारकांना जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे ही माहिती जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

रेशन कार्डला आधार लिंक करणे झाले महत्वाचे

ज्या व्यक्तींकडे रेशन कार्ड आहे व जे प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या मदतीने धान्य घेत आहे त्यांना रेशन कार्डला स्वतःचे आधार कार्ड लिंक करणे महत्वाचे झाले आहे. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुमच्या रेशन कार्डला आधार लिंक करुन घ्या.

रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ होती. पण आता सरकारने ही तारीख वाढवून ३० सप्टेंबर २०२३ केली आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरच्या अगोदर तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करुन घ्या.

रेशन कार्डला आधार लिंक करण्याचे फायदे

रेशन कार्डला आधार लिंक केल्याने फसवणूक आणि अनुदानित अन्नधान्य योजनेचा गैरवापर टाळता येतो. या व्यतिरिक्त हे डुप्लिकेट रेशन कार्ड ओळखण्यास देखील मदत करु शकते.

  • डुप्लिकेट रेशन कार्ड बनवून तुमच्या अनुदानाचा फायदा घेणाऱ्याला रोखता येते.
  • PDS दुकानांना खरे लाभार्थी ओळखण्यास मदत होते.
  • PDS रेशनची गळती रोखता येते.
  • केवळ पात्र लाभार्थ्यांनाच आवश्यक अन्नधान्य आणि अनुदाने मिळतील याची खात्री करता येते.
  • सर्व सरकारी योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करणे महत्वाचे आहे.

अशा प्रकारे चेक करा तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे का नाही

मेरा रेशन या मोबाईल अँपच्या मदतीने तुम्ही चेक करु शकता की तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे का नाही.

  • सर्वात अगोदर play store वर जाऊन mera ration हे अँप डाउनलोड करा आणि ओपन करा. तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये “आधार सीडींग” या ऑपशन वर क्लिक करा.
  • येथे तुम्ही रेशन कार्ड किंवा आधार कार्ड नंबर टाकून चेक करु शकता तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक आहे का नाही. रेशन कार्ड किंवा आधार कार्ड नंबर टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.
  • नंतर नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मधील नावे दिसतील. जर त्या नावांपुढे Yes दिसत असेल तर तुमचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे.

रेशनला आधार लिंक नसल्यास काय करावे?

जर तुमच्या रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या महा इ सेवा केंद्रामध्ये जाऊन ते लिंक करुन घेऊ शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment