High Profit Business – या व्यवसायात सरकार देते ८० टक्के अनुदान, महिन्याला होईल ४० हजारांचा नेट प्रॉफिट

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्ही जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे. पण कोणता व्यवसाय सुरु करावा आणि त्यासाठी भांडवल कोठून आणणार या विचाराने जर टेन्शनमध्ये असाल तर आजचा हा खास व्यवसाय तुमच्यासाठी एकदम योग्य राहील.

सरकार देशामध्ये उद्योगधंद्यांची संख्या वाढवण्यासाठी नवीन उयोजकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या सोईसुविधा पुरवण्याचे काम करते. विविध व्यवसायांमध्ये सरकार नवीन उद्योजकांना काही प्रमाणात आर्थिक सहायता प्राप्त करुन देते. यामध्ये असा एक व्यवसाय आहे जो सुरु करण्यासाठी सरकार चक्क आपल्याला ८० टक्के अनुदान देते. सरकार कडून मिळालेल्या अनुदाना मार्फत कोणती ही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करु शकते.

करी आणि तांदूळ पावडरचे उत्पादन युनिट सुरु करा

करी पावडर भारतातील स्वयंपाक घरामध्ये नेहमी वापरली जाते. यामध्ये २० मसाले, बिया आणि औषधी वनस्पती असतात. करी पावडरचा सुगंध कस्तुरीसारखा आणि चव तिखट असते. भाज्या, खारट पदार्थ आणि सूप तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. याच्या विशेष गुणधर्मांमुळे, त्याची मागणी सतत वाढत चालली आहे. करी आणि तांदूळ पावडरचे उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी जास्तीत जास्त ४ ते ६ कामगारांची आवश्यकता असते.

व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देईल ८० टक्के अनुदान

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला २ लाख रुपये गुंतवावे लागतील. सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या मुद्रा योजने अंतर्गत, तुम्हाला बँकेकडून 3.32 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 1.68 लाख रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकाल.

हा व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही आणि या सोबतच सरकारकडून 80 टक्क्यांपर्यंत निधी आणि अनुदानही उपलब्ध आहे.

व्यवसाय सुरु करण्यासाठी या गोष्टी असतील आवश्यक

करी आणि तांदळाच्या पावडरचा व्यवसाय सुरु करण्यासाठी काही गोष्टीं विषयी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही खाली पाहू शकता.

  • हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान तुमच्याकडे २ लाख रुपये असायला हवे. बाकीचे भांडवल मुद्रा योजने अंतर्गत तुम्हाला मिळून जाईल.
  • हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 250 चौरस यार्ड जागेची आवश्यकता असते.
  • यामध्ये तुम्हाला ग्राइंडिंग, ब्लेंडिंग आणि पॅकेजिंगसाठी मशीनची आवश्यकता असते.
  • व्यवसायासाठी FSSAI नोंदणी, BIS प्रमाणपत्र, AGMARK, MSME/Udyam नोंदणी आणि ट्रेडमार्क/कॉपीराइट नोंदणी आवश्यक आहे.

हे पहा – केवळ १० हजारामध्ये सुरु होणारा हा व्यवसाय तुम्हाला दिवसाला २ ते ३ हजार कमवून देईल

इतकी होईल कमाई

करी आणि तांदळाच्या पावडरला भारतात आणि परदेशात चांगली बाजारपेठ आहे. दररोज सरासरी १०० किलो विक्रीसह तुम्ही दरमहा ५०,००० ते १,५०,००० पर्यंत कमावण्याची अपेक्षा करु शकता.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment